संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत INS Tushil भारतीय नौदलात सामील

0
INS Tushil
INS Tushil भारतीय नौदलात सहभागी होण्याचा क्षण

INS Tushil  (F 70) ही अत्याधुनिक बहु उद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका काल म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात सामील करण्यात आली. या युद्धनौकेचे नौदलात सामील होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा गौरवास्पद दाखला असल्याचे   संरक्षण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले. प्रोजेक्ट  1135.6 मालिकेतील INS Tushil ही सातवी युद्धनौका आहे.  हवा, पृष्ठभाग, पाण्याखालील आणि विद्युतचुंबकीय परिमाणांमधील कामगिरीसाठी डिझाइन केलेल्या सुधारित फॉलो-ऑन श्रेणी जहाजांपैकी ते पहिले जहाज आहे.या युद्धनौकेचे नौदलात सामील होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा गौरवास्पद दाखला असल्याचे संरक्षण मंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

ही युद्धनौका, भारत आणि रशिया यांच्यातील जी सामायिक मूल्ये, परस्पर विश्वास तसेच विशेष आणि धोरणात्मक विशेषाधिकार असलेल्या भागीदारीच्या दीर्घकालीन मैत्री संबंधातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असल्याचेही सिंह यांनी सांगितले. ‘आत्मनिर्भर भारत’ या भारताच्या संकल्पनेला रशियाने दिलेला पाठिंबा हे भारत आणि रशिया यांच्यातील गाढ मैत्रीचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे, असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले.

“हा उपक्रम भारताच्या संयुक्तरीत्या तंत्रज्ञानाच्या उत्कृष्टतेकडे जाणाऱ्या प्रवासाचे उदाहरण आहे,” असेही ते म्हणाले.

INS Tushil बद्दल…

‘तुशिल’ म्हणजे ‘संरक्षक ढाल’ असे नाव असलेले युद्धनौकेचे शिखर ‘अभेद्य कवचम’ चे (अभेद्य ढाल) प्रतीक आहे. ही युद्धनौका 1135.6 अंतर्गत अद्ययावत क्रिवाक – III श्रेणीच्या युद्धनौकांशी संबंधित आहे, ज्यातील सहा पूर्ववर्ती युद्धनौका -तीन तलवार-श्रेणी आणि तीन तेग-श्रेणी-आधीच सेवेत आहेत. भारत, रशिया आणि जेएससी रोसोबोरोनएक्सपोर्ट यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये करार झालेल्या दोन अतिरिक्त follow on जहाजांपैकी INS Tushil हे पहिले जहाज आहे.

अत्याधुनिक जहाजाची वैशिष्ट्ये
निळ्या पाण्यातील कामगिरीसाठी INS Tushil तयार केली गेली आहे. अत्याधुनिक शस्त्रे आणि विविध प्रणालींनी  सुसज्ज अशी ही युद्धनौका
* भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांसह सुसज्ज आहे.
* विस्तारीत श्रेणीसह जमिनीवरून हवेत मारा करणारी श्टिल क्षेपणास्त्रे.
* अद्ययावत मध्यम पल्ल्याच्या बंदुका, पाणबुडीविरोधी टॉरपीडो आणि रॉकेट.
* प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, गुप्त तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संभाषण संच.

हे जहाज कामोव 28 आणि कामोव 31 हेलिकॉप्टर्स देखील तैनात करू शकते, ज्यामुळे त्याची पाणबुडीविरोधी आणि हवाई पूर्वसूचना क्षमता वाढते. advanced gas turbine propulsion system समर्थित ही युद्धनौका 30 नॉट्सपेक्षा जास्त गतीने प्रवास करू शकते, ज्यामुळे उच्च कार्यसाधकता आणि टिकून राहण्याची क्षमता मिळते.

स्वदेशी प्रणालींवर लक्ष केंद्रित

INS Tushil ही युद्धनौका स्वदेशी प्रणालींवर लक्ष केंद्रित करून उच्च टक्केवारी समाविष्ट करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते. संरक्षण उत्पादनात भारताच्या स्वावलंबनाच्या मोहिमेचे ही युद्धनौका प्रतिबिंब आहे. स्वदेशी घटकांचा या जहाजात 26 टक्के इतका वाटा आहे, जो आधीच्या नौकांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दाखवणारा आहे. प्रमुख भारतीय पुरवठादारांमध्ये – ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, केल्ट्रॉन, नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टम्स, एलकॉम मरीन, जॉन्सन कंट्रोल्स इंडिया आणि इतरांचा समावेश आहे. हा बदल भारताच्या नौदल अभियांत्रिकी क्षमतांमधील भरीव झेप दर्शवतो.

नेतृत्वगुण आणि भविष्यातील शक्यता

तोफखाना आणि क्षेपणास्त्र कामगिरीतज्ज्ञ कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील INS Tushil भारताच्या सागरी पराक्रमाला बळकटी देण्यासाठी सज्ज आहे. भारत आपल्या नौदलाच्या पदचिन्हाचा विस्तार करत असताना INS Tushil चा सहभाग ही धोरणात्मक युती मजबूत करताना आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित करते.

रवी शंकर


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here