अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या, चीनसह अमेरिका आणि रशिया या देशांच्या संरक्षण बजेटमध्ये ५०% कपात करण्याच्या प्रस्तावाला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी आपला पाठिंबा दर्शवला.
“मला वाटते ही एक चांगली कल्पना आहे. अमेरिका संरक्षण बजेटमध्ये 50% कपात करेल, आम्ही 50% कपात करू आणि वाटल्यास चीनही आमच्या या निर्णयात सामील होऊ शकतो,” असे पुतिन यांना एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी रशिया आणि चीनच्या नेत्यांसोबत, याबाबत चर्चा करण्यासाठी त्रिपक्षीय बैठकीची कल्पना मांडली होती.
13 फेब्रुवारी रोजी ट्रम्प म्हणाले होते की, “मला लवकरात लवकर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घ्यायची आहे आणि ‘आपले लष्करी बजेट निम्मे करू’ असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडायचा आहे.”
युनायटेड स्टेट्स हा जगातील सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश आहे. त्यापाठोपाठ चीनचा क्रमांक येतो. दरम्यान, रशियाने 2022 मध्ये, युक्रेनमध्ये लष्करी आक्रमण सुरू केल्यापासून त्यांच्या संरक्षण बजेटमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. खर्चात झालेल्या या वाढीमुळे आर्थिक वृद्धी झाली असली, तरी यामुळे महागाई देखील वाढली आहे.
पुतिन यांनी यापूर्वी सांगितले होते की, ‘2024 साठी रशियाचा संरक्षण आणि सुरक्षा खर्च हा देशाच्या GDP च्या अंदाजे 8.7% इतका असेल.’ सोमवारी, यावर जोर देते ते म्हणाले की, “मी चीनच्या वतीने काही बोलू शकत नसलो तरी, लष्करी खर्च कमी करण्यासाठी रशिया अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास तयार आहे.”
“आम्हाला वाटते की हा एक चांगला प्रस्ताव आहे आणि आम्ही याबद्दल चर्चेसाठी तयार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Earth Mining संबधी पुतिन यांचा प्रस्ताव
संरक्षण बजेटमध्ये कपात करण्याच्या प्रस्तावाबरोबरच, पुतिन यांनी युनायटेड स्टेट्सच्या सहकार्याने, युक्रेनमधील रशियन-व्याप्त प्रदेशांसह पृथ्वीच्या भूगर्भातील दुर्मिळ खनिज साठ्यांचा संयुक्त शोध घेण्याचा प्रस्तावही मांडला
रशियाकडे जगातील सर्वात मोठी दुर्मिळ खनिज संपत्ती आहे, जी देशाच्या उत्तर, काकेशस, सायबेरिया आणि पूर्वेतील भागांमध्ये स्थित आहे, असे पुतिन यांनी यावेळी नमूद केले. तसेच त्यांनी “नवीन प्रदेशांमधील” खनिज साठ्यांचा उल्लेखही केला, ज्यामध्ये रशियाने कब्जा केलेल्या युक्रेनमधील काही भागांचा समावेश आहे.
एक टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान, पुतीन यांनी रशियाच्या कच्च्या सामग्री खाणकामात आपल्या भागीदारांसोबत, ज्यामध्ये अमेरिका देखील समाविष्ट आहे, सहकार्य करण्याची तयारी पुन्हा व्यक्त केली.
पूर्वी, पुतिन यांनी सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत आणि औद्योगिक नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, दुर्मिळ भूगर्भ साठ्यांच्या विस्तारावर चर्चा केली होती.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुटसह)