रशियाने शनिवारी क्रिमियामध्ये प्रादेशिक आणीबाणीची घोषणा केली. कारण गेल्या महिन्यात काळ्या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाण तेल गळती झाली होती, ज्यानंतर रशियन कामगारांनी केर्च सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंनी कित्येक टन दुषित वाळू आणि जमीन साफ करण्याचा कामाला सुरुवात केली. रशियाने 2014 मध्ये क्रिमिया युक्रेनकडून काबीज केले होते.
क्रिमियामध्ये रशियाने नेमलेले गव्हर्नर- मिखाईल रझवोझाएव यांनी सांगितले की, ”तेल गळतीमुळे झालेल्या प्रदूषणाच्या नवीन खुणा तात्काळ नष्ट करणे आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही नजीकच्या सेव्हस्तोपोल शहरात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, नागरिकांना आम्ही त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश आम्ही जारी केले आहेत. लवकरच याबातच्या हालचाली सुरु होतील.”
समुद्र किनाऱ्यांची सफाई
आतापर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी 86,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त दूषित वाळू आणि माती साफ केली आहे, अशी माहिती आपत्कालीन मंत्रालयाने शनिवारी दिली. काळ्या समुद्रातील तेलाची गळती दोन जुन्या टँकरमधून झाली होती, ज्यांना 15 डिसेंबर रोजी वादळाचा तडाखा बसला होता. या अपघातात एकजण बुडाला तर दुसऱ्याला गंभीर इजा झाली.
सध्या 10,000 हून अधिक लोक ग्रीष्मकालीन रिसॉर्ट अनापा आणि आसपासच्या वालुकामय समुद्रकिनाऱ्यांमधून चिकट, दुर्गंधीयुक्त इंधन तेल काढण्यासाठी काम करत आहेत. दरम्यान, पर्यावरणीय गटांनी डॉल्फिन, पोर्पोईज आणि समुद्री पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद केली आहे.
आणीबाणी मंत्रालयाने टेलीग्राम मेसेजिंग ॲपद्वारे संदेश दिला आहे की, ‘रशियामधील विस्तृत कुबान प्रदेशात आणि क्राइमियामध्ये तेलाने दूषित झालेली माती गोळा केली गेली आहे.’
तेल गळती
याप्रकरणी रशियाच्या मंत्रालयाने, एक व्हिडीओ फुटेज जारी केले आहे, ज्यामध्ये संरक्षक तटातील अनेक खोदकाम कामगार घाणीच्या पिशव्या लादत आहेत आणि इतर फावडे वापरून वाळूतून घाण काढत आहेत.
रशियाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, या आठवड्यात सुमारे 2,400 मेट्रिक टन तेल उत्पादने समुद्रात सांडली आहेत. सुरुवातीला ही गळती कमी प्रमाणात होती, जी नंतर वाढत गेली.
जेव्हा आपत्ती आली, तेव्हा राज्य माध्यमांनी वृत्त दिले की, 50 वर्षांहून अधिक जुने दोन्ही टँकर सुमारे 9,200 मेट्रिक टन (62,000 बॅरल) तेल उत्पादने वाहून नेत होते.
गळतीमध्ये जड M100-श्रेणीचे इंधन तेल समाविष्ट होते, जे 25 अंश सेल्सिअस (77 अंश फॅरेनहाइट) तापमानात घट्ट होते आणि इतर तेल उत्पादनांप्रमाणे, पृष्ठभागावर तरंगत नाही परंतु तळाशी बुडते किंवा पाण्याच्या स्तंभात निलंबित राहते.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)