दक्षिण कोरियाच्या व्यापार, उद्योग आणि ऊर्जा मंत्रालयाने सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत, चिनी AI स्टार्टअप DeepSeek मधील कर्मचार्यांचा प्रवेश तात्पुरता प्रतिबंधित केला आहे. बुधवारी स्थानिक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताची पुष्टी केली. कोरियन सरकारने जनरेटिव्ह AI सेवांबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
मंगळवारी त्यांनी एक अधिसूचना जारी केली होती, ज्यात मंत्रालये आणि अन्य सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांना, कामाच्या ठिकाणी DeepSeek आणि ChatGPT सारख्या AI सेवांचा वापर करताना सावधगिरी बाळण्याबाबत आवाहन केले आहे.
काही मंत्रालयांकडून ‘डीपसीक’वर बंदी
राज्य-संचालित कोरिया हायड्रो अँड न्यूक्लियर पॉवरने सांगितले की, त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला डीपसीकसह अन्य एआय सेवांचा वापर ब्लॉक केला आहे.
संरक्षण मंत्रालयाने लष्करी वापरासाठी असलेल्या संगणकांमध्येही, डीपसीकचा प्रवेश प्रतिबंधित केला असल्याचे, एका अधिकाऱ्याने गुरुवारी स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्रालयाने, बाह्य नेटवर्कशी कनेक्ट होणाऱ्या संगणकांमध्ये देखील DeepSeek चा प्रवेश प्रतिबंधित केला आहे, अशी माहिती योनहाप न्यूज एजन्सीने दिली. दरम्यान मंत्रालयाने सांगितले की, ते विशिष्ट सुरक्षा उपायांची पुष्टी करू शकत नाही.
डीपसीकने यावरील टिप्पणीसाठी, त्यांना ईमेलद्वारे केलेल्या विनंतीला अद्याप कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.
मंत्रालयांनी ChatGPT विरुद्ध काही कायदेशीर कारवाई केली आहे की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे प्रतिबंधांमुळे, डीपसीकबद्दल चेतावनी देणारे किंवा त्यावर निर्बंध घालणारे नवीनतम सरकार अशी दक्षिण कोरियाची नवी ओळख बनली आहे.
डीपसीकचा आंतरराष्ट्रीय चौकशींशी सामना
ऑस्ट्रेलिया आणि तैवानने या आठवड्यात, त्यांच्या सर्व सरकारी उपकरणांमधील डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे, कारण चिनचे हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्टार्टअप, सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्याची सर्व स्तरात चर्चा आहे.
‘डीपसीक’ने त्याच्या गोपनीयता धोरणांबद्दल, वारकर्त्यांच्या चिंतेचे समाधानकार निराकरण न केल्यामुळे, इटलीच्या डेटा संरक्षण प्राधिकरणाने जानेवारीमध्ये डीपसीकला देशातील चॅटबॉट त्वरित अवरोधित करण्याचे आदेश दिले होते.
युरोप, अमेरिका, भारत आणि काही इतर देशांची सरकारे सुद्धा DeepSeek वापरण्याच्या परिणामांची सध्या तपासणी करत आहेत.
दक्षिण कोरियाच्या माहिती गोपनीयता वॉचडॉगने, डीपसीकला- ‘वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कशी व्यवस्थापित केली जाते’, याबद्दल विचारण्याची योजना आखली आहे.
DeepSeek ने गेल्या महिन्यात, त्याच्या नवीन AI मॉडेल्सच्या लॉन्चिंगने टेक जगतात खळबळ उडवून दिली होती. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांचे हे मॉडेल युनायटेड स्टेट्समध्ये विकसित केलेल्या उत्पादनांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक चांगले आहे आणि त्याचा खर्चही खूप कमी आहे.
AI वापरावर निर्बंध
दक्षिण कोरियचे चॅट ॲप ऑपरेटर- ‘काकाओ कॉर्पने’, सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या कर्मचाऱ्यांना डीपसीक वापरण्यापासून रोखले आहे. कंपनीने जनरेटिव्ह AI हेवीवेट OpenAI सोबत भागीदारी जाहीर केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी, एका प्रवक्त्याने याविषयी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरियन टेक कंपन्या, जनरेटिव्ह AI वापरण्याबाबत आता अधिक सुरक्षा बाळगत आहेत. AI Chispsचे निर्माते- SK Hynix ने देखील जनरेटिव्ह AI सेवांमधील प्रवेश प्रतिबंधित केला असून, आवश्यक असेल तेव्हाच त्याच्या मर्यादित वापराला परवानगी दिली आहे.
दक्षिण कोरियातील प्रमुख वेब पोर्टल- Naver ने सांगितले की, त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या बाहेरील डेटा संग्रहित करणाऱ्या जनरेटिव्ह एआय सेवांचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)