देशाच्या संरक्षण सज्जतेत अमूलाग्र बदलाची आवश्यकता: राजनाथ सिंह

0
राजनाथ सिंह
16 सप्टेंबर रोजी, कोलकाता येथे झालेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संबोधित करताना

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांनी भारतीय सशस्त्र दलांना पारंपरिक युद्ध सिद्धांतांच्या पलीकडे जाऊन, सायबर आणि माहिती युद्धापासून ते पर्यावरणीय आणि जैविक धोक्यांपर्यंतच्या “नव्या युगातील धोक्यांसाठी” सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

कोलकाता येथे झालेल्या ‘कम्बाईन कमांडर्स परिषदेत बोलताना (CCC)’, सिंह म्हणाले की, “वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षास्थितीमुळे लवचिक रणनीती आणि अशा युद्धाची तयारी आवश्यक आहे, जे पारंपरिक पद्धतींनुसार चालणारे नाही, आणि ज्यांचा निश्चीत कालावधी ठरलेला नाही.”

“आधुनिक युद्धे ही अनिश्चित असतात, ती किती काळ चालतील आणि किती मोठी असतील हे सांगता येत नाही. हे लक्षात घेऊन, भारताने आपली आपत्कालीन प्रतिसादक्षमता अधिक मजबूत करण्याची गरज आहे,” असेही ते म्हणाले.

एकात्मता आणि ‘संपूर्ण-राष्ट्र’ दृष्टिकोनावर भर

सिंह यांनी- लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यात अखंड एकीकरण साधण्याची, तसेच नागरी संस्थांशी अधिक जवळून समन्वय साधण्याची गरज असल्याचे सांगितले. “संयुक्त लॉजिस्टिक्स हब्स’ आणि ‘डिजिटल व्यवस्थापन प्रणाली’ यांसारख्या उपाययोजना ही दिशा योग्य असली, तरी या सगळ्याला ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या एकत्रित दृष्टिकोनातून’ अधिक व्यापक रूप देणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

स्वदेशीकरण हा राष्ट्रीय सुरक्षेचे पाया

आत्मनिर्भरता (self-reliance) हा राष्ट्रीय सुरक्षेचा पाया आहे, असे पुन्हा अधोरेखित करताना सिंह म्हणाले की: “स्वदेशीकरण केवळ सामरिक स्वायत्ततेची (strategic autonomy) हमी देत नाही, तर रोजगार निर्मिती आणि औद्योगिक वाढीलाही चालना देते.”

‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, “देशात विकसित केलेल्या प्रणालींवर आधारित लष्करी सज्जता आणि कुशल मनुष्यबळ हेच भविष्यातील भारताच्या संरक्षण धोरणाचे केंद्रबिंदू असतील.”

नवकल्पना, खरेदी सुधारणा आणि उद्योगाची भूमिका

भविष्यातील क्षमता बांधणीसाठी- नवकल्पना आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगताना, सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “एकात्मता (Jointness), आत्मनिर्भरता (Atmanirbharta) आणि नवकल्पना (Innovation)” (JAI) या मार्गदर्शक तत्त्वांवर प्रकाश टाकला. त्यांनी ‘Defence Procurement Manual 2025’ ला मंजुरी मिळाल्याची पुष्टी केली, आणि Defence Acquisition Procedure 2020 मध्येही सुधारणा सुरू असल्याचे सांगितले, जेणेकरून भविष्यातील खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होईल.

दीर्घकालीन आधुनिकीकरणाचा आराखडा

पुढील वाटचालीसंदर्भात बोलताना, सिंह यांनी उदयोन्मुख आव्हानांशी क्षमता विकासाला जोडण्यासाठी, संरचित 5 ते 10 वर्षांच्या नियोजन चक्रांच्या (planning cycles) महत्त्वावर जोर दिला. त्यांनी सांगितले की, “पंतप्रधानांनी प्रस्तावित केलेल्या “सुदर्शन चक्र” दल संरचनेचा अभ्यास करण्यासाठी एक उच्च-स्तरीय समिती नेमली आहे, ज्याचा उद्देश आधुनिक, चपळ आणि प्रतिसाद देणारे सैन्य तयार करणे आहे.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleसंरक्षण खरेदी नियामावली 2025: आत्मनिर्भरतेसाठी एक मॅन्युअल
Next articleटॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि अमेरिकेमध्ये ‘सकारात्मक’ व्यापार चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here