अमेरिकेकडून अधिक संरक्षण उपकरणे खरेदी करा: ट्रम्प यांचा प्रस्ताव

0
ट्रम्प
PIB फाइल फोटो: बियारिट्झ, फ्रान्स 2019 मध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद स्विकारल्यानंतर, त्यांच्या पहिल्या अधिकृत संवादामध्ये, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सोमवारी फोन कॉलद्वारे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, ट्रम्प यांनी भारताने अमेरिकन सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवण्याचा आणि अमेरिकेशी संतुलित तसेच निष्पक्ष-व्यापार संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करण्याच्या प्रस्ताव मांडला.

व्हाईट हाऊसने “प्रॉडक्टिव्ह (उपयुक्त)” अशा शब्दांत या संभाषणाचे वर्णन केले. या संवादादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतील मजबूत भागीदारीसाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री आणि धोरणात्मक संबंधांची ताकद अधोरेखित करून, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या व्हाईट हाऊसला भेट देण्याच्या योजनांवरही चर्चा केली.

अमेरिका अधिक संरक्षण खरेदीसाठी प्रयत्नशील

या चर्चेदरम्यान, दोन्ही राष्ट्रातील संरक्षण संबंधांवर अधिक भर देण्यात आला. भारतीय वाचनाअंतर्गत, संरक्षण सहकार्य पुढे नेण्याबद्दल व्यापकपणे चर्चा केली गेली. तसेच अमेरिकेने सादर केलेल्या निवेदनामध्ये, भारताने युएस निर्मित सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवण्याबाबात थेट विनंती करण्यात आली.

अमेरिकेकडून भारताचे संरक्षण संपादन गेल्या दोन दशकांमध्ये लक्षणीयरीत्या वाढले आहे, ज्याचे पुष्टीकरण अलीकडेच झालेल्या $3 अब्ज प्रीडेटर ड्रोन कराराद्वारे झाले आहे. तथापि, भारताचे रशियासोबतचे संरक्षण संबंध मजबूत होत असल्याच्या कारणावरुन तसेच फ्रान्स आणि इस्रायल सारख्या गैर-अमेरिकन भागीदारांकडून भारताने केलेल्या उपकरणांच्या खरेदीमुळे, अमेरिकन अधिकारी चिंतेत आहेत. याव्यतिरिक्त, वॉशिंग्टनने “मेक इन इंडिया” उपक्रमांसाठी भारताच्या दबावाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनात असे संकेत देण्यात आले आहेत की, संयुक्त उत्पादन प्रकल्पांसह सुरक्षा सहयोग अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकेकडून वाढलेली संरक्षण खरेदी ही एक पूर्वशर्त ठरू शकते.

व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे की, ”या चर्चेदरम्यान, भारताने अमेरिकेन बनावटीच्या सुरक्षा उपकरणांची खरेदी वाढवण्यावर आणि द्विपक्षीय व्यापार संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी विशेष भर दिला.”

इंडो-पॅसिफिक आणि क्वाड भागीदारी

अमेरिकेच्या निवेदनामध्ये, इंडो-पॅसिफिक प्रदेशाची सुरक्षा आणि भागीदारीच्या संदर्भातही महत्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला. व्हाईट हाऊसने ही धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याच्या दोन्ही नेत्यांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला आणि क्वाड लीडर्स समिटचे यजमान म्हणून भारताच्या आगामी भूमिकेची नोंद केली.

भारताच्या रीडआउटमध्ये, तथापि, इंडो-पॅसिफिक किंवा क्वाडचा उल्लेख वगळण्यात आला, त्याऐवजी “जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता” या मुद्द्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक वचनबद्धतेवर यावेळी लक्ष केंद्रित केले. वगळणे हे क्वाड फ्रेमवर्कमध्ये भारताच्या सक्रिय सहभागाशी विरोधाभास आहे, ज्याचा पुरावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या क्वाड परराष्ट्र मंत्रालयात नुकत्याच झालेल्या उपस्थितीवरून दिसून येतो.

धोरणात्मक सहकार्य मजबूत करणे

चर्चेदरम्यान, दोन्ही देशाच्या नेत्यांनी सुरक्षा, व्यापार, ऊर्जा आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची सामायिक इच्छा व्यक्त केली. व्हाईट हाऊसने इंडो-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोप यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याने प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. भारताच्या विधानात “विश्वसनीय भागीदारी” वाढवणे आणि युक्रेन व पश्चिम आशियासह जागतिक बाबींवर विचारांची देवाणघेवाण करण्याबाबत आवर्जून उल्लेख केला गेला.

मोदींची संभाव्य वॉशिंग्टन भेट

फेब्रुवारीच्या मध्यात पॅरिसमध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला भेट देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी व्हाईट हाऊसचे विधान असे संकेत देते, की ‘वॉशिंग्टनमधील बैठकीची तयारी सुरू झाली आहे.’ भारताच्या अधिकृत रीडआउटने याबाबत नमूद केले आहे की, दोन्ही नेत्यांनी परस्पर सोयीच्या एका तारखेला भेटण्याचे मान्य केले असल्यामुळे, कॅलेंडर त्यारकता खुले ठेवण्यात आले आहे.’

दोन्ही बड्या नेत्यांमध्ये झालेल्या या कॉलनंतर, मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) च्या माध्यमातून आपला उत्साह व्यक्त केला:

“माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष Donald Trump आणि POTUS शी बोलून आनंद झाला. त्यांच्या दुसऱ्या ऐतिहासिक राजकीय कार्यकाळाबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्ही परस्पर फायदेशीर आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करू.”


Spread the love
Previous articleAero India 2025: MBDA Woos India With Cutting-Edge Missiles
Next articleU.N. Security Council Calls For Ceasefire In Congo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here