‘ऑपरेशन सिंदूर’वरून NSA डोवाल यांची परदेशी माध्यमांवर टीका

0

‘ऑपरेशन सिंदूर’ वरील परदेशी माध्यमांच्या वृत्तांकनावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शुक्रवारी तीव्र टीका करत या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताच्या केलेल्या कोणत्याही हानीचा पुरावा द्या अशी मागणी केली. आयआयटी मद्रास येथे बोलताना, डोवाल यांनी सीमेपलीकडील हल्ल्यांसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कथनांच्या (narratives) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पत्रकारांनी भारतीय पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचा एकतरी फोटो आम्हाला दाखवा असे आव्हान दिले.

“परदेशी प्रसारमाध्यमांनी दावा केला की पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. तुम्ही मला सांगा, कोणत्याही भारतीय संरचनेचे नुकसान दर्शविणारे एकतरी छायाचित्र किंवा प्रतिमा आहे का-अगदी काचेची खिडकी फुटलेली तरी?” असे डोवाल यांनी स्पष्टपणे विचारले. “त्यांनी याबद्दलची कथानके लिहिली आणि अहवाल प्रकाशित केले, पण पुरावा कुठे आहे?”

विशेषतः ऑपरेशन सिंदूर बाबत प्रसारमाध्यमांच्या कव्हरेजचा संदर्भ देत-पाकिस्तानच्या आत खोलवर असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांवरील भारताच्या अचूक हल्ल्यांचा-डोवाल यांनी परदेशी वृत्तांकन आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या उपग्रह प्रतिमांमधील तफावत अधोरेखित केली.

“उपग्रह छायाचित्रांमध्ये 10 मेच्या आधी आणि नंतर 13 पाकिस्तानी हवाई तळ दाखवले गेले-मग ते सरगोधा, रहीम यार खान किंवा चकलाला असो. हे भारतीय मूल्यांकन नव्हते, तर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेली छायाचित्रे होती,” असे ते म्हणाले.

डोवाल यांनी अधोरेखित केले की भारताकडे पाकिस्तानी लष्करी मालमत्तेचे लक्षणीय नुकसान करण्याची क्षमता असली तरी ऑपरेशन सिंदूर हे जाणूनबुजून नियंत्रित आणि केंद्रित होते. “आम्ही ते करण्यास सक्षम आहोत”, असे सांगून त्यांनी टिप्पणी केली की मोहिमेची मर्यादित व्याप्ती आराखड्यानुसार होती, निर्बंधांमुळे नाही.

‘आम्ही काहीही गमावले नाही’: डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरचा तपशील शेअर केला

कामगिरीविषयक दुर्मिळ insights प्रदान करताना, डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरचे “तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि पूर्णपणे स्वदेशी” मिशन म्हणून कौतुक केले आणि संरक्षण क्षमतांमध्ये भारताच्या वाढत्या स्वावलंबनावर भर दिला.

“आपण आपले स्वतःचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. ही मोहीम किती स्वदेशी पद्धतीने राबवली गेली याचा आम्हाला अभिमान आहे,” असे सांगून त्यात समाविष्ट असलेल्या अचूकतेचे आणि नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.

डोवाल यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेने पाकिस्तानी हद्दीत-सीमावर्ती भागापासून दूर असलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आणि त्यात संपूर्ण यश मिळवले.

“आम्ही पाकिस्तानभर नऊ दहशतवादी ठिकाणे ओळखली-सीमेजवळ नव्हे तर आत खोलवर. आम्ही सर्वांवर अचूक हल्ले केले. आम्ही काहीही गमावले नाही. आम्ही इतर कुठेही हल्ला केला नाही. हल्ले इतके अचूक होते की, कोण कुठे आहे हे आम्हाला नेमके ठाऊक होते,” असेही ते म्हणाले.

त्यांनी पुढे खुलासा केला की संपूर्ण मोहीम केवळ 23 मिनिटे चालली, जी अंमलबजावणीचा वेग आणि अचूकता अधोरेखित करते.

ऑपरेशन सिंदूर, जे 7 मेच्या रात्री उशिरा सुरू करण्यात आले त्याबद्दलची माहिती लगेच सार्वजनिक करण्यात आली होती. या मोहिमेकडे अलीकडच्या वर्षांतील भारतातील सर्वात धाडसी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक लष्करी मोहिमांपैकी एक म्हणून पाहिले जाते. ही मोहीम त्याच्या वाढीव हल्ल्याची क्षमता आणि शत्रूच्या प्रदेशात खोलवर गुप्तपणे जाऊन लक्ष्यावर अचूक हल्ले करण्याची तयारी दर्शवते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDRDO, IAF ने केली अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Next articleएअर इंडिया अपघात: उड्डाणानंतर काही सेकंदात इंधन इंजिन बंद पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here