पुतीन, मोदी यांच्याकडून ब्रिक्स परिषदेत धोरणात्मक भागीदारीवर प्रकाश

0
ब्रिक्स

मजबूत भारत-रशिया संबंधांवर भर
कझान येथे सुरू झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत रशिया आणि भारत यांच्यातील मजबूत धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाल्यावर गळाभेट घेत उभय देशांमधील मजबूत संबंध अधोरेखित केले
संघर्षांवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मोदी यांचे समर्थन
रशिया-युक्रेन संघर्षाचे निराकरण करताना पंतप्रधान मोदी यांनी चर्चेद्वारे विवाद सोडवण्याच्या भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला. “रशिया-युक्रेन समस्येसंदर्भात आम्ही सर्व बाजूंच्या संपर्कात आहोत” असे सांगून, संघर्षांवर शांततापूर्ण तोडगा काढण्यास भारत पाठिंबा देत असल्याचे त्यांनी पुतीन यांना सांगितले. भारताचा विश्वास आहे की सर्व संघर्ष संवादाद्वारे सोडवले जाऊ शकतात आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपण  नेहमीच तयार आहोत.
ब्रिक्स शिखर परिषद आणि सदस्यत्वासाठी जागतिक स्वारस्य
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या कझान येथे होणाऱ्या या जागतिक शिखर परिषदेमध्ये, या समूहाच्या वाढत्या प्रभावाबद्दल पंतप्रधानांनी  अभिनंदन केले आणि अनेक देशांनी ब्रिक्समध्ये सामील होण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले आहे हे अधोरेखित केले. शिखर परिषदेच्या शेवटी, ‘कझान घोषणापत्र’ पाच नवीन ब्रिक्स सदस्यांना औपचारिकरित्या या गटात सहभागी करून घेईल, ज्यामुळे समूहाची जागतिक व्याप्ती आणखी वाढेल.
मोदींचा या वर्षातील दुसरा रशिया दौरा
पंतप्रधान मोदींचा हा दुसरा रशिया दौरा आहे. तत्पूर्वी, जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या 22व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला ते उपस्थित होते, जिथे त्यांची पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. त्या भेटीदरम्यान, मोदी यांना क्रेमलिन येथे रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ झाले.

रेशम
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleNorth Korea-Russia Ties: South Korea May Supply Weapons To Ukraine
Next articleTop Naval Official Addresses Reports On India’s 4th Nuclear Submarine Launch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here