दक्षिण कोरिया: भरधाव ट्रक बाजारात घुसला, अपघातात दोघांचा मृत्यू

0
दक्षिण कोरिया

गुरुवारी, दक्षिण कोरियाच्या बुचेओन शहरातील एका बाजारामध्ये एक भरधाव ट्रक घुसला, या अपघतात 2 लोकांचा मृत्यू झाला.

दक्षिण कोरियाची राजधानी सिओलपासून, सुमारे 20 किमी पश्चिमेस असलेल्या बुचेओन येथील एका बाजारात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.55 वाजता ही घटना घडली.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, सुरुवातीला ट्रक सुमारे 28 मीटरपर्यंत मागे गेला आणि त्यानंतर अचानक वेगाने पुढच्या दिशेला बाजारात शिरला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

द चोसून डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी झालेल्या 20 जणांपैकी दोन महिलांना तात्काळ हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

किमान आठ जण या घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चालकावर गुन्हा दाखल

बुचेओन अग्निशमन दलातील अधिकारी, पार्क ग्युम-चिओन यांनी द मनिला टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तपासकर्त्यांना सांगितले की, “ट्रक सुरूवातीला सुमारे 28 मीटर (92 फूट) उलट दिशेने गेला आणि त्यानंतर सुमारे 150 मीटर (492 फूट) वेगाने पुढे गेला, बाजारात शिरताना तो अनेक लोकांना धडकला.” शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशमन प्राधिकरणाने घटनास्थळी 20 वाहने आणि 60 कर्मचारी पाठवले होते.”

साठ वर्षीय ट्रक चालकाने, अचानक वाढलेला वेग आणि ब्रेक फेल यामुळे अपघात घडल्याचे सांगितले.

द चोसून डेलीच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने तपासणीनंतर चालक मद्यधुंद अवस्थेत नसल्याची पुष्टी केली आणि अपघातादरम्यान दरवाज्याजवळ अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

चालकावर वाहतूक अपघात विशेष कायद्यांतर्गत, निष्काळजीपणामुळे मनुष्यवध आणि दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, सिओलमध्ये एका जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला होता, तर अन्य एकाला दारूच्या नशेत असलेल्या चालकाने धडक दिल्यानंतर तो जखमी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleत्रि-सेवा सराव ‘त्रिशूल 2025’ चा समारोप
Next articleअफगाणिस्तानने केले पाकिस्तानसोबतचे व्यापारी मार्ग बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here