ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय लष्कराने ड्रोन परिवर्तनाला दिली गती

0

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय लष्कर त्यांच्या सैन्य रचनेत, मानवरहित हवाई प्रणाली (Unmanned Aerial Systems – UAS) एकत्रित करण्याकरिता वेगाने पुढे जात आहे. हे बदल ऑपरेशनल सिद्धांतातील मूलभूत परिवर्तनाचे प्रतिबिंबित आहेत. ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणाली आता केवश परिघीय साधने राहिलेली नाहीत, तर ती सैन्य प्रशिक्षण, तैनाती आणि लढाईतील मुख्य गाभा बनल चालली आहे, याचे हे प्रतीक आहे.

या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे- लष्कराने नुकतेच स्विकारलेले “Eagle in the Arm” संकल्पनात्मक धोरण, जिथे प्रत्येक रायफलधारी सैनिकासोबत एक ड्रोन ऑपरेटर असणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, “ही संकल्पना देशभर जलद आणि व्यापक स्तरावर राबवली जात आहे. विशेष ड्रोन युनिट्स, Counter-UAV प्रणाली आणि ड्रोन प्रशिक्षण केंद्रे वेगाने स्थापन होत आहेत.”

प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये ड्रोन केंद्रांची स्थापना

या उपक्रमाअंतर्गत, इंडियन मिलिटरी अकॅडमी (देहरादून), इनफँटरी स्कूल (माहू), ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडनी (चेन्नई) यांसारख्या प्रमुख प्रशिक्षण संस्थांमध्ये, ड्रोन तंत्रज्ञान प्रशिक्षणाला आधीच सुरुवात झाली आहे.

अरुणाचल प्रदेशमधील लिकाबली येथे, CDS जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या भेटीदरम्यान, अशा एका केंद्राचे परीक्षण करण्यात आले, जे लष्कराच्या ड्रोन कौशल्यांना तांत्रिक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार दर्शवते.

‘ड्रोन ऑपरेशन्स सर्व श्रेणींमध्ये संस्थात्मक स्वरूपात रूजवणे,’ हे लष्कराचे अंतिम उद्दिष्ट यामुळे अधोरेखित होते.
प्रत्येक युनिट, जसे की – इन्फंट्री, आर्टिलरी यामध्ये तसेच सहाय्यक शाखांमध्ये स्वतःचे ड्रोन्स तैनात असतील, ज्यांचा वापर गुप्तचर माहिती मिळवणे, लक्ष्य निश्चित करणे, रसद पुरवठा, आणि अगदी रणांगणातील वैद्यकीय मदत यासाठी केला जाईल.

“प्रत्येक इन्फंट्री बटालियनकडे स्वतंत्र ड्रोन प्लाटून असेल,” असे जनरल द्विवेदी यांनी Dras येथे झालेल्या 26व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमात सांगितले होते. “आर्टिलरी रेजिमेंट्सना Counter-Drone प्रणाली व Loiter Munitions मिळणार आहेत, सोबतच ‘दिव्यास्त्र’ नावाच्या संमिश्र बॅटर्‍या तयार केल्या जात आहेत, ज्यातून अचूक फायरपॉवर आणि लढाऊ टिकाव वाढेल,” असेही त्यांनी सांगितले होते.

Drone Hubs – देशभरातील 19 प्रशिक्षण केंद्रांमध्ये विस्तार

या धोरणात्मक बदलाला समर्थन देण्यासाठी, लष्कर देशभरातील 19 प्रमुख प्रशिक्षण संस्थांमध्ये ड्रोन प्रशिक्षण केंद्रे उभारत आहे. यामध्ये समाविष्ट आहेत: IMA (Dehradun), OTA (Chennai आणि Gaya), Infantry School (Mhow), School of Artillery (Deolali) आणि इतर महत्त्वाच्या संस्था.

हे प्रशिक्षण सर्व जवान व अधिकाऱ्यांसाठी सामान्य अभ्यासक्रमाचा भाग म्हणून समाविष्ट केले जात आहे.

