Syria मध्ये ‘मुलींना शिक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार आहे’ असे म्हणत, सीरियाच्या नवीन राज्यकर्त्यांनी मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यावर कुठलेही निर्बंध घालणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
‘सीरिया पुढील आठवड्यापासून आपल्या शैक्षणिक प्रणालीमधून, तिथल्या आधीच्या सरकारचे सर्व नियम हटवणार आहे. मात्र हे करतेवेळी शालेय अभ्यासक्रमामध्ये अन्य कोणताही बदल केला जाणार नाही किंवा मुलींच्या शिक्षणाच्या हक्कावर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही,’ असे सीरियाच्या नवीन शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
“शिक्षण हे सिरियातील नागरिकांसाठी, अन्न आणि पाण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे”, असे वक्तव्य नवे शासक- नाझीर मोहम्मद अल-कादरी यांनी दमिश्कमधील त्यांच्या कार्यालयातून एका मुलाखतीदरम्यान केले.
“शिक्षणाचा हक्क हा एका विशिष्ट जेंडर पुरता मर्यादित नाही. आमच्या शाळांमध्ये मुलांपेक्षा अधिक मुली असू शकतात आणि या गोष्टीचे आम्ही स्वागत करु” असे ते यावेळी म्हणाले.
धर्मनिरपेक्ष, पॅन-अरब राष्ट्रवादी बाथ पार्टीने, 1963 च्या सत्तापालटानंतर सीरियावर अनेक वर्ष राज्य केले. त्यावेळी त्यांनी देशाच्या हुकूमशाही शासन व्यवस्थेबद्दल तरुणांमध्ये निष्ठा निर्माण करण्यासाठी, शिक्षण व्यवस्थेचा एक महत्वपूर्ण साधन म्हणून उपयोग केला.
‘हयात तहरीर अल-शाम (HTS)’ या इस्लामी बंडखोर गटाने, 8 डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पदच्युत केले होते. असद यांच्या पतनानंतर HTS, सीरियात इस्लामवादी शासनाचे पुराणमतवादी स्वरूप लागू करू शकतात, अशी भीती काही स्थानिकांच्या मनात होती. मात्र कादरींच्या योजना आणि त्यांचा दृष्टिकोन मुळात सौम्य आणि मापदंड असलेला आहे.
सीरिया दीर्घ काळापासून अरबी जगातील एक मजबूत शिक्षण प्रणाली असलेल्या देशापैकी एक मानला जातो. आणि त्याची ही प्रतिष्ठा 13 वर्षांच्या नागरी युद्धातही मोठ्या प्रमाणात टिकून राहिली आहे.
कादरी यांनी सांगितले की, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म हे दोन्ही शाळांमध्ये एक विषय म्हणून शिकवले जातील. प्राथमिक शाळांमध्ये मुली आणि मुलं एकत्र शिकतील, तर माध्यमिक शिक्षण हे विभाजितच राहील.
कादरी पुढे म्हणाले, की “पूर्वीपासूनच प्राथमिक शिक्षणनांतर, मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगवेगळ्या शाळा होत्या. आम्ही या व्यवस्थेमध्ये कुठलाही बदल करणार नाही”. कादरी यांनी नुकताच त्यांच्या भव्य अशा सजवलेल्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
दरम्यान सीरियाच्या नवीन राज्यकर्त्यांनी, त्यांच्या माजी अल-कायदाशी असलेल्या संबंधांना पूर्णपणे नकार दिला. त्यांनी असे सांगितले, की सीरियातील सर्व अल्पसंख्याक गट, ज्यामध्ये कुर्द, ख्रिश्चन, द्रूझ आणि अलवाइट यांचा समावेश आहे, त्यांना समान हक्क दिले जातील. कारण सिरीयाच्या पुनर्निर्माणावर आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे, हे आमच्या नव्या सरकारचे उद्दिष्ट आहे.
सीरिया सध्या बंडखोरांच्या आणि पश्चिमी देशांच्या प्रतिबंधांखाली आहे. त्यामुळे त्यांना अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या गृह युद्धात तिथली अनेक शहरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे देशातील एकूण 18 हजार शाळांपैकी, जवळपास निम्म्या शाळा खराब अथवा नष्ट झाल्या असल्याचे, कादरी यांनी सांगितले.
नवीन सरकारच्या मंत्रीमंडळातील बहुतेक मंत्री, हे 30 ते 40 वयोगटातील तरुण आहेत. तर 54 वर्षीय कादरी हे या सरकारमधील सर्वात सिनिअर मंत्र्यांपैकी एक आहेत. दमिश्कमध्ये जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या कादरींना, 2008 मध्ये असद सरकारने, अतिरेकी संघर्ष भडकवण्याच्या खोट्या आरोपावरुन तुरुंगात डांबले होते. ज्यामुळे त्यांना आपले बॅचलर डिग्रीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते.
त्यानंतर दहा वर्षांनी ते सीरिया सोडून उत्तर इदलीबला पळून गेले. ज्यावेळी ते हयात तहरीर अल-शामच्या नियंत्रणाखाली होते. अखेर 2022 मध्ये त्यांना त्या क्षेत्राच्या तात्कालिन सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.