उत्तर कोरियाचे किम जोंग उन चीनच्या विजय संचलनात सहभागी होणार

0

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या आत्मसमर्पणाच्या निमित्ताने होणाऱ्या लष्करी परेडमध्ये भाग घेण्यासाठी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन पुढील आठवड्यात चीनला जाणार आहेत, असे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून किम चीनला भेट देत असल्याचे उत्तर कोरियाच्या राज्य माध्यम केसीएनएने म्हटले आहे.

युक्रेनमध्ये युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांवरून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) ज्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याव्यतिरिक्त इतर 26 परदेशी राष्ट्रप्रमुख आणि सरकारमधील कोणतेही प्रमुख पाश्चात्य आणि युरोपियन युनियन नेते या परेडला उपस्थित राहणार नाहीत.

“विजय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणे किमसाठी खूपच असामान्य आहे आणि किम अनेक राष्ट्रप्रमुखांच्या मेळाव्यात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असू शकते, जिथे ते पुतिन, शी आणि व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखांना एकाच वेळी भेटू शकतात,” असे सोलमधील उत्तर कोरियन अभ्यास विद्यापीठाचे अध्यक्ष यांग मू-जिन म्हणाले.

“किम एक नेता म्हणून आपली जागतिक स्थिती अधिक‌ वाढवण्याचा प्रयत्न करतील तसेच उत्तर कोरिया, चीन आणि रशिया दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याला संयुक्तपणे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू शकतात”, असे यांग म्हणाले.

आंतरराष्ट्रीय निर्बंध

उत्तर कोरियावर त्याच्या अण्वस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले जात आहेत, जे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन करून विकसित केले गेले होते.

रशिया आणि चीनकडून वाढत्या आर्थिक, लष्करी आणि राजकीय पाठिंब्यामुळे या निर्बंधांचा बराचसा फायदा झाला आहे, असे तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बीजिंग हा उत्तर कोरियाचा पारंपरिक मित्र देश आहे आणि एकाकी पडलेल्या या देशासाठी एक प्रमुख आर्थिक जीवनरेखा आहे. अर्थात 2017 मध्ये प्योंगयांगवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू करण्यात चीनचा अमेरिकेसारख्या इतर देशांबरोबर सहभाग होता.

2018 आणि 2019 मध्ये शी आणि किम यांची अनेक वेळा भेट झाली परंतु 2020 पासून उत्तर कोरिया आणि चीनमधील संबंध थंडावले आहेत कारण तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियाच्या कामगारांना परत पाठवण्यासाठी बीजिंगने दबाव आणणे हा मुद्दा यासाठी कारणीभूत आहे.

या काळात उत्तर कोरिया आणि रशिया लष्करीदृष्ट्या जवळ आले असून  प्योंगयांगने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला पाठिंबा देण्यासाठी अभूतपूर्व संख्येने शस्त्रास्त्रे आणि सैन्य पाठवले आहे.

दक्षिण कोरियाच्या संसदेचे सभापती वू वॉन-शिक हे देखील या परेडला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

वू चीनमध्ये किम किंवा इतर कोणत्या उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांना भेटतील का असे विचारले असता, वू यांच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की आतापर्यंत याबाबत कोणतेही नियोजित वेळापत्रक आखण्यात आलेले नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअचानक आणि दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धांसाठी तयार रहा: राजनाथ सिंह
Next articleइराण: उद्ध्वस्त केंद्रांची सफाई म्हणजे अणुपुरावे पुसणे- संशोधन गट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here