राजनाथ सिंह आसियान संरक्षण मंत्र्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार

0

1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये (ADMM-Plus) सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज क्वालालंपूरला रवाना झाले आहेत. ते ‘एडीएमएम-प्लसच्या 15 वर्षांच्या कामगिरीबद्दल विचारमंथन आणि आगामी वाटचालीची आखणी’ या विषयावर व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करतील.

 

मुख्य सत्रापूर्वी, 31 ऑक्टोबर रोजी , दुसऱ्या आसियान-भारत संरक्षण मंत्रीस्तरीय अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व आसियान सदस्य देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. आसियान सदस्य देश आणि भारत यांच्या दरम्यान संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य आणखी मजबूत करणे आणि ‘ॲक्ट इस्ट धोरणा’ला पुढे नेणे हा या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश आहे.

या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी एडीएमएम-प्लस देशांचे संरक्षणमंत्री तसेच मलेशियाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

एडीएमएम-प्लस हा आसियान सदस्य देश ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स,  सिंगापूर, थायलंड, तिमोर लेस्ते आणि व्हिएतनाम आणि त्यांचे आठ संवादी भागीदार देश भारत, अमेरिका, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा मंच आहे.

भारत 1992 मध्ये आसियान संघटनेचा संवादी भागीदार झाला. 2010 रोजी व्हिएतनाममध्ये हनोई येथे झालेल्यख उद्घाटनपर कार्यक्रमापासून एडीएमएम-प्लस फ्रेमवर्कमध्ये भारत सक्रिय सहभागी आहे. 2017 पासून आसियान सदस्य देश आणि प्लस देशांमध्ये संरक्षण विषयक सहकार्याला अधिक चालना देण्यासाठी दर वर्षी एडीएमएम-प्लस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

एडीएमएम-प्लस कार्यक्रमाच्या आराखड्याअंतर्गत, 2024 ते 2027 या कालावधीत भारत मलेशियासह दहशतवाद विरोधी तज्ञांच्या कृतीगटाचे सहअध्यक्षपद भूषवत आहे. वर्ष 2026 मध्ये आसियान-भारत सागरी सरावाच्या दुसऱ्या वर्षीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये, राजनाथ सिंह म्हणाले की, “विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढावे यासाठी एडीएमएम-प्लस राष्ट्रांसोबत अर्थपूर्ण चर्चा” घडेल आणि भेटीदरम्यान मलेशियाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधता येईल अशी‌ अपेक्षा आहे.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDRDO Hands Over 12 Cutting-Edge Defence Technologies to Industry Partners
Next article12 अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान प्रकार DRDO कडून उद्योग भागीदारांना सुपूर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here