एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने, 12 मार्च रोजी ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावर ‘तेजस LCA AF MK1’ प्रोटोटाईप लढाऊ विमानातून, स्वदेशी ASTRA बियाँड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एअर मिसाईलची (BVRAAM) यशस्वी चाचणी करण्यात आली.
“चाचणी-प्रक्षेपणाच्यावेळी मिसाईलचा उडणार्या लक्ष्यावरील थेट प्रहार पाहायला मिळाला. ‘सर्व उपप्रणालींनी यावेळी सगळ्या मिशन पॅरामीटर्स आणि उद्दिष्टांची अचूकपणे पूर्तता केली,’ असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे (DRDO) डिझाइन आणि विकसित केलेली, ‘ASTRA BVRAAM मिसाईल्स 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरापर्यंतचे लक्ष्य साधू शकते. प्रगत मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन सिस्टम्ससह सुसज्ज असलेल्या या मिसाईलमुळे, टार्गेट निश्चीत करुन ते नष्ट करण्याची अचूकता वाढली आहे. या मिसाईलला भारतीय वायुसेनेत (IAF) आधीच समाविष्ट करण्यात आले आहे.
“यशस्वी चाचणी-प्रक्षेपण LCA AF MK1A व्हेरियंटच्या समावेशाकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ASTRA मिसाईलने यापूर्वी, पहिल्या पिढीचे तेजस LCA आणि सुखोई 30 MKI लढाऊ विमानांद्वारे यशस्वी चाचण्या पार केल्या आहेत.
Aeronautical Development Agency (ADA) successfully test-fired the #ASTRA Beyond Visual Range Air-to-Air Missile (BVRAAM) from the LCA AF MK1 prototype off Chandipur, Odisha today. The missile achieved a direct hit on a flying target, validating its advanced guidance &… pic.twitter.com/tMlVuyuEwc
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) March 12, 2025
अधिकृत निवेदनानुसार, मिसाईलच्या कार्यप्रदर्शनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणखी काही चाचण्यांची योजना करण्यात आली आहे.
या यशाचे श्रेय ADA, DRDO, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), CEMILAC, DG-AQA, IAF आणि चाचणी श्रेणी संघासह एकत्रित टीमचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या कठोर परिश्रमांचे परिणाम आहेत. निवेदनानुसार, कार्यप्रदर्शन मूल्यांकनासाठी पुढील चाचण्यांची योजना करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, DRDO, IAF, ADA, HAL आणि चाचणी प्रक्रियेत सहभागी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांना त्यांच्या समर्पण आणि योगदानाबद्दल कौतुक केले.
टीम भारतशक्ती