Samsung चे सह-CEO हान जोंग-ही यांचे ६३ व्या वर्षी निधन

0
Samsung
19 मार्च 2025 रोजी, दक्षिण कोरियातील सुवोन येथील सुवोन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी हान जोंग-ही. फोटो सौजन्य: सेओंगजून चो/ रॉयटर्स (फाइल फोटो)

दक्षिण कोरियाची तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी- Samsung इलेक्ट्रॉनिक्सने, मंगळवारी जाहीर केले की, कंपनीचे सह-CEO हान जोंग-ही यांचे, 63 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हान सॅमसंगच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल डिव्हाइस विभागाचे प्रमुख होते, तर सह-सीईओ जुन यंग-ह्यून हे कंपनीच्या चिप व्यवसायाचे निरीक्षण करत होते.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मंगळवारी एका रुग्णालयात उपचार घेत असताना हान यांचे निधन झाले. तरी अद्याप, त्यांच्या जागी कोणताही उत्तराधिकारी निश्चित झालेला नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सकाळच्या व्यापारात सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स स्थिर राहिले.

निराशाजनक कामगिरी

दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी, अलिकडच्या तिमाहीत नफा प्राप्तीत झालेली घट आणि शेअर्सच्या घसरलेल्या किमतींमुळे त्रस्त आहे, कारण AI प्रकल्पांकडून मागणी असलेल्या, प्रगत मेमरी चिप्स आणि कॉन्ट्रॅक्ट चिप उत्पादनामध्ये सॅमसंग प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मागे पडली आहे. सॅमसंगने आपला स्मार्टफोन बाजारातील सर्वोत्तम विक्रीचा मुकुटही Apple ला दिला आहे.

जवळजवळ 40 वर्षांपूर्वी, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सशी जोडल्या गेलेल्या हान यांनी, टीव्ही विक्री व्यवसायात आपली कारकीर्द घडवली. 2022 मध्ये, ते सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष आणि सीईओ बनले. हान हे कंपनीच्या बोर्ड सदस्यांपैकी एक होते.

गेल्या आठवड्यात त्यांनी सॅमसंगच्या शेअरहोल्डर बैठकीचे अध्यक्षपद भूषवले होते. ज्यामध्ये कंपनीला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उपकरणांच्या शर्यतीत आलेल्या अपयशामुळे, सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या टेक स्टॉकपैकी एक बनले होते.

बाजारातील ट्रेंड ओळखण्यात अपयश

सेमीकंडक्टर व्यवसायात, सॅमसंग एचबीएम चिप्समध्ये SK हायनिक्सच्या मागे आहे, ज्यावर Nvidia आणि इतर कंपन्या एआय ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्ससाठी अवलंबून आहेत.

“सर्वप्रथम मी ग्राहकांच्या अपेक्षांशी सुसंगत नसलेल्या शेअर परफॉर्मन्सविषयी प्रामाणिकपणे माफी मागतो. गेल्या वर्षभरात, आमची कंपनी, वेगाने विकसित होत असलेल्या AI सेमीकंडक्टर मार्केटला योग्य प्रतिसाद देण्यास अपयशी ठरली,” असे हान यांनी बैठकीदरम्यान म्हटले होते.

येत्या बुधवारी सॅमसंगच्या नवीन होम उपकरणांच्या लाँच कार्यक्रमात सहभागी होणार होते.

सॅमसंग दक्षिण कोरियाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे, जिचे बाजार भांडवल 235 बिलियन डॉलर्स आहे, जे देशाच्या मुख्य बर्सेच्या एकूण मूल्याच्या 16% च्या आसपास आहे. सुमारे 40% दक्षिण कोरियन स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांकडे सॅमसंगचे शेअर्स आहेत, असे मार्केट डेटावरुन स्पष्ट होते.

(Reuters च्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleआधुनिक युद्धक्षेत्रात ‘अनुकूलता’ हीच गुरुकिल्ली: CDS अनिल चौहान
Next articleJapan Supports Enhanced Security Cooperation With India In Indo-Pacific

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here