अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने सोमवारी सुरू केलेल्या सरावाचा निषेध नोंदवल्यानंतर, काही तासांतच उत्तर कोरियाने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अपेक्षेप्रमाणे, ही क्षेपणास्त्रे तळांवरून पलीकडे गेली. उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयांगने या सरावाला “धोकादायक प्रक्षोभक कृत्य” म्हटले, ज्यामुळे चुकून संघर्ष निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, ही क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या पश्चिमी भागातून पिवळ्या समुद्राकडे प्रक्षेपित केली गेली. यू.एस. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये कार्यभार सांभाळल्यानंतरची, ही पहिली बैलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी होती.
मित्र राष्ट्रांचा हा वार्षिक ‘फ्रीडम शील्ड सराव’ 20 मार्चपर्यंत चालणार आहे. जिथे, गेल्याच आठवड्यात दक्षिण कोरियाच्या विमानांनी सीमेजवळील एका गावावर चुकून बॉम्ब टाकल्यामुळे, 29 जण जखमी झाले होते आणि त्यामुळे लाईव्ह-फायर सराव स्थगित ठेवण्यात आला आहे.
उत्तर कोरियाने सामान्यतः अमेरिका-दक्षिण कोरिया संयुक्त सराव रद्द करण्याची मागणी करत, त्यांना आक्रमणाचे पूर्व संकेत म्हणून संबोधले आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले की, ‘संयुक्त सरावांचा उद्देश उत्तर कोरियासारख्या धोक्यांसाठी मित्र राष्ट्रांच्या सजगतेला मजबूत करणे आहे.’
“हे एक धोकादायक कृत्य आहे, जे कोरियन द्वीपसमूहातील तीव्र परिस्थितीला चालना देत आहे, ज्यामुळे दोन्ही समूहांदरम्यान एका अपघाती गोळीबार होऊ शकतो,” असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्याचे, राज्य माध्यम आउटलेट केसीएनएने (KCNN) म्हटले आहे.
‘या सरावांमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला हानी पोहोचेल,’ असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात साऊथ कोरियाच्या दोन जेट विमानांनी, एका गावावर चुकून बॉम्बहल्ला केल्याच्या घटनेबद्दल, दक्षिण कोरियाच्या हवाई दलाचे प्रमुख ली यंग-सू यांनी सोमवारी माफी मागितली.
“हा एक अपघात होता जो पुन्हा कधीही घडू नये,” असे ली यांनी पत्रकारांना सांगितले.
“एका लढाऊ विमानातील पायलटाकडे वेळेची कमतरता होती आणि त्याने घाईघाईत टार्गेट निर्देशांकांची पुनःतपासणी केली नाही, तर दुसऱ्या विमानातील पायलटाने चुकीचे निर्देशांक लक्षात न घेता बॉम्ब डागले,” असे दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्याने लष्करी तपासणीच्या अंतरिम निकालाचा संदर्भ देत सांगितले.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने यावर अद्याप कुठलीही टिप्पणी केलेली नाही.
सोलपासून सुमारे 40 किलोमीटर (25 मैल) ईशान्येस असलेल्या ‘पोचेओन’ या गावात हा अपघाती बॉम्बहल्ला झाला, हा भाग उत्तर कोरियाच्या सीमेजवळील प्रशिक्षण क्षेत्राबाहेर होता.
परिसरातील रहिवाशांनी बऱ्याच काळापासून सरावामुळे होत असलेला आवाज, गोंधळ आणि संभाव्य धोक्यांबद्दल तक्रार केली आहे. तसेच अशाप्रकारचे आणखीनही अपघात होऊ शकतात अशी भीती तिथल्या नागरिकांमध्ये पसरली आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)