पॅलेस्टिनी अतिरेक्यांकडून 3 इस्रायली ओलीसांना सोडण्यास सुरुवात

0
पॅलेस्टिनी
तीन इस्रायली ओलीसांना सुपूर्द करताना...

इस्रायल आणि हमासमध्ये 19 जानेवारीपासून सुरू झालेल्या युद्धविरामाच्या नव्या टप्प्यात, 110 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याच्या बदल्यात, पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गुरुवारी गाझातील 3 इस्रायली ओलीसांना सुपूर्द करण्यास सुरुवात केली. इस्रायल आणि हमास यांच्यातील कैद्यांची देवाणघेवाण आतापर्यंत सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसते.

एक महिला इस्रायली सैनिक- आगम बर्जरने, रेड क्रॉसकडे सुपूर्द होण्याआधी उत्तर गाझामधील जबलिया येथील व्यासपीठावरून उपस्थित गर्दीला हात दाखवला.

7 ऑक्टोबर 2023 रोजी, इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्यात किबुत्झ नीर ओझ येथून अपहरण करण्यात आलेले- गादी मोसेस (80) आणि अर्बेल याहूद (29) हे दोघेही, खान युनिस येथील दुसऱ्या देवाणघेवाणी दरम्यान, काळा गणवेश आणि मुखवटा घातलेल्या बंदूकधाऱ्यांच्या उपस्थितीत एकमेकांना कडकडून भेटले. युनिस, दक्षिण गाझा, हमास सहयोगी इस्लामिक जिहादने याचा एक व्हिडिओ जारी केला आहे.

समूहाच्या सशस्त्र शाखेच्या प्रवक्त्याने टेलीग्रामद्वारे सांगितले की, “दोन इस्रायली ओलीसांना सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.”

रॉयटर्सशी बोलताना एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की , ”सुपूर्द करण्यात आलेल्या 3 ओलीसांना इस्रायलमधील तीन वेगवेगळ्या रुग्णालयात नेले जाण्याची अपेक्षा होती, परंतु डॉक्टरांकडून त्यांची त्वरित तपासणी केल्यानंतर यात बदलही होऊ शकतात.”

इस्रायलमधील नागरिक टेल अविवमधील एका मुख्य चौकात, ज्याला “बंधक चौक” म्हणून ओळखले जाते, लोक एकत्र होऊ लागले, त्यामुळे हा पॉईंट गाझामधील बंधकांसाठी प्रचार करणाऱ्या प्रयत्नांचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे.

19 जानेवारीपासून सुरू झालेल्या युद्धविरामात आतापर्यंत तीन इस्रायली नागरिक आणि चार सैनिक – सर्व महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्या बदल्यात इस्रायलने 290 पॅलेस्टिनी दोषी आणि बंदीवानांची सुटका केली आहे.

इस्रायलमधील हमासच्या हल्ल्यात, 250 हून अधिक ओलीसांचे अपहरण करण्यात आले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बंधकांना दुसऱ्या महिन्यात संघर्षविरामादरम्यान मुक्त करण्यात आले आणि इतरांना इस्रायली लष्करी मोहिमेदरम्यान मृत किंवा जिवंत अवस्थेत सुपूर्द आले. या मोहिमेमुळे हजारो पॅलेस्टियन नागरिक मरण पावले आहेत.

इस्रायल अजूनही गाझामधील ९० ओलीसांची नोंद ठेवते, त्यापैकी ३० जणांना अनुपस्थितीत मृत घोषित केले आहे. त्यामुळे देवाणघेवाणीमध्ये अजूनही एक मोठा मार्ग पार करायचा आहे.

(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleनिज्जर प्रकरणी क्लीन चिट, आता भारत-कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यता
Next articleअमेरिकेतील विमान दुर्घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here