लष्कराने “Emergency Revenue Acquisition” अंतर्गत सीमित Expression of Interest (EOI) जारी केले आहे, ज्याद्वारे प्रशिक्षण ड्रोन, सिम्युलेटर आणि संबंधित पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या विक्रेत्यांची निवड केली जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत सुमारे 1000 ड्रोन (nano, micro, small, medium वर्गातील) खरेदी करण्यात येणार आहेत.
त्याशिवाय यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे:

  • 140 First-Person View (FPV) ड्रोन – युद्धाभ्यास आणि हालचालींसाठी
  • 600 प्रगत सिम्युलेटर्स – आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअरसह
  • 24×7 मैदानी ड्रोन प्रशिक्षण रेंजेस आणि इनडोअर ट्रेनिंग एरिना
  • प्रमाणित ड्रोन ऑपरेटरसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र यंत्रणा

ही सर्व प्रशिक्षण केंद्रे, जानेवारी 2026 पर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक प्रशिक्षण सत्रात 25 सैनिक सहभागी होतील, कालावधी 4–6 दिवसांचा असेल, आणि विक्रेत्यांना उपकरणांसह प्रशिक्षकही उपलब्ध करून द्यावे लागतील. प्रशिक्षण केंद्रे: देवळाली, माहू, देहरादून आणि बंगळुरू येथे सुरु केली जातील.

ऑपरेशन सिंदूर – ड्रोन-आधारित युद्धशैलीचा टर्निंग पॉइंट

ऑपरेशन सिंदूर, जे 22 एप्रिलला पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, ज्यात 26 भारतीयांचा बळी गेला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राबवण्यात आले होते, त्यामध्ये ड्रोन्सनी मुख्य भूमिका बजावली.

 7 मे रोजी सुरू झालेल्या या कारवाईत, भारताने पाकिस्तान व पाक-व्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. नूर खान आणि राहीम्यार खान ही हवाई तळे प्रमुख लक्ष्य होती.

या मोहिमेत पहिल्यांदाच त्रिसैनिक दलांनी मोठ्या प्रमाणावर ड्रोन, देशी अचूक क्षेपणास्त्रे आणि देखरेख प्रणालींचा एकत्र वापर केला. Armed UAVs आणि Loitering Munitions यांचा वापर LeT, JeM, Hizbul Mujahideen यांच्यासारख्या गटांच्या पायाभूत सुविधांवर झाला.

काउंटर-ड्रोन क्षमतांनाही तितकेच महत्त्व

ड्रोन वापराच्या सोबतच, दुश्मनांकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर आपले Counter-Drone उपायदेखील वेगाने विकसित करत आहे.

आर्टिलरी आणि हवाई संरक्षण युनिट्सना जॅमर्स, शोध प्रणाली आणि Hard-Kill उपाय दिले जात आहेत, जे युद्धक्षेत्रात शत्रूचे ड्रोन निष्प्रभ करण्यासाठी वापरले जातील.

हा दुहेरी दृष्टिकोन – एकीकडे ड्रोन क्षमतांचा विस्तार, तर दुसरीकडे Counter-Drone उपायांचा मजबूत विकास – Multi-Domain Operations साठी लष्कराच्या नव्या दृष्टीकोनाचा भाग आहे.

ARTRAC आणि संरक्षण मंत्रालयाकडून समर्थन

याचवर्षी, आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) ने, 2027 पर्यंत प्रत्येक सैनिकाला ड्रोन ऑपरेशनचे प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बदलाला “भारतीय लष्करासाठी गेम चेंजर” असे संबोधले असून, संरक्षण मंत्रालयाकडून या उपक्रमाला भक्कम पाठिंबा मिळत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleजेव्हा रियाध अप्रत्यक्षरित्या अण्वस्त्रधारी बनले…तज्ज्ञांचे विश्लेषण
Next articleउत्तर आफ्रिका भारताच्या रडारवर: संरक्षणमंत्री लवकरच मोरोक्को दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here