भारताच्या संरक्षण मंत्रालयाने, (MoD) 100 अतिरिक्त ‘K9 वज्र-टी स्वयं-चालित तोफा’ खरेदी करण्यासाठी, लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीसोबत, 7 हजार 629 कोटी रुपयांच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. ‘K9 Vajra-T’ या प्रगत 155mm/52 कॅलिबर तोफा, ‘Hanwha Techwin’ या दक्षिण कोरिया स्थित कंपनी सोबतच्या, तंत्रज्ञान हस्तांतरण कराराअंतर्गत स्थानिक पातळीवर तयार केल्या जातील. ज्यामुळे भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” उपक्रमाला बळकटी मिळेल. K9 तोफांच्या खरेदीमुळे लष्कराच्या तोफखाना विस्ताराला आणि आधुनिकीकरणाला देखील चालना मिळेल. तसेच यामुळे भारतीय सैन्याच्या एकूण युद्ध क्षमतेत वाढ होईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाने, याविषयीच्या आपल्या विधानात असे म्हटले आहे की, 100 अतिरिक्त “K9 वज्र-T तोफखान्याची खरेदी, लष्कराच्या आधुनिकीकरणाला आणि बळकटीकरणाला उत्प्रेरित करेल आणि भारतीय सैन्याच्या एकूण ऑपरेशनल तयारीत वाढ करेल. हा अष्टपैलू तोफखाना, त्याच्या अपवादात्मक क्रॉस-कंट्री मोबिलिटीसह, भारतीय सैन्याची मारक क्षमता वाढविण्यात, अचूकतेने खोलवर हल्ला करण्यात सक्षम असेल. त्याची प्राणघातक फायर पॉवर रेंज भूभागावरील तोफखान्याची क्षमता कईक पटीने वाढवेल.”
MoD signed a contract with @larsentoubro in the presence of Defence Secretary Shri Rajesh Kumar Singh for procurement of K9 VAJRA-T Self Propelled Tracked Artillery Guns worth Rs 7628.70 cr under Buy (INDIAN) Category, boosting #IndianArmy’s firepower. These state-of-the-art… pic.twitter.com/7Ao4rxWAE6
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) December 20, 2024
‘K9 वज्र-T तोफा’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. जलद गतीने आणि अचूकतेने केल्या जाणाऱ्य लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी सक्षम आहेत. हे तोफखाने अत्यंत कठीण परिस्थितींमध्ये सक्षमपणे काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. या तोफा शून्याखालील मायनल तापमानातही प्रभावीपणे काम करु शकतात. ज्याचा फायदा विशेषत: अती उंच डोंगराळ भागात होऊ शकतो. ‘Line of Actual Control’ (LAC) जवळच्या, लडाख क्षेत्रातील आव्हानात्मक भूप्रदेशात या तोफांचे अनेक युनिट्स तैनात करण्यात आले आहेत.
हा खरेदी करार “बाय (इंडियन)” श्रेणीअंतर्गत व्यवहाराला पुन: अधोरेखित करतो. भारतीय लष्कराने 2017 मधील, $720 मिलियन डॉलर्सच्या करारांतर्गत, 100 K9 वज्र-टी तोफा आधीही स्वीकारल्या होत्या. मुख्यत: वाळवंटी ऑपरेशन्ससाठी डिझाइन केलेल्या या गन्सना पुढे हळूहळू अन्य भूमिकांसाठी, जसे की पर्वतीय युद्धांसाठी देखील विकसीत केले गेले.
संरक्षण मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय, ‘स्वदेशी उत्पादन क्षमतांचे सक्षमीकरण आणि सशस्त्र दलांच्या लढाईच्या तयारीत वृद्धी’ आणण्याच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा निर्णय आहे. आपल्या उच्च गती, अचूक नेम आणि अनुकूलन क्षमतेसह, K9 वज्र-टी भारतीय सेनााच्या तोफगोळा आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा पाया ठरेल. ज्यामुळे ते उदयोन्मुख धोके रोखण्यास आणि लष्कराची ऑपरेशन्स अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्यास नक्कीच सहकार्य मिळेल.