राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सरकार आणि त्यांची सर्वात मोठी बँक असलेल्या Sberbank ला, चीनसोबत AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे सहकार्य विकसित करण्याचे आदेश दिले आहेत.
पुतिन यांनी रशियन सरकार आणि Sberbank ला दिलेल्या याबाबतच्या सर्व सूचना, बुधवारी क्रेमलिनच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या. रशिया आपल्या BRICS भागीदारांसोबत आणि इतर देशांसोबत AI तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहकार्य करेल, असे पुतिन यांनी जाहीर केले.
त्यांनी त्यांच्या सरकारला आणि स्बेरबँकला, जे रशियाच्या AI प्रयत्नांचे नेतृत्व करतात, त्यांना “कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान संशोधन आणि विकासासाठी ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ (People’s Republic of China) सोबत पुढील सहकार्य सुनिश्चित करण्याचे” आदेश दिले.
मॉस्को मधील निर्बंध
युक्रेन विरुद्धचे युद्ध टिकवून ठेवण्यासाठी, मॉस्कोला युद्धासाठी आवश्यक असलेल्या AI तंत्रज्ञानाच्या प्रवेशावर, पश्चिमात्य देशांकडून निर्बंध लादले गेले. ज्यामुळे मायक्रोचिपच्या जगातील प्रमुख उत्पादकांनी रशियाला होत असलेला पुरवठा थांबवला. परिणामत: रशियाच्या AI महत्वाकांक्षांवर आणि वापरांवर गंभीर मर्यादा आल्या.
स्बेरबँकचे सीईओ जर्मन ग्रेफ यांनी, 2023 मध्ये मान्य केले होते की, ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs), जे AI विकासाचे आधारभूत मायक्रोचिप्स आहेत, त्यामध्ये रशियासाठी बदल करणे हे सर्वात कठीण हार्डवेअर होते. गैर-पाश्चिमात्य देशांसोबत भागीदारी करून, रशिया 21 व्या शतकातील सर्वात आश्वासक आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये युनायटेड स्टेट्सच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे.’
दरम्यान, पुतिन यांनी 11 डिसेंबर रोजी सांगितले की, नवीन AI अलायन्स हे नेटवर्क ब्रिक्स देश आणि इतर इच्छुक राज्यांमधील तज्ञांना एकत्र आणेल.
रशिया आणि चीन
रशिया सध्या यूके-आधारित टॉर्टॉईस मीडियाच्या ग्लोबल AI इंडेक्समध्ये – AI ची अंमलबजावणी, नवकल्पना आणि गुंतवणूक या निकषांच्या आधारावर, 83 देशांमध्ये 31 व्या स्थानावर आहे. ज्यामुळे रशिया हा केवळ संयुक्त राष्ट्र आणि चीनच नव्हे, तर BRICS सदस्य असलेले भारत आणि ब्राझील या देशांच्याही मागे आहे.
या वर्षी मार्चमध्ये, पुतिन यांनी रशिया-चीन चर्चांदरम्यान सांगितले होते की, मॉस्को आणि बीजिंग IT, AI आणि नेटवर्क सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक नेते बनू शकतात.
रशिया आणि चीनच्या शाश्वत विकासाची कुंजी म्हणजे, “तंत्रज्ञानातील सार्वभौमत्व सुनिश्चित करणे” आहे, असे TASS या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात नमूद करुन, त्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रशिया आणि चीनच्या संबंधांविषयी बोलताना, “आम्ही दोन्ही देशातील धोरणात्मक क्षेत्रीय भागीदारी सुधारण्याच्या मार्ग अवलंबण्याचा प्रस्ताव ठेवतो,” असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्पष्ट केले.