ऑपरेशन सिंदूर, भारतासाठी 2035 पर्यंत संरक्षण कवच: पंतप्रधान मोदी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना: देशाच्या सुरक्षेसाठी, तंत्रज्ञानाच्या वर्चस्वासाठी आणि धोरणात्मक स्वायत्ततेसाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आजवरच्या सर्वात दीर्घ 103 मिनिटांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी, येणारे दशक भारताच्या सार्वभौमत्वासाठी आणि जागतिक स्थानासाठी निर्णायक असल्याचे सांगितले.

ऑपरेशन सिंदूर: “अकल्पनीय प्रत्युत्तर”

या भाषणाचा केंद्रबिंदू होता ऑपरेशन सिंदूर22 एप्रिल रोजी, पहलगामच्या बैसरनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून क्रूरपणे मारण्यात आले होते, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही निर्णायक सीमापार लष्करी कारवाई केली.

“पहलगाम हल्ल्यामुळे, संपूर्ण भारत संतप्त भावनेने एकवटला होता आणि संपूर्ण जग हादरले होते,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “ऑपरेशन सिंदूर ही त्याच संतापाची अभिव्यक्ती आहे. या ऑपरेशनमुळे पाकिस्तानमध्ये झालेले नुकसान इतके मोठे आहे की, दररोज त्याविषयी नवनवीन खुलासे समोर येत आहेत”

पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराला वेळ, लक्ष्य आणि डावपेच निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. आमच्या शूर सैनिकांनी शत्रूला कल्पनेपलीकडील प्रत्युत्तर दिले. शत्रूच्या हद्दीत खोलवर दडलेल्या दहशतवादी तळांचे ढिगाऱ्यात रूपांतर केले.”

एक स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी घोषित केले की: “भारताने आता हे स्पष्ट केले आहे की, आता इथून पुढे अण्वस्त्र धमकी सहन केली जाणार नाही. कधी आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे हे आम्ही ठरवू.”

2035 पर्यंत बहुस्तरीय राष्ट्रीय ‘डिफेन्स शील्ड’: स्वदेशी सामर्थ्य केंद्रस्थानी

ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या जोरावर, पंतप्रधान मोदींनी भारताच्या संरक्षण सिद्धांतामधील एक बदल जाहीर केला – ज्याच्या केंद्रस्थानी लष्करी उपकरणांमधील ‘आत्मनिर्भरता’ असल्याचे त्यांनी सांगितले.

“जर आपण आत्मनिर्भर झालो नसतो, तर सिंदूरसारखे ऑपरेशन आपण करू शकलो असतो का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. “गेल्या दशकात, आम्ही देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य दिले आणि आज त्याचे परिणाम आपले शत्रू पाहत आहेत,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी, मिशन सुदर्शन चक्र या पुढच्या पिढीच्या संरक्षण कार्यक्रमाचे अनावरण केले, जे भगवान श्रीकृष्णाच्या पौराणिक शस्त्रापासून प्रेरित आहे. या मिशनचा उद्देश 2035 पर्यंत आधुनिक, बहुस्तरीय राष्ट्रीय संरक्षण कवच तयार करणे आहे, ज्यामध्ये प्रगत पाळत ठेवणारी प्रणाली, अचूक-मारा करणारी प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

भारताच्या वैज्ञानिक समुदायाला आवाहन करताना मोदी म्हणाले: “आपल्या लढाऊ विमानांसाठी आपण ‘मेड-इन-इंडिया’ जेट इंजिन तयार केली पाहिजेत. ही केवळ संरक्षक प्रगती नसेल तर त्यासोबतच, ही राष्ट्रीय अभिमान, क्षमता आणि नियंत्रणाची बाब ठरेल.”

पाण्याचा शस्त्र म्हणून वापर

प्रादेशिक भू-राजकारणावर बोलताना पंतप्रधान मोदींनी, सिंधू पाणी करारावर तीव्र टीका केली आणि हा करार भारताच्या हितासाठी अन्यायकारक असल्याचे म्हटले.

“आपले शेतकरी त्रास सहन करत असताना, आपल्या नद्या शत्रूच्या जमिनीला पाणी देतात. हा अन्याय फार काळापासून चालला आहे. मात्र आता, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” असे म्हणत, त्यांनी या कराराला स्थगिती देण्यास पाठिंबा दर्शवला.

सर्व क्षेत्रांमध्ये धोरणात्मक स्वायत्तता

संरक्षण आत्मनिर्भरतेला व्यापक राष्ट्रीय क्षमतेशी जोडताना, पंतप्रधानांनी” अक्षय ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि अंतराळ संशोधनातील प्रगतीवर प्रकाश टाकला, ज्यात भारतीय अंतराळ स्थानकाच्या योजनांचाही समावेश होता.

“आत्मनिर्भरता ही केवळ व्यापाराबद्दल नाही; ती क्षमतेबद्दल आहे. आपल्या शत्रूंनी ‘मेड इन इंडिया’च्या सामर्थ्याला कमी लेखले पण आता त्यांना कळले आहे की ते त्यांना क्षणात नष्ट करू शकते,” असे मोदी यावेळी म्हणाले.

नवीन संरक्षण धोरण: एक युगनिर्णायक भाषण

यावर्षीचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण केवळ औपचारिक नव्हते, तर ते एक धोरणात्मक निर्धार जाहीर करणारे भाषण होते. भारतीय भूमीचा इंच अन इंच सुरक्षित ठेवणे, तांत्रिक नवोपक्रमात आघाडी गाठणे आणि जागतिक घडामोडींमध्ये सार्वभौमत्व सिद्ध करणे, हे भारताचे नवीन संरक्षण धोरण असल्याचा ठळक संदेश, यंदाच्या भाषणातून स्पष्ट झाला.

ऑपरेशन सिंदूरच्या ज्वाळांपासून ते अवकाशाच्या सीमांपर्यंत, पंतप्रधान मोदींचा संदेश स्पष्ट होता की: “भारत प्रत्येक संकटात ठामपणे उभा राहिल – एक सक्षम, सुसज्ज आणि आत्मनिर्भर देश म्हणून उदयाला येईल.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleOperation Sindoor, Defence Shield by 2035: Modi’s Uncompromising Independence Day Agenda
Next articleआसाम करार आणि मी: चार दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here