चेचनियाच्या दौऱ्यात युक्रेनशी लढण्याच्या तयारीत असलेल्या सैनिकांची पुतीन यांच्याकडून पाहणी

0
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चेचन प्रजासत्ताकाचे प्रमुख रमजान कादिरोव यांनी 20 ऑगस्ट 2024 रोजी रशियाच्या गुडर्मेस येथील रशियन स्पेशल फोर्सेस विद्यापीठाला भेट दिली.  (रॉयटर्सच्या माध्यमातून स्पुटनिक/व्याचेस्लाव प्रोकोफयेव/पूल)

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चेचेन नेते रमजान कादिरोव्ह यांनी युक्रेनशी लढा देण्यासाठी तयार असलेल्या चेचन सैन्य आणि स्वयंसेवकांची पाहणी केली आहे, असे क्रेमलिनने सांगितले.
मंगळवारी ही पहाणी पार पडली.
मुस्लिमबहुल उत्तर काकेशस प्रजासत्ताक राज्यात पुतिन यांचा 13 वर्षांतील हा पहिलाच दौरा आहे.
उत्तर काकेशसमधील बहुसंख्य गट मुस्लिम आहेत. तिथे तीन मोठी इस्लामिक केंद्रे आहेत: दागेस्तान, चेचन्या आणि कराचेवो-चेर्केशिया.
युक्रेनियन सैन्याने सीमेवर आक्रमण केल्यावर दोन आठवड्यांनंतर रशिया त्यांच्या कुर्स्क प्रदेशातून युक्रेनला बाहेर काढण्यासाठी लढा देत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर रशियावरील हे सर्वात मोठे आक्रमण आहे.
पुतिन यांनी रशियन स्पेशल फोर्स युनिव्हर्सिटीमध्ये सैनिकांना सांगितले, “जोपर्यंत आमच्याकडे तुमच्यासारखे लढवय्ये आहेत, तोपर्यंत आम्ही पूर्णपणे अजिंक्य आहोत.
क्रेमलिनच्या वेबसाइटवरील अनुवादानुसार हे विद्यापीठ चेचन्याच्या गुडर्मेसमधील प्रशिक्षण शाळा आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “येथे शूटिंग रेंजवर गोळीबार करणे ही एक गोष्ट आहे, तर तुमचे जीवन आणि आरोग्य धोक्यात आणणे ही फार वेगळी गोष्ट आहे.
ते पुढे म्हणाले, “परंतु तुम्हाला पितृभूमीचे रक्षण करण्याची आंतरिक गरज आहे आणि असा निर्णय घेण्याचे धैर्य तुमच्याकडे आहे.”
खरेतर रशियन भूमीवर परदेशी कब्जा हा पुतीन आणि त्याच्या सैन्यासाठी अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे.
रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील आघाडीवर त्यांची हळूहळू परंतु स्थिर प्रगती सुरू ठेवली असली तरी घडलेला प्रकार लाजिरवाणा आहे खरा.
कथित मानवाधिकार आणि युक्रेनशी लढण्यासाठी चेचन सैन्य जमवल्याबद्दल अमेरिकेने 2020 आणि 2022 मध्ये कादिरोववर बंदी घातली.
एका स्वतंत्र बैठकीत कादिरोवने पुतीन यांना सांगितले की युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनशी लढण्यासाठी चेचनियाने सुमारे 19 हजार स्वयंसेवकांसह 47 हजारांहून अधिक सैनिक पाठवले आहेत.
विशेष म्हणजे, कादिरोवने अनेकदा स्वतःला पुतीन यांचा ‘पायदळ सैनिक’ म्हणून संबोधले आहे.
आरआयए एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार कादिरोवसारखे “पुतीन यांचे पायदळातील सैनिक” त्यांच्या विश्वासाला पात्र आहेत का? असे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राष्ट्राध्यक्ष म्हणाले – “जर माझ्याकडे असे पायदळातील अधिक सैनिक असते तर मला खूप आनंद झाला असता. पण अशा पायदळातील एका सैनिकाची किंमतही माझ्यासाठी खूप जास्त आहे.”
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleUkraine’s Largest Ever Drone Attack On Moscow
Next articlePutin Meets Troops Training To Fight Ukraine In Surprise Visit To Chechnya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here