पाकिस्तानातील दुसऱ्या मोठ्या नौदल हवाई तळावर ग्रेनेड हल्ला

0
स्रोत - द बलुचिस्तान पोस्ट

बलुचिस्तानमधील तुर्बत शहरात असलेल्या पाकिस्यानच्य दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री हा हल्ला झाला असून अफगाणिस्तानातील फुटीरतावादी दहशतवादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून गेल्या पाच महिन्यांमधला हा दुसरा हल्ला आहे.

बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, बीएलएच्या मजीद ब्रिगेडने ईमेलमध्ये दावा केला होता की त्यांचे सैनिक एअरबेसमध्ये घुसले. या गटाने वेळोवेळी या प्रांतामध्ये चीनद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला विरोध केला आहे. चीन आणि पाकिस्तानवर या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मनमानी पद्धतीने वापर करत असल्याचा आरोपही यात केला आहे.

याआधीही झालेल्या हल्ल्यांमुळे चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाच्या संदर्भात असणारी सुरक्षेची चिंता वाढली आहे, कारण या प्रकल्पावर स्थानिक बलुच लोकांनी आक्षेप घेतला आहे. बीएलएने यापूर्वी ग्वादरमधील गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या पाश्चात्य उद्योगांना इशारा म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले होते.

पाकिस्तान इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, 8 दहशतवाद्यांच्या गटाने बंदर प्राधिकरणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ते हाणून पाडले. माध्यमांच्या वृत्तानुसार, या हवाई तळावर चिनी ड्रोन असल्याचं सांगण्यात येत आहे.
नौदलाच्या विशेष शाखेने दहशतवाद्यांचा यशस्वीपणे सामना केला, असे द डॉनने वृत्त दिले आहे. या आठवड्यातील हा दुसरा आणि यावर्षीचा तिसरा हल्ला आहे. अलीकडेच बीएलएने ग्वादरमधील पाकिस्तानी गुप्तचर मुख्यालयाला लक्ष्य केले होते.

प्रादेशिक स्वायत्ततेसाठी पाकिस्तान सरकारच्या विरोधात लढणाऱ्या BLA आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी 2018 पासून केलेल्या अनेक हल्ल्यांपैकी हा एक मोठा हल्ला आहे .

या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चिनी अधिकाऱ्यांना दिलेले सुरक्षेचे आश्वासन पाळता येत नाही हे अधोरेखित झाले आहे.चिनी लोकांनी गेल्या काही वर्षांत आपल्या नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी 50 अब्ज अमेरिकन डॉलरच्या बंदर परिसरात एक कंपाउंड बांधले आहे. चीनने वेळोवेळी पाकिस्तानला तिथे असणारे आपले नागरिक आणि हितसंबंध सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सांगितले आहे.

पिनाकी चक्रवर्ती


Spread the love
Previous articleभारतीय तटरक्षकदलाचे जहाज फिलिपिन्समध्ये दाखल
Next articlePakistan Army Chiefs: Interesting Facts And Facets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here