अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानातील सध्या सुरू असलेल्या सहकार्याचा आढावा घेण्यासाठी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हेली यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संरक्षण मंत्रालयाच्या (MoD) म्हणण्यानुसार, या संभाषणातून मुख्य क्षेत्रांमधील “उत्कृष्ट प्रगती” चा आढावा घेण्यात आला.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “दोन्ही मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याच्या मुद्यांवर थोडक्यात चर्चा केली आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये गती कायम ठेवण्याच्या गरजेवर भर दिला.”
दोन्ही नेत्यांनी electric propulsion आणि जेट इंजिन तंत्रज्ञानातील प्रगतीचा लाभ घेतला. तसेच electric propulsion विषयक स्टेटमेंट ऑफ इंटेंटवर (SOI) नुकत्याच झालेल्या स्वाक्षऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले.
भारताचे संरक्षण मंत्री आणि ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्यांनी electric propulsion आणि जेट इंजिन यासारख्या विशिष्ट संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या उत्कृष्ट प्रगतीचा आढावा घेतल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी पोर्ट्समाउथ येथे स्वाक्षऱ्या झालेल्या स्टेटमेंट ऑफ इंटेंटने भारतीय नौदलासाठी electric propulsion प्रणालींवरील सहकार्यासाठी पायाभरणी केली. भविष्यातील नौदल जहाजांसाठी electric propulsion क्षमतांची सह-रचना, सह-विकास आणि सह-निर्मितीसाठी एक चौकट स्थापन करणे हा या कराराचा उद्देश आहे.
याव्यतिरिक्त, मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील प्रशिक्षण संस्थांमधील लष्करी प्रशिक्षकांच्या देवाणघेवाणीसह सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. ब्रिटनने इंडो-पॅसिफिक प्रदेशावर आपले धोरणात्मक लक्ष केंद्रित केल्यामुळे, दोन्ही बाजूंचे उद्दिष्ट 2025 मध्ये संयुक्त उपक्रम राबवणे आणि सागरी संबंध मजबूत करणे हे आहे, असे मंत्रालयाने नमूद केले.
2024 हे वर्ष भारत-ब्रिटन संरक्षण आणि सामरिक संबंधांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. जानेवारीमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत ब्रिटनला भेट देणारे राजनाथ सिंह गेल्या 22 वर्षांमधील पहिले भारतीय संरक्षणमंत्री होते. त्यांच्या दौऱ्यात संरक्षण, सुरक्षा आणि औद्योगिक विकासातील सहकार्य वाढवण्यावर भर होता. भारताच्या संरक्षणमंत्र्याचा यापूर्वीचा ब्रिटन दौरा जानेवारी 2002 मध्ये झाला होता.
टीम भारतशक्ती