पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची, पंतप्रधान मोदींना दिली माहिती

0

बीजिंगमधील ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)’ च्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आणि अलास्कामधील पुतिन-ट्रम्प भेटीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, ‘पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या तीन तासांच्या उच्चस्तरीय चर्चेचे तपशील फोनवरून दिले. ही भेट, युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरची पहिली प्रत्यक्ष अमेरिका-रशिया बैठक होती. मात्र, या चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाल्याचे समोर आलेले नाही.’

मोदी यांनी युक्रेन संघर्षाबाबत भारताची शांततापूर्ण तोडग्याच्या बाजूची ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट केली.

“भारताने युक्रेन संघर्षामध्ये, शांततापूर्ण उपाययोजनेचे सातत्याने समर्थन केले आहे आणि त्या दिशेने केलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला आहे,” असे मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले. त्यांनी, फोन केल्याबद्दल पुतिन यांचे आभार मानले आणि आगामी महिन्यांत रणनीतिक संवाद सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

ही चर्चा अशावेळी झाली आहे, जेव्हा SCO परिषदेच काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि वर्षाच्या अखेरीस पुतिन यांची भारत भेट देखील अपेक्षित आहे. फोनवरील संभाषणात, दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया संबंधांचा आढावा घेतला, जे “विशेष आणि विशेषाधिकारयुक्त रणनीतिक भागीदारी” या दोन्ही देशांनी वापरलेल्या संज्ञेअंतर्गत येतात.

युक्रेन युद्धात, भारताने कीव आणि मॉस्को दोघांशीही संवाद राखत सूक्ष्म राजनैतिक संतुलन राखले आहे. मात्र, भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल आयात सुरू ठेवल्यामुळे पाश्चात्त्य देशांकडून, विशेषतः अमेरिकेकडून, टीका वाढली आहे.

याच आठवड्यात, ट्रम्प प्रशासनाने भारताच्या काही प्रमुख निर्यात वस्तूंवर दुहेरी आयात शुल्क (tariff) लावले. अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारताकडून रशियन तेलाचे शुद्धीकरण व पुनर्निर्यात केल्यामुळे मॉस्कोच्या युद्धखर्चाला अप्रत्यक्ष सहाय्य मिळत आहे.

या निर्णयामुळे नवी दिल्लीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी या शुल्कांना “एकतर्फी व अन्यायकारक” असे म्हटले आहे. भारताने आपली ऊर्जा धोरणे राष्ट्रीय हित आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या आधारावर स्वतंत्रपणे आखल्याचे स्पष्ट केले आहे.

या सर्व तणावांच्या पार्श्वभूमीवरही, मोदी आणि पुतिन यांच्यातील फोन संवादातून रणनीतिक भागीदारी मजबूत करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळतात.

मूळ लेखिका– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleमोदी-ट्रम्प चर्चेतून बंद पडलेल्या व्यापार करारावर तोडगा निघेल का?
Next articleBLA वर अमेरिकेचा दहशतवादाचा ठसा, हेतूंबाबत प्रश्नचिन्ह कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here