कारगिल विजयाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि 1999 च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले, “कारगिलमध्ये आम्ही केवळ युद्धच जिंकले नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचे एक अद्भुत उदाहरण देखील जगासमोर ठेवले. सत्याच्या समोर खोटेपणा आणि दहशतवादाचा पराभव झाला.” पाकिस्तानला लक्ष्य करत ते पुढे म्हणाले,”भूतकाळातील सर्व अनैतिक आणि लाजिरवाण्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानचा पराभव झाला आहे. मात्र, ते त्यांच्या इतिहासातून काहीही शिकले नाही.”
“ते दहशतवाद आणि छुप्या युद्धांच्या माध्यमातून आपली प्रासंगिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मी त्याच ठिकाणाहून बोलत आहे जिथे दहशतवादाचे आश्रयदाते मला स्पष्टपणे ऐकू शकतात! दहशतवादाच्या या आश्रयदात्यांना मी सांगू इच्छितो की त्यांच्या दुष्ट योजना कधीही यशस्वी होणार नाहीत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कारगिल विजय दिवसाच्या महत्त्वावर बोलताना ते म्हणाले, “देशासाठी केलेले बलिदान अमर आहे हेच हा दिवस आपल्याला सांगतो.”
On 25th Kargil Vijay Diwas, the nation honours the gallant efforts and sacrifices of our Armed Forces. We stand eternally grateful for their unwavering service.https://t.co/xwYtWB5rCV
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2024
पंतप्रधानांनी अग्निपथ योजनेचे केले समर्थन
वादग्रस्त अग्निपथ योजनेचा बचाव करताना ते म्हणाले, “काही लोकांनी हा राजकारणाचा विषय बनवला आहे.”
अग्निपथ योजना म्हणजे लष्कराने केलेल्या आवश्यक सुधारणांचे एक उत्तम उदाहरण आहे. काही लोकांना असे वाटायचे की लष्कर म्हणजे राजकारण्यांना सलामी देणे आणि संचलन करणे. पण आमच्यासाठी लष्कर म्हणजे 140 कोटी नागरिकांचा विश्वास आहे. लष्कराला तरुण आणि युद्धासाठी सतत तंदुरुस्त ठेवणे हे अग्निपथचे उद्दिष्ट आहे. दुर्दैवाने, काही लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा संवेदनशील मुद्द्याला राजकारणाचा विषय बनवले आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी हजारो कोटींचे घोटाळे करून आपल्या सैन्याला कमकुवत केले,” असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य करत आपल्या भाषणात टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्रास येथे पोहोचले, जेथे त्यांनी कारगिल विजयाच्या 25व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ कारगिल युद्ध स्मारक तसेच वीर भूमीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी शिंकुन ला टनेलसाठी पहिला स्फोट केला.
पंतप्रधानांनी लडाखमधील शिंकुन ला टनेल प्रकल्पाचा पहिला स्फोट आभासी पद्धतीने केला. या प्रकल्पात निमू-पदम-दारचा रस्त्यावर सुमारे 15 हजार 800 फूट उंचीवर 41 किमी लांबीचा ट्विन ट्यूब टनेल बांधणे समाविष्ट आहे. लेहला भारताशी चोवीस तास जोडण्याचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होणार असून, पूर्ण झाल्यावर तो जगातील सर्वात उंच टनेल बनणार आहे. या टनेलमुळे आपल्या सशस्त्र दलांची आणि इतर साधनसामुग्रीची वाहतूक वेगवान आणि कार्यक्षम तर होईलच शिवाय लडाखच्या आर्थिक आणि सामाजिक विकासातही याचे योगदान असेल.
पंतप्रधान म्हणाले की, शिंकुन ला टनेलच्या माध्यमातून लडाख हा केंद्रशासित प्रदेश वर्षभर आणि प्रत्येक हंगामात देशाशी जोडलेला राहील. “हा टनेल लडाखच्या विकासासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी नवीन शक्यतांचे दरवाजे उघडेल आणि या टनेलमुळे इथल्या रहिवाशांचे आयुष्य आणखी सोपे होईल कारण तीव्र हवामानामुळे त्यांना भेडसावणाऱ्या असंख्य अडचणी आता कमी होतील,” असे ते म्हणाले.
विजय दिनाचे महत्त्व
25 वर्षांपूर्वी, 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्ध अधिकृतपणे संपले. लडाखच्या कारगिल जिल्ह्यात पाकिस्तानविरुद्ध भारताने मिळवलेला हा विजय आणि कारगिलमध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ पाकिस्तानी घुसखोरांनाच नव्हे तर त्याहूनही अधिक सैनिकांना सामोरे गेलेल्या, आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. अधिकृत आकडेवारीनुसार, युद्धाच्या शेवटी शहीद भारतीय सैनिकांची संख्या 527 होती, 1 हजार 363 जवान जखमी झाले तर फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेत, ज्यांचे मिग-27 स्ट्राइक ऑपरेशन दरम्यान पाडण्यात आल्याने युद्धकैदी बनले.
कारगिल युद्धातील भारताचा विजय केवळ पाकिस्तानी सैन्याविरुद्ध नव्हता तर आव्हानात्मक भूभाग आणि प्रतिकूल हवामानाविरुद्धही होता. पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील उंच ठिकाणांवर कब्जा केल्यामुळे या संघर्षाला सुरुवात झाली. सुरुवातीला पाकिस्तानी सैन्य हे जिहादी (दहशतवादी)असल्याचे मानले गेले, मात्र त्यानंतरच्या काही आठवड्यांत हे स्पष्ट झाले की पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले होते. भारतीय लष्कराला पहिल्यांदा 3 मे रोजी घुसखोरीबद्दल सतर्क करण्यात आले होते. त्यानंतरचा भारतीय सशस्त्र दलांच्या धैर्य आणि व्यावसायिकतेचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
द्रास येथून व्हिडिओ जर्नालिस्ट आदित्य बी. मुसासह ध्रुव यादव