नेतृत्व आव्हानाच्या मतभेदांमध्येही, स्टारमर यांचे लक्ष आर्थिक स्थिरतेवर केंद्रित

0

ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टारमर, यांनी गुरुवारी स्पष्ट केले की: सरकारवर टीका होत असताना आणि पक्षांतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू असतानाही, त्यांचे संपूर्ण लक्ष ब्रिटनच्या ‘आर्थिक स्थैर्यावर’ केंद्रित आहे.

ग्रेटर मँचेस्टरचे मजूर पक्षाचे महापौर- अँडी बर्नहॅम यांनी असा दावा केला की, “काही खासदारांनी त्यांना स्टारमर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यास प्रवृत्त केले होते. बर्नहॅम यांनी स्टारमर यांच्यावर टीका करताना म्हटले की, देशाला दिशा देण्यासाठी त्यांच्याकडे ठोस योजना नाही.”

या आठवड्यात बर्नहॅम यांनी स्वतःची ‘ब्रिटनसाठीची दिशा’ मांडली, ज्यामध्ये श्रीमंतांवर अधिक कर लावणे आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकरण करणे, यांसारख्या डाव्या विचारसरणीच्या प्रस्तावांचा समावेश होता. “ब्रिटनने बॉण्ड मार्केटच्या आधीन राहू नये,” असेही ते म्हणाले.

बर्नहॅम यांच्या टीकेनंतर प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देताना, स्टारमर यांनी सांगितले की: “ते महापौरांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांवर भाष्य करणार नाहीत.” मात्र, त्यांनी त्यांच्या सरकारच्या काही महत्त्वाच्या कामगिरीचा उल्लेख केला, जसे की सरकारी आरोग्य सेवेत (NHS) लाखो अतिरिक्त अपॉइंटमेंट्स देणे.

ITV ग्रॅनाडाला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी बजेटमधील शिस्तीबाबत आपल्या सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की: “आर्थिक स्थैर्य हा या सरकारचा मूलभूत स्तंभ आहे.”

कठीण काळ

गेल्या काही आठवड्यात, स्टारमर यांचा सत्ताकाळ अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे, विशेषतः त्यांनी आधुनिक ब्रिटिश इतिहासातील सर्वात मोठ्या निवडणूक विजयांपैकी एक जिंकल्यानंतर अवघ्या वर्षभरात, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

या महिन्यात, त्यांच्या उपपंतप्रधानाचा तसेच अमेरिकेतील राजदूताचा जबरदस्तीने राजीनामा घेतल्यामुळे, स्टारमर यांच्याजागी बदली नेता दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

स्टारमर यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे- अँडी बर्नहॅम यांनीही या आठवड्यातील मुलाखतीत मजूर पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याची इच्छा असल्याचे फेटाळले नाही. त्यांनी यापूर्वी दोन वेळा (2010 आणि 2015 मध्ये) नेतेपदासाठी प्रयत्न केले होते, मात्र अनुक्रमे एड मिलिबँड आणि जेरेमी कॉर्बिन यांच्याकडून पराभूत झाले.

तरीही, बर्नहॅम यांना स्टारमर यांच्याविरुद्ध जर औपचारिक नेतृत्वाचे आव्हान उभे करायचे असेल, तर काही अडचणी आहेत: सध्या ते संसद सदस्य नाहीत, आणि पंतप्रधान होण्यासाठी संसद सदस्य असणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांना आधी लोकसभा जागा मिळवावी लागेल. त्यानंतर त्या मतदारसंघात इतर पक्षांना हरवावे लागेल – हे सहज शक्य नाही, कारण सध्या मजूर पक्षाची लोकप्रियता कमी होत आहे.

सर्वेक्षणानुसार सध्या स्टारमर यांचा मजूर पक्ष, नायजेल फॅराज यांच्या पॉप्युलिस्ट ‘रिफॉर्म यूके’ पक्षाच्या तुलनेत, सुमारे 10 टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
रॉयटर्सच्या इनपुट्ससह

+ posts
Previous articleयुद्धासाठी NATO आणि EU युक्रेनचा वापर करत असल्याचा मॉस्कोचा दावा
Next articleIndia Bids Farewell to MiG-21, IAF’s Legendary Warhorse

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here