पाणबुडीविरोधी जहाज Androth चे कमिशनिंग, नौदलाला मोठी चालना

0

भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्ड येथे दुसरे पाणबुडीविरोधी युद्धनौका उथळ पाण्यातील जहाज (ASW-SWC) INS Androth चे कमिशन केले. या समारंभाचे अध्यक्षपद पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांनी भूषवले.

 

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सद्वारे (GRSE)  निर्मित INS Androth मध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री  वापरण्यात आली आहे. पाकिस्तानने अलिकडेच घेतलेल्या पाणबुडी अधिग्रहणांमुळे उथळ पाण्यातील मुकाबला करण्याबाबतची चिंता वाढत असताना त्या भागातील पाणबुडीविरोधी ऑपरेशन्ससाठी INS Androth सुसज्ज आहे.

नौदलाच्या महत्त्वाकांक्षी स्वदेशीकरण कार्यक्रमातील हे जहाज म्हणजे आणखी एक मैलाचा दगड आहे. या वर्षाच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेल्या ASW-SWC मालिकेतील पहिले जहाज INS Arnala आहे.

भारताची स्वदेशी नौदल बांधणी: 54 युद्धनौकांची बांधणी सुरू

INS Androth ही नौदल आधुनिकीकरणाच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. सध्या, भारतीय शिपयार्डमध्ये 54 जहाजांची बांधणी सुरू आहे – ही भारताच्या जहाजबांधणीच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट्स आणि पाणबुड्यांपासून ते सर्वेक्षण जहाजे, क्षेपणास्त्र नौका आणि सहाय्यक जहाजे यांचा समावेश आहे.

2828 पर्यंत, भारतीय नौदलाकडे 150 हून अधिक युद्धनौकांचा ताफा असण्याची अपेक्षा आहे, ज्यांची संख्या 2035 पर्यंत 200 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ही सर्व स्वदेशी पद्धतीने डिझाइन केलेले असून त्यांची उभारणीही स्वदेशातच होणार आहे. पाकिस्तानसारख्या प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांकडून याबाबत तीव्र विरोधाभास बघायला मिळतो कारण तो पूर्णपणे परदेशी विशेषतः चीनच्या डिझाइनवर अवलंबून राहतो.

सध्या सुरू असलेल्या प्रमुख प्रकल्पांमधील महत्त्वाचे प्रकल्प:

  • प्रोजेक्ट 17A स्टील्थ फ्रिगेट्स: 7 निलगिरी-क्लास फ्रिगेट्स बांधले जात आहेत. गेल्या वर्षी तीन – आयएनएस नीलगिरी, आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी – आधीच ताफ्यात सामील झाले आहेत.
  • एएसडब्ल्यू शॅलो वॉटर क्राफ्ट्स: एकूण 16 जहाजे, जीआरएसई कोलकाता आणि कोचीन शिपयार्डमध्ये विभागली गेली आहेत. अर्नाळा आणि अँड्रोथ नंतर, अजय सारख्या इतर जहाजांच्या समुद्री चाचण्या आधीच सुरू झाल्या आहेत.
  • सर्वेक्षण जहाजे: आयएनएस संध्याक आणि निर्देशक कार्यान्वित झाले आहेत, तर इक्षक वितरित केले गेले आहेत आणि लवकरच सेवेत दाखल होतील.
  • डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स: निस्टार आणि निपुण, भारतात बांधलेले या प्रकारचे पहिले, पाणबुडी बचाव कार्य वाढवतील. अतिरिक्त डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट देखील उत्पादनात आहेत.
  • नेक्स्ट-जनरेशन मिसाइल व्हेसल्स: कोचीमध्ये 6 जहाजे बांधली जात आहेत.
  • गस्त आणि प्रशिक्षण जहाजे: 11 नवीन गस्त जहाजे आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजे बांधली जात आहेत.

बांधकामाधीन प्रत्येक जहाज भारतीय स्टील, स्वदेशी डिझाइन आणि स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले जात आहे, ज्यामध्ये शेकडो एमएसएमई आणि संरक्षण स्टार्टअप्सचा समावेश आहे.

चीनचा नौदल विस्तार आणि पाकिस्तानचे अवलंबित्व

भारत स्वावलंबी होऊन क्षमता मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, चीन जहाजांच्या संख्येबाबत आपल्या शेजाऱ्यांना मागे टाकत आहे, जगातील सर्वात मोठ्या नौदलाचे संचालन करत आहे आणि हिंद महासागरात आपली सागरी उपस्थिती वाढवत आहे.

बीजिंग केवळ स्वतःचा ताफा वाढवत नाही तर पाकिस्तानला देखील सक्रियपणे सशस्त्र करत आहे. चीनने या त्याच्या जवळच्या प्रादेशिक मित्राला 50 युद्धनौका देण्याचे वचन दिले आहे. एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हँगोर-क्लास पाणबुडी कार्यक्रम, ज्या अंतर्गत चीनच्या युआन-क्लासच्या (टाइप 039B) निर्यात प्रकारातील आठ पाणबुड्या पाकिस्तानला दिल्या जात आहेत. आतापर्यंत, तीन सुपूर्द देखील करण्यात आल्या आहेत.

अर्थात, या पाणबुड्यांना कामगिरीविषयक मर्यादा आहेत. निर्यात निर्बंधांमुळे, चीनने जर्मन MTU ऐवजी कमी प्रगत डिझेल इंजिन (CHD-620) वापरले आहेत आणि त्यांच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) प्रणालींची कार्यक्षमता अद्याप सिद्ध झालेली नाही. याउलट, भारताच्या स्कॉर्पिन-क्लास पाणबुड्या, शांत, अधिक चपळ आणि आधुनिक सेन्सर्सने सुसज्ज, महत्त्वपूर्ण रणनीतिक फायदे देणाऱ्या आहेत.

पाकिस्तानच्या स्वतःच्या नौदलाकडे, जे सध्या सुमारे दोन डझन युद्धनौका चालवते, त्यांच्याकडे देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता नाही. त्यांच्या ताफ्यातील प्रत्येक जहाज, मग ते फ्रिगेट असो, क्षेपणास्त्र बोट असो किंवा पाणबुडी असो, ते चीन किंवा इतर देशांमधून आणले जाते.

नवोन्मेष, सार्वभौमत्व आणि प्रमाण

भारताचा दृष्टिकोन मूलभूतपणे वेगळा आहे, तो तंत्रज्ञान हस्तांतरण, औद्योगिक वाढ आणि धोरणात्मक स्वायत्ततेवर केंद्रित आहे. सोनार सिस्टीम असो, शस्त्रांचे एकत्रीकरण असो किंवा प्रणोदन प्रणाली असो, भारतीय उद्योग आता नौदल जहाजबांधणीच्या प्रत्येक पैलूला सक्रियपणे आकार देत आहे.

नौदलात अलिकडे समावेश झालेली जहाजे – अर्नाला, निस्तार, उदयगिरी, निलगिरी आणि आता Androth – या बदलाचे प्रतीक आहेत. ते केवळ ऑपरेशनल क्षमता वाढवत नाहीत तर आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनातून राष्ट्रीय उद्दिष्टांना देखील पाठिंबा देतात.

शिवाय, या स्वदेशीकरण मोहिमेचा बहुआयामी परिणाम होत आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे, रोजगार निर्माण होत आहे आणि भारतात उच्च दर्जाच्या संरक्षण नवोपक्रमांना चालना मिळत आहे.

चीन अजूनही नौदलाच्या आकारात आघाडीवर असला तरी, स्वदेशीकरण, प्रादेशिक भागीदारी आणि चपळ ऑपरेशन्सबाबत धोरणात्मकरित्या भारत या शर्यतीत पुढे आहे. त्यामुळे इंडो-पॅसिफिकमध्ये एक नवीन सागरी समीकरण आकाराला येत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या आवाहनानंतरही, इस्रायलचा गाझावर भीषण हल्ला
Next articleWhy China-Pakistan Fighter Programme Still Flies on Russian Power

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here