पोर्तुगाल F-35 जेटच्या खरेदीचा पुनर्विचार करणार, युरोपियन पर्याय निवडणार?

0
F-35

“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात बदल झाल्यानंतर, पोर्तुगाल त्यांच्या जुन्या अमेरिकन बनावटीच्या F-16 लढाऊ विमानांच्या जागी, F-35 जेट्स खरेदी करण्याऐवजी युरोपियन लढाऊ विमाने आणू शकतो,” असे पोर्तुगालच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

पोर्तुगालचे संरक्षण मंत्री नुनो मेलो, यांनी पब्लिको वृत्तपत्राला सांगितले की, ‘ट्रम्प यांच्या NATO आणि युरोपबद्दलच्या धोरणाचे अनिश्चीत स्वरूप, देशाच्या लढाऊ विमानांच्या निवडीवर प्रभाव पाडू शकते.

“नाटो आणि आंतरराष्ट्रीय भू-रणनीतीच्या परिमाणाच्या संदर्भात अमेरिकेची अलीकडील भूमिका, आम्हाला सर्वोत्तम पर्याय कोणते आहेत याचा पुनर्विचार करायला भाग पाडते, कारण आपल्या मित्र राष्ट्रांची अंदाजे क्षमता ही एक महत्त्वाची बाब आहे,” असे ते म्हणाले.

व्हाईट हाऊसमधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या रशियाप्रती असलेल्या स्पष्ट आडमुठेपणामुळे, पोर्तुगालसह युरोपमधील पूर्वीपासूनच्या नाटो सहयोगी देशांना धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी युरोपच्या नाटो सदस्यांनी त्यांचा संरक्षण खर्च वाढवावा अशी मागणी केली आहे आणि त्यांच्या देशाच्या नाटोच्या प्रमुख निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“आमचा हा सहयोगी, जो दशकांपासून अंदाजावर चालतो आहे, तो विमान खरेदीवर, वापरावर, देखभालीवर आणि विमानाच्या ऑपरेशनशी संबंधित अन्य सर्व गोष्टींवर मर्यादा घालू शकतो,” असे पोर्तुगालमधील सेंटर राईट गव्हरमेंटचे  सदस्य मेलो म्हणाले, ज्यांनी 18 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, याच आठवड्यात काळजीवाहू पदभार स्विकारला आहे.

युरोपीयन पर्यायांचा विचार

पोर्तुगालच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, “मेलो F-35 ची खरेदी नाकारत नाहीत, परंतु ते युरोपमध्ये उपलब्ध असलेल्या विविध मॉडेल्स’च्या पर्यायांचा विचार आहेत, जे अजूनही प्रारंभिक टप्प्यात असलेल्या प्रक्रियेचा भाग आहेत.”

“सध्याचा भूराजकीय संदर्भ NATO च्या युरोपियन पिलरला मजबूत करण्याची आवश्यकता दर्शवितो आणि यामध्ये संरक्षण क्षेत्रांमध्ये संबंधित उत्पादनाचे बळकटीकरण देखील समाविष्ट आहे,” असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

युरोपीय आयोगाने, युरोपीय युनियन सदस्य देशांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या संरक्षण गरजांची रूपरेषा तयार करण्याची आणि “मोठ्या प्रमाणावर पॅन-युरोपीय फ्लॅगशिप प्रकल्प” सुरू करण्याची, आपली इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे युरोपाला संभाव्य रशियन हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत होईल. “शक्य असल्यास अधिकाधिक युरोपीय उपकरणे खरेदी केली पाहिजेत,” असेही आयोगाने सांगितले आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleपंतप्रधान मोदी लवकरच श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता
Next articleमोस्ट वाँटेड अतिरेकी पाकिस्तानात ठार; 26/11 च्या हल्ल्याशी काय होता संबंध?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here