क्वेटा रेल्वे स्थानकावरील आत्मघाती स्फोटात 25 ठार

0
स्फोटात
आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर क्वेटा रेल्वे स्थानकाचे दृश्य

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात 14 लष्करी जवानांसह 25 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी सकाळी तिकीट केंद्राजवळ झालेल्या या स्फोटात 53 जण जखमी झाले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली.

आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला असावा असा संशय असला तरी तपास पूर्ण होईपर्यंत याला दुजोरा देता येणार नाही, असे क्वेटा पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आले. बॉम्ब निकामी करणारे पथक पुरावे गोळा करण्याच्या कामाला लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्वेटा येथील इन्फंट्री स्कूलचा अभ्यासक्रम पूर्ण करून परत चाललेले लष्करी जवान या स्फोटात ठार झाले.

स्फोट झाला तेव्हा रावळपिंडीकडे जाणाऱ्या गाडीसाठी प्लॅटफॉर्मवर सुमारे 100 लोक वाट पाहत होते असे पोलिसांनी सांगितले. अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो असेही पोलिसांनी सांगितले.

स्फोट झाला तेव्हा जाफर एक्सप्रेस पेशावरकडे रवाना होण्याच्या तयारीत होती.

ऑगस्टमध्ये झालेल्या साखळी हल्ल्यांची जबाबदारी बीएलएने स्वीकारली होती. या हल्ल्यांमध्ये 39 लोक ठार झाले होते. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पांतर्गत काम सुरू असलेल्या विविध ठिकाणी तैनात चिनी कामगार आणि अभियंत्यांना लक्ष्य करणारी संघटना म्हणून बीएलए ओळखली जाते.

इतर हल्ल्यांमध्ये पंजाबी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. पंजाबी वर्चस्व असलेल्या सैन्याने आपल्या प्रांताचे केलेले गरिबीकरण याचा राग येऊन हे कृत्य केले असल्याचे बीएलए दावा करते. यातून बलुचांचा राग प्रतिबिंबित होतो.

द डॉन या वृत्तपत्राच्या बातमीनुसार गेल्या वर्षभरात बलुचिस्तान आणि खैबर-पख्तूनख्वा प्रांतांमधील हिंसाचारात वाढ झाली आहे. 2023 मध्ये, पाकिस्तानमध्ये 789 दहशतवादी हल्ले आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये 1 हजार 524 जणांचा मृत्यू झाला तर 1हजार 463 जण जखमी झाले. गेल्या सहा वर्षांमधील ही आकडेवारी उच्चांकी पातळीवरील आहे, असे वृत्तपत्राने म्हटले आहे.

सप्टेंबरमध्ये पोलिसांच्या वाहनावर बॉम्बहल्ला करण्यात आला, ज्यात दोन कर्मचारी ठार झाले. यानंतर काही दिवसांनी, पंजगुरमधील बांधकाम सुरू असलेल्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यात पंजाबमधील मुल्तान येथील मजूर ठार झाल्याची माहिती मिळाली.

सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)

 


Spread the love
Previous articleIsrael To Procure 25 F-15s From U.S. For $5.2 Billion
Next articleIndia Gifts High-Speed Fast Interceptors To Mozambique

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here