यूएस-निर्मित क्षेपणास्त्रे वापरल्यामुळे, रशियाची युक्रेनला धमकी

0
यूएस

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, रशियन सैन्याने युक्रेनच्या पूर्व लुहान्स्क भागातील नादिया गावाचा ताबा घेतला आहे आणि आठ यूएस-निर्मित ATACMS क्षेपणास्त्रे पाडली आहेत.

मंत्रालयाने सांगितले की, ‘त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने शनिवारी सकाळी रशियाच्या हद्दीत 10 युक्रेनियन ड्रोन पाडले, ज्यातील तीन उत्तर लेनिनग्राड प्रदेशातील होते.”

लवकरच पद्यच्चुत होणारे  यूएस अध्यक्ष जो बायडन, यांनी यापूर्वी कीवला रशियाविरूद्ध लांब पल्ल्याची शस्त्रे वापरण्यास उद्युक्त केले होते. या निर्णयाचा, क्रेमलिनने सुमारे तीन वर्षांच्या संघर्षाची तीव्र वाढ म्हणून निषेध केला होता.

“3 जानेवारी रोजी, युक्रेनच्या हद्दीतून यूएस-निर्मित ATACMS ऑपरेशनल-टॅक्टिकल क्षेपणास्त्रांचा वापर करून बेल्गोरोड प्रदेशावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. “कीव राजवटीच्या या कृती, ज्यांना पाश्चात्य क्युरेटर्सचे समर्थन आहे, त्यांना सूडबुद्धीने भेट दिली जाईल,” असे नमूद केले.

पुतिन यांची धमकी

मंत्रालयाने यापूर्वी अहवाल दिला होता की, ‘हवाई संरक्षणाने आठ ATACMS क्षेपणास्त्रे पाडली होती, मात्र ते केव्हा आणि कुठे घडले हे निर्दिष्ट केले नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी युक्रेनने रशियाच्या भूभागावर लांब पल्ल्याच्या पाश्चात्य शस्त्रांचा वापर सुरू ठेवल्यास हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने मध्य कीवला लक्ष्य करण्याची धमकी दिली होती.

अमेरिकेचे अध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच युक्रेनच्या अशा शस्त्रास्त्रांच्या वापरास तीव्र विरोध व्यक्त केला आणि त्यांना गेल्या महिन्यात एका मुलाखतीदरम्यान संघर्षाची “वाढ” म्हटले.

कीव आणि मॉस्को या दोन्ही देशांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच एकमेकांवर नागरिकांच्या मृत्यूचे आरोप केले आहेत. प्रादेशिक गव्हर्नर ओलेग सिनेगुबोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या सुरुवातीला, युक्रेनच्या ईशान्य खार्किव प्रदेशात रशियन हल्ल्यात 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने कीवच्या नियंत्रणाखाली असलेल्या पूर्व लुगांस्क प्रदेशातील काही उरलेल्या वस्त्यांपैकी एक, नादिया हे युक्रेनियन गाव ताब्यात घेण्याची घोषणा केली.

AFP यांनी आप्या विश्लेषणात नोंदवले आहे की, मॉस्कोने 2024 मध्ये युक्रेनमध्ये सुमारे 4,000 चौरस किलोमीटर प्रगती केली आहे, कारण कीवच्या सैन्याने सतत मनुष्यबळाची कमतरता आणि थकवा यांच्याशी संघर्ष केला.

(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleGame-Changer For India: Aero Engine Decision Expected In 2025
Next articleरशिया आणि उत्तर कोरियाच्या सैन्याचे मोठे नुकसान: झेलेन्स्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here