
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) सांगितले की हा भूकंप 7.7 तीव्रतेचा आणि 10 किमी (6.2 मैल) खोलीचा होता. या शक्तिशाली धक्क्यानंतर अनेक छोटे छोटे धक्के बसले आहेत.
यूएसजीएसच्या म्हणण्यानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहरापासून सुमारे 17.2 किमी अंतरावर होता. इथली लोकसंख्या सुमारे 12 लाख आहे.
जिथे अजूनही गृहयुद्ध सुरू आहे आहे त्या म्यानमारमधून नुकसान किंवा जीवितहानीबद्दल त्वरित कोणतीही माहिती मिळाली नाही.
शोध आणि बचावकार्य सुरू
म्यानमार अग्निशमन सेवा विभागाच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलेः “आम्ही शोधकार्य सुरू केले असून जीवितहानी आणि नुकसान तपासण्यासाठी यांगूनच्या आसपासच्या भागांमध्ये पोहोचत आहोत. मात्र आतापर्यंत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.”
भूकंपामुळे कोसळलेल्या इमारती आणि रस्त्यांवर विखुरलेले अवशेष मंडालेमधून करणाऱ्यात आलेल्या विविध सोशल मीडिया पोस्टमध्ये बघायला मिळाले. मात्र रॉयटर्स या पोस्टची सत्यता त्वरित करू शकले नाही.
यांगूनमध्ये संपर्क साधलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की देशातील सर्वात मोठ्या शहरातील इमारतींमधून अनेक लोक बाहेर पडले.
बॅंकॉकमध्येही घबराट
भूकंपाचा धक्का बसताच इमारतींमधील धोक्याच्या घंटा वाजायला लागल्याने रहिवाशांना मध्य बँकॉकमधील उंच इमारती आणि हॉटेल्समधून जिन्यांनी बाहेर पडावे लागले.
1 कोटी 70 लाखांहून अधिक लोकांचे रहिवासी असलेल्या ग्रेटर बँकॉक भागात उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे.
बँकॉकमधील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की लोक घाबरून रस्त्यावर धावले. तसेच जलतरण तलावातून पाणी उसळून बाहेर पडले. तिथेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. मात्र, इमारतींना हादरे बसल्याने भूकंपाच्या तीव्रतेमुळे छतावरील तलावांमधून पाणी वाहून गेले.
भारतातही जाणवला धक्का
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतातील दिल्ली-एनसीआर आणि देशाच्या इतर भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपप्रवण म्यानमार
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी 9 मार्च रोजी म्यानमारमध्ये 125 किमी खोलीवर 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याच्या काहीच दिवस आधी, 3 मार्च रोजी, या भागात 4.2 तीव्रतेचा आणखी एक भूकंप नोंदवला गेला होता.
अशा प्रकारचे कमी तीव्रतेचे धक्के, खोल भूकंपांपेक्षा अधिक विध्वंसक असतात, कारण ते पृष्ठभागाच्या जवळ अधिक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे जमिनीला जोरदार धक्का बसतो आणि संरचनात्मक नुकसान होते.
अत्यंत भूकंपप्रवण प्रदेश असूनही म्यानमारमध्ये अधिकृत राष्ट्रीय संस्थांचा अभाव आहे.
युरेशियन आणि इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट्समध्ये सुरू असलेल्या टक्करींमुळे देश भूकंपाच्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहे.
आंतरराष्ट्रीय भूकंपशास्त्रीय केंद्राकडून मिळालेल्या आकडेवारीवरून असे सूचित होते की म्यानमार आणि त्याच्या आसपासच्या भागात दरवर्षी 3 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे अंदाजे 140 भूकंप होतात.
या भूकंपाच्या क्रियांमुळे म्यानमारच्या विस्तृत किनारपट्टीवर संभाव्य त्सुनामीच्या धोक्यांसह महत्त्वपूर्ण जोखीम निर्माण झाली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)