रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती
दि. २० मे: पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क भागातील बिलोहोरीव्का या गावावर ताबा मिळविल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी केला असल्याची माहिती रशियाच्या ‘तास’ (टीएएएस) या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.
रशिया आणि युकेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. रशियाने या कारवाईला युद्ध असे न म्हणता विशेष मोहीम असे म्हटले आहे. या युद्धात मानवी वस्ती अथवा नागरिकांना लक्ष्य केले नसल्याचा दावा रशिया आणि युक्रेन दोघांकडूनही केला जात आहे. मात्र, या युद्धात आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला असून, लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. तर, युक्रेनमधील शहरे मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तीत झाली आहेत. ‘रशियाकडून आमच्यावर रोज असंख्य हल्ले होत असून, रशियाच्या लष्करी, वाहतूक आणि उर्जा संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ले करून ती नष्ट करण्याचा व रशियाची युद्धाक्षमता संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’असे युक्रेनने म्हटले आहे.
आण्विक सराव योग्यवेळी
दरम्यान, योग्य वेळ येताच रशियाचे लष्कर आपला नियोजित आण्विक सराव सुरु करेल, अशी महिती रशियाचा अध्यक्षांचे निवास्थान असलेल्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी दिली आहे. रशियाला फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेकडून हल्ल्याची भीती सतावित आहे. या तिघांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी रशियाच्या लष्कराने रणनीतीत्मक आण्विक सराव करावा, असे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रशियाच्या लष्कराला दिले होते. या बाबत माहिती विचारली असता, ‘आण्विक सराव करण्याबाबतचे आदेश रशियाच्या सरसेनापतींनी दिले आहेत. त्यामुळे योग्य वेळ येताच हा आण्विक सराव केला जाईल. मात्र, ती योग्य वेळ निवडण्याची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची आहे, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले.
विनय चाटी
(रॉयटर्स)