यू.एस. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्राम आणि क्षेत्रीय प्रभावावर चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मदतीची मागणी केली आहे, अशी माहिती ब्लूमबर्गने मंगळवारी मॉस्कोतील अज्ञात स्रोतांच्या आधारे प्राप्त झाली आहे.
रिपोर्टनुसार, 12 फेब्रुवारी रोजी पुतिन यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत, ट्रम्प यांनी इराणसोबतच्या न्यूक्लिअर चर्चांसाठी मॉस्कोला ‘मध्यस्थ’ म्हणून भूमिका निभावण्याचा प्रस्ताव मांडला.
त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी, सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचे राज्य सचिव मार्को रुबिओ आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात एक बैठक झाली, ज्यामध्ये वॉशिंग्टनने रशियाच्या तेहरानसोबतच्या राजनयिक भूमिकेबद्दल अधिक चर्चा केली.
लावरोव्ह यांचा इराण दौरा
या चर्चेच्या एका आठवड्यानंतर, लावरोव्ह यांनी तेहरानचा दौरा केला. ज्यामध्ये त्यांनी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची यांना वॉशिंग्टनसोबत झालेल्या आपल्या चर्चांबद्दल माहिती दिल्याचे ब्लूमबर्गने रिपोर्ट केले.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह, यांनी तणाव कमी करण्यासाठी मॉस्कोची तयारी असल्याचे दर्शवत सांगितले, की “अमेरिका आणि इराण यांनी सर्व समस्या चर्चेद्वारे सोडवण्याची गरज आहे. [रशिया] यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्यासाठी मॉस्को तयार आहे.”
इराणवर सर्वोच्च दबाव
डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये पदभार स्विकारल्यानंतर, इराणवरील आपले “सर्वोच्च दबाव” धोरण पुन्हा लागू केले आहे, ज्यामुळे निर्बंध अधिक तीव्र झाले आहेत आणि त्याचवेळी त्यांनी नवीन चर्चांसाठी समर्थन देखील दर्शवले आहे केले आहे.
या सर्व प्रयत्नांनंतरही, इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांनी वॉशिंग्टनसोबत कोणताही संवाद नाकारला आहे आणि इराणचे मध्यमार्गी अध्यक्ष मसूद पेझेश्कीयन, यांनी ही पुढे भूमिका टिकवून ठेवण्याची शपथ घेतली आहे.
रशिया-इराण संबंध
दरम्यान, रशिया आणि इराण यांनी पश्चिमी निर्बंधांच्या प्रतिसादात, आपले संबंध दृढ केले आहेत. मॉस्कोने युक्रेनवर आक्रमण केले आणि तेहरानने आपल्या न्यूक्लिअर महत्वाकांक्षेवर. रशियाने युक्रेनमध्ये इराणचे ड्रोन तैनात केले असून, इराणसोबत आपले लष्करी सहकार्य वाढवले आहे.
ब्लूमबर्गने सूचित केले आहे की, ‘इराण रशियाच्या माध्यमातून कोणत्याही यु.एस. राजनितीक प्रयत्नांसाठी खुले असेल का, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.’
हा रिपोर्ट तेव्हाच समोर आला, जेव्हा रॉयटर्सने प्रवास नोंदींचा आधार घेत असे उघड केले की, “2024 च्या एप्रिल आणि सप्टेंबर दरम्यान सात उच्च रँकिंग लष्करी पार्श्वभूमी असलेल्या रशियन मिसाईल तज्ञांनी, इराणला अज्ञात हेतूने भेट दिली होती.”
जरी इराण, आपला न्यूक्लिअर प्रोग्राम हा केवळ शांतता कायम करण्याच्या उद्देशांसाठी असल्याचा दावा करत असला तरी, ‘इराण न्यूक्लिअर शस्त्रास्त्रांच्या विकासाचा पाठपुरावा करीत असावा,’ अशी चिंता पश्चिमी देशांना सतावते आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज