अल्फा डिफेन्ससोबत युद्धसामग्री उत्पादनाचे दावे सोलर एरोस्पेसने फेटाळले

0
सोलर
सोलर ग्रुपने पहिले स्वदेशी लोइटरिंग म्युनिशन, नागास्त्र-1 विकसित केले आहे.

नागपूर‌ येथील सोलर एरोस्पेस अँड डिफेन्स लिमिटेडने (एसएडीएल)  गुरुवारी स्टॉक-मार्केट ॲनालिसिस प्लॅटफॉर्मवरील एक अहवाल हा “बनावट आणि काल्पनिक” असल्याचे सांगत तो अहवाल फेटाळून लावला. सोलर कंपनीने अल्फा डिफेन्स नावाच्या एका संस्थेसोबत सीएसआयआर-एनएएलने विकसित केलेल्या लायटेरिंग म्युनिशनच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

 

भारतशक्तीशी बोलताना कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की हा अहवाल पूर्णपणे खोटा आहे. “हा बनावट आणि काल्पनिक अहवाल आहे. आम्ही कोणत्याही कंपनीसोबत कोणतीही भागीदारी किंवा सहकार्य करार केलेला नाही,” असे एसएडीएलच्या प्रवक्त्याने सांगितले, तसेच कंपनी “स्वतःची उत्पादने विकसित आणि तयार करण्यावर विश्वास ठेवते.” एसएडीएल सूत्रांनी असेही म्हटले की कंपनीने लायटेरिंग-म्युनिशन क्षेत्रात एक नवे तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित केले आहे जे लवकरच प्रदर्शित केले जाईल.

संरक्षण वर्तुळात “कामिकाझे ड्रोन” म्हणून वर्णन केलेला लोइटरिंग दारूगोळा – ही मानवरहित हवाई प्रणाली आहे जी एखाद्या क्षेत्रावर घिरट्या घालू शकते, लक्ष्य शोधू शकते आणि ऑनबोर्ड वॉरहेडचा स्फोट करून हल्ला करू शकते. अलिकडच्या वर्षांत, अशा प्रणाली जगभरातील सशस्त्र दलांसाठी विशेष पसंतीचे साधन बनल्या आहेत आणि भारत ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करत आहे.

सोलरकडून अलिकडे लष्कराने मोठी खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर अहवालावरील वाद निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी, भारतीय लष्कराने नागास्त्र-1आर लोइटरिंग दारूगोळा प्रणालीच्या सुमारे 450 युनिट्स खरेदी करण्यासाठी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड सोबत करार केला होता, जो पूर्वीच्या आपत्कालीन आदेशाचा पाठपुरावा होता. जून 2024 मध्ये, सोलरच्या नागपूर ऑपरेशन्सने, उपकंपनी इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लिमिटेडद्वारे (EEL)  लष्कराच्या आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत 480 स्वदेशी विकसित नागास्त्र-1 प्रणालींचा पहिला भाग वितरित केला.

कंपनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नागास्त्र-1 मध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त घटक स्वदेशी आहेत, ते माणसाला सहजपणे उचलून नेता येते आणि सैन्याला अचूक-प्रहार क्षमता प्रदान करणे हा त्याचा हेतू आहे. सोलर इंडस्ट्रीज विस्तारित कामगिरी आणि मोठ्या वॉरहेड क्षमतेसह प्रगत फॉलो-ऑन प्रकार, नागास्त्र-2 आणि नागास्त्र-3 विकसित करत असल्याचे वृत्त आहे. तसेच त्यांनी Medium Altitude Long Endurance (MALE) श्रेणीतील ड्रोनचे डिझाइन करून ते विकसित करण्यासाठी प्रस्ताव देखील सादर केले आहेत.

सोलर आणि बाजार अहवालात नमूद करण्यात आलेली संस्था या दोघांनीही दावा करण्यात आलेल्या भागीदारीचे वृत्त सार्वजनिकरित्या फेटाळून लावल्याने, कंपनीच्या स्वतःच्या लोइटरिंग-म्युनिशन उत्पादनाच्या नियोजित प्रात्यक्षिकावर आणि  हा अहवाल प्रकाशित करणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील पुढील स्पष्टीकरणांवर बाजार निरीक्षक आणि संरक्षण विश्लेषक बारकाईने लक्ष ठेवतील हे मात्र नक्की आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleSolar Aerospace Dismisses Claims of Joint Loitering Munition Production with Alpha Defence
Next articleचाबहार बंदर: अमेरिकन निर्बंधांमधून भारताला सहा महिन्यांची सूट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here