थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील संघर्षामागचे कारण काय?

0
थायलंड आणि कंबोडियामधील प्रादेशिक वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले असून यामध्ये किमान नऊ थाई नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही आग्नेय आशियाई शेजारी देश राजनैतिक संघर्षाला तोंड देत आहेत.

हवाई हल्ले, तोफांचा मारा आणि सीमेवर हजारो लोक विस्थापित झाल्यामुळे, हे संकट गेल्या दशकातील सर्वात गंभीर वाढ दर्शवते. पण लढाई नेमकी कशामुळे सुरू झाली आणि या भूभागाबद्दल इतका तीव्र वाद का निर्माण झाला आहे?

नेमके काय घडले?

गुरूवारी, थाई आणि कंबोडिया यांच्यातील सैन्यात सामायिक सीमेवर अनेक ठिकाणी गोळीबार झाला. थाई सरकारने पुष्टी केली की यामध्ये नऊ नागरिक ठार झाले आणि किमान 14 जण जखमी झाले. कंबोडियाने मात्र अधिकृत मृतांची संख्या जाहीर केलेली नाही. दोन्ही देशांकडून समोरच्याने संघर्ष सुरू केल्याचा दावा केला जात आहे.

थाई अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉयल थाई एअर फोर्सच्या F16 विमानांनी कंबोडियन लष्करी स्थानांवर लक्ष्यित हल्ले केले, तर कंबोडियाने BM-21 ग्रॅड सिस्टीम वापरून रॉकेट हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले. या आधीही उभय देशांमध्ये अनेकदा चकमकींपासून तीव्र हिंसाचाराच्या घटना बघायल्या मिळाल्या असल्या तरी त्यात क्वचितच हवाई दलाचा वापर करण्यात आला होता किंवा नागरिकांवर इतका मोठा परिणाम झाला होता.

या घटनेनंतर दोन्ही देशांनी आपापल्या राजदूतांना परत बोलावले आहे, नागरिकांच्या सीमा ओलांडण्यावर बंदी घातली आहे आणि व्यापार स्थगित केला आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे संकेत मिळत आहेत.

दीर्घकालीन वादाचे मूळ कारण काय?

या संघर्षातील मुख्य मुद्दा केवळ सीमारेषेचा नाही – हा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या मंदिरे आणि वसाहतकालीन काळातील अस्पष्ट नकाशांवर केंद्रित शतकानुशतके जुना संघर्ष आहे.

या वादाच्या केंद्रस्थानी डांगरेक पर्वतांमधील एका कड्यावर वसलेले एक प्राचीन हिंदू अभयारण्य प्रेह विहार मंदिर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) 1962 च्या ऐतिहासिक निर्णयात कंबोडियाला हे मंदिर बहाल केले असले तरी, आजूबाजूचा सुमारे 4.6 चौरस किलोमीटरचा प्रदेश अजूनही वादग्रस्त आहे.

2008 मध्ये, कंबोडियाने प्रेह विहारला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला. कारण यावर थायलंडने आक्षेप घेतला आणि आपल्या भूभागावर कंबोडियाने अतिक्रमण केल्याचा आरोप केला. या मतभेदामुळे वर्षानुवर्षे तुरळक हिंसाचार सुरूच होता, 2011 मध्ये तोफांच्या माऱ्यामुळे झालेल्या चकमकीत डझनभराहून अधिक लोक मारले गेले आणि हजारो लोकांना  घरे सोडून जाण्यास भाग पाडले गेले.

2013 मध्ये आयसीजेने मंदिर आणि त्याच्या परिसरावर कंबोडियन सार्वभौमत्वाची पुष्टी करणारे स्पष्टीकरण दिले असले तरी, बफर झोन आणि ता मोन थॉम तसेच ता मुएन थॉम सारख्या जवळच्या मंदिरांबद्दलच्या अनुत्तरित प्रश्नांमुळे सीमेवरील तणाव अजूनच वाढला आहे.

नवीन हिंसाचार कशामुळे झाला?

मे 2025 मध्ये थायलंड, कंबोडिया आणि लाओस एकत्र येणा-या दुर्गम प्रदेशातील एमराल्ड ट्रँगलजवळ एका कंबोडियन सैनिकाची हत्या झाल्यानंतर पुन्हा तणाव निर्माण होऊ लागला. त्यानंतरच्या आठवड्यात, वादग्रस्त भागात भूसुरुंग स्फोटांमुळे अनेक थाई सैनिक जखमी झाले, ज्यापैकी एका सैनिकाला पाय गमवावा लागला.

थायलंडने कंबोडियावर ओटावा आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करून नवीन भूसुरुंग पेरल्याचा आरोप केला. ओटावा करार अशा भूसुरुंगाच्या वापर आणि उत्पादनावर बंदी आहे. कंबोडियाने हा आरोप फेटाळून लावला, भूतकाळातील