न्यूझीलंडमध्ये भूस्खलन; ढिगाऱ्यात अडकलेल्यांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू

0
न्यूझीलंडमध्ये

न्यूझीलंडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ माउंट माउंगानुई येथे झालेल्या भूस्खलनानंतर, गुरुवारी बचाव पथके कॅम्पसाईटवरील ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना शोधण्याची मोहीम राबवत आहेत. या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला असून, काही लहान मुलांसह बेपत्ता लोकांची संख्या एक अंकी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हेलिकॉप्टर आणि शोध पथकातील श्वानकांच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली, ज्यामुळे हजारो लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उत्तरेकडील बेटाच्या (North Island) पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाने थैमान घातले, ज्यामुळे रस्ते बंद करण्यात आले आणि घरांमधून लोकांना स्थलांतरित करण्यात आले.

आणीबाणी सेवा विभागाने दिलेल्या निवेदनानुसार, ढिगाऱ्याचे थर बाजूला करण्यासाठी बचाव पथके रात्रभर अर्थमूव्हिंग उपकरणांचा वापर करून कार्य करत आहेत.

“हे एक गुंतागुंतीचे आणि अत्यंत जोखमीचे कार्य आहे,” असे अग्निशमन आणि आणीबाणी सेवा अधिकारी मेगन स्टिफलर यांनी सांगितले. “शोध पूर्ण होईपर्यंत ही पथके दिवस-रात्र कार्यरत राहतील,” असेही त्यांनी जोडले.

“बेपत्ता लोकांची संख्या एका अंकी असून, कदाचित आम्हाला एखादी जिवंत व्यक्ती सापडण्याची शक्यता आहे,” असे पोलीस अधीक्षक टिम अँडरसन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

भूस्खलनादरम्यान, वीजवाहिन्या तुटल्यामुळे तब्बस 16,000 लोकांची वीज खंडित झाली होती. मात्र, सेवा सुरळीत करण्याचे काम सुरू असून, आता ही संख्या 8,000 पर्यंत खाली आली आहे.

लोक जीवित असण्याचा अंदाज

निक्स जॅक्स नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने Radio NZ ला सांगितले की, “जेव्हा मी डोंगरावर चढायला सुरूवात केली, तेव्हा एक प्रचंड मोठा आवाज ऐकला. जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा मला काही भागांत जमीन ढासळताना दिसली. दरड एका स्वच्छतागृहाच्या इमारतीवर कोसळली. मला वाटते तिथे काही लोक आंघोळ करत होते. या दरडीच्या धक्क्याने एका कॅम्परव्हॅनला थेट पुढे ढकलले, ज्यामध्ये एक कुटुंब होते.”

आणीबाणीचे अग्निशमन कमांडर विलियन पाईक यांनी सांगितले की, जमीन पुन्हा ढासळण्याच्या भीतीने बचाव कर्मचारी तिथून मागे हटले असून, त्यानंतर ढिगाऱ्यातून कोणतेही आवाज ऐकू आलेले नाहीत.

“माझ्या माहितीनुसार, काही नागरिकांनी ढिगाऱ्यात शिरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांना काही आवाज ऐकू आले असल्याचे त्यांनी सांगितले.,” तसेच घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही ते आवाज ऐकले होते.

पाईक पुढे म्हणाले, “आमचे पहिले बचाव पथक तिथे पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात, आम्ही दरड पुन्हा कोसळण्याच्या शक्यतेमुळे सर्वांना त्या ठिकाणाहून माघारी बोलावले.”

भूस्खलनाची दुसरी घटना

पोलिसांनी माहिती दिली, की गुरुवारी पापामोआ उपनगरात एका घरावर दरड कोसळल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, बुधवारी ऑकलंडच्या उत्तरेला एक वाहन वाहून गेल्यामुळे आणखी एक व्यक्ती सध्या बेपत्ता आहे.

पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आश्वासन दिले आहे की, बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

त्यांनी ‘X’ प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, “आम्ही स्थानिक समुदायांच्या मदतीसाठी तत्पर आहोत, आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या कार्यातही आम्ही त्यांच्यासोबत राहू.”

उष्णकटिबंधीय कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकल्यामुळे, हवामान विभागाने आता नॉर्थ बेटावरील सर्व धोक्याचे इशारे मागे घेतले आहेत.

रॉयटर्सच्या इनपुट्ससह

+ posts
Previous articleदक्षिण कोरियाने लागू केला जगातील पहिला व्यापक AI कायदा; वाचा सविस्तर
Next articleDRDO’s Hypersonic Anti-Ship Missile to Debut at Republic Day Parade

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here