फ्रान्सच्या काँगोमध्ये चर्चवर झालेल्या बंडखोरांच्या हल्ल्यात, 43 ख्रिश्चन धर्मीय ठार

0

द इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने, सोमवारी काँगोच्या पूर्वेकडील भागात झालेल्या एका भीषण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बंडखोरांनी एका चर्चवर हा क्रूर हल्ला केला, ज्यामध्ये रात्रीच्या प्रार्थनेसाठी तिथे जमललेले किमान 43 ख्रिश्चन धर्मीय ठार झाल्याची माहिती, संयुक्त राष्ट्रांच्या मिशनने दिली.

रविवारी पहाटे, इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या काही बंडखोरांनी कोमांदा गावातील एका चर्चवर हल्ला केला. हे गाव इतुरी प्रांताची राजधानी बुनीयापासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर आहे. बंडखोरांनी बंदुका आणि माचे वापरून लोकांची हत्या केली आणि काही लोकांना बंदी बनवले.

IS ने त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर म्हटले आहे की, “त्यांनी सुमारे 45 उपासकांची हत्या केली आणि त्या भागातील अनेक घरे व दुकाने जाळून टाकली.”

ख्रिश्चन धर्मीयांना टार्गेट

कोमांदामधील शहर प्रशासनाचे अधिकारी जीन काटो यांनी सांगितले की, “रात्रीच्या प्रार्थनेदरम्यान उपासक चर्चमध्ये उपस्थित होते, तेव्हाच बंडखोरांनी हल्ला केला.”

कोमांदामधील मानवाधिकार कार्यकर्ते ख्रिस्तोफ मुंयांडेरू यांनी सांगितले की, “रात्री उशीरा काही वेळ गोळीबाराचा आवाज ऐकू आला, पण सुरुवातीला लोकांना वाटले की चोर आले आहेत.”

“या बंडखोरांनी ख्रिश्चन धर्मीयांना टार्गेट करुन हल्ला केला, जे त्या रात्री कॅथोलिक चर्चमध्ये राहण्यासाठी थांबले होते. दुर्दैवाने, या लोकांना माचे किंवा गोळ्यांनी मारले गेले,” असे मुंयांडेरू म्हणाले.

पोप लिओ यांच्याकडून शोकसंदेश

ज्या प्रांतात हा हल्ला झाला, तिथे अशाप्रकारे हिंसाचाराची पुनरावृत्ती झाल्याप्रकरणी, डीआर काँगोमधील संयुक्त राष्ट्र संघटना स्थिरीकरण मोहिमेने निषेध व्यक्त केला आहे.

या हल्ल्यात किमान 43 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 19 महिला आणि 9 लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती MONUSCO ने दिली. हा हल्ला इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या Allied Democratic Forces (ADF) या गटाने केल्याचे त्यांनी सांगितले.

ADF ही संघटना मूळतः शेजारील युगांडामधून उदयास आली असून, सध्या ती खनिजसंपन्न काँगोच्या पूर्व भागात सक्रिय आहे. हा गट वारंवार हल्ले अशाप्रकारचे करत असून, या भागात अनेक बंडखोर गट आपापला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी आणि संसाधनांसाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

सोमवारी पोप लिओ यांनी, या हिंसक घटनेत आपले नातेवाईक आणि मित्रांना गमावलेल्या ख्रिश्चन समुदायासाठी शोकसंदेश पाठवला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आश्वासन दिले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प- स्टारमर यांच्यातील मतभेद कायम, तरीही स्तुतीसुमनांची उधळण
Next articlePralay, India’s First Quasi-Ballistic Conventional Missile, Test-Fired Successfully

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here