दुसरे F404 इंजिन HAL कडे सुपूर्द, तेजस Mk1A कार्यक्रम रुळावर येणार का?

0

अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिकने (GE) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) दुसरे F404-IN20 इंजिन सुपूर्द केले आहे. भारताच्या तेजस Mk1A लढाऊ विमान उत्पादनासाठी हे इंजिन आवश्यक असून त्यादृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. इंजिन पुरवठा सुरळीत होऊ लागल्यावर, एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो: तो म्हणजे प्रदीर्घ काळापासून विलंबित LCA चा कार्यक्रम अखेर पुन्हा सुरू होऊ शकेल का?

मार्चच्या अखेरीस पहिल्या युनिटच्या डिलिव्हरीनंतर 13 जुलै रोजी आणखी एक नवीन इंजिन भारतात पाठविण्यात आले. GE ने आता दरमहा दोन इंजिने पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून HAL च्या इच्छित विमान रोलआउट दराशी जुळण्यासाठी ते पुरेसे आहे. शिवाय याआधीच्या व्यत्ययांमुळे विमान निर्मितीच्या कामात झालेला बराचसा उशीर आता भरून काढणे शक्य होईल.

विलंब आणि पुनर्प्राप्तीचे प्रयत्न

फेब्रुवारी 2021 मध्ये स्वाक्षरी केलेल्या 48 हजार कोटी रुपयांच्या करारात 83 तेजस Mk1A विमानांचा समावेश आहे (10 ट्रेनरसह), ज्याची डिलिव्हरी 2024 मध्ये सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र ऑर्डरच्या अभावामुळे पूर्वी बंद झालेली GE ची F404 इंजिन लाइन पुन्हा सक्रिय करावी लागल्याने यात अडथळा निर्माण झाला. याशिवाय विखुरलेले विक्रेते आणि महामारीच्या काळातील विलंबांमुळे उत्पादन पुन्हा सुरू करणे अधिक गुंतागुंतीचे बनले आणि त्यामुळे इंजिन डिलिव्हरीची वेळ 18 महिन्यांहून अधिक काळ रखडली.

पहिल्या इंजिनची डिलिव्हरी करण्यामध्ये लक्षणीय विलंब झाला होता, परंतु GE च्या अलीकडील शिपमेंटवरून असे सूचित होते की पुरवठा साखळी आता पूर्वपदावर येत आहे.

HAL ने सुरुवातीला वर्षाला 16 तेजास Mk1A वितरित करण्याची योजना आखली होती, परंतु आता ती वर्षाला 24 विमाने पुरवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. इंजिनच्या उपलब्धतेमधील अडथळे आता कमी होत असल्याने कंपनी आता उत्पादन वाढवण्यास तयार असल्याचे दिसते.

भारतीय हवाई दलावर होणारा परिणाम

भारतीय हवाई दल (IAF) हा एक प्रमुख भागधारक आहे आणि 97 तेजास Mk1A विमानांसाठी अतिरिक्त मागणी करण्याची तयारी करत आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अविरत उत्पादन चक्र आवश्यक आहे. HAL ला आता आर्थिक वर्षाच्या अखेरीस 12 विमाने वितरित करू शकू अशी अपेक्षा आहे.

ए. ई. एस. ए. रडार, अद्ययावत एव्हिओनिक्स आणि वर्धित शस्त्रे क्षमता असलेले Mk1A हा प्रकार आधीच्या तेजस मॉडेल्समध्ये लक्षणीय सुधारणा दर्शवणारा आहे. त्यामुळे आयएएफच्या आधुनिकीकरण योजनांच्या दृष्टीने त्यांचा समावेश महत्त्वपूर्ण आहे.

पुरवठा साखळी बळकट करणे

इंजिन वितरणाव्यतिरिक्त, HAL आपली पुरवठा साखळी देखील बळकट करत आहे, नवीन पुरवठादार आणत आहे आणि स्थानिक उत्पादन वाढवत आहे. हा व्यापक पाया LCA साठी आवश्यक घटकांच्या एकत्रिकरणातील विलंब कमी करेल आणि पुढे जाऊन जलद असेंब्ली करणे शक्य होईल अशी अपेक्षा आहे.

भविष्याकडे बघताना

GEच्या अलीकडील इंजिन वितरणामुळे आधीच झालेला विलंब दूर होत नसला तरी त्यामुळे उमेद नक्कीच वाढवली आहे. दर महिन्याला दोन वेळा इंजिनचे वितरण हा वेग कायम ठेवल्यास, HALला  आणखी तडजोड न करता आपली वचनबद्धता पूर्ण करता येईल. याशिवाय तेजस Mk1A च्या पूर्णत्वासाठी यांची मदत होईल की नाही हे पाहणे बाकी आहे. परंतु अलीकडील घडामोडी सूचित करतात की HAL हे धोरण एका आव्हानात्मक अध्यायात बदलण्याच्या दृष्टीने आधीपेक्षा आणखी जवळ आले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleAvoiding Trade Curbs Vital For Normalisation Of Ties, India Tells China
Next articleJaishankar Meets Xi Jinping Ahead of SCO Summit, Flags Border, Terrorism and Connectivity Concerns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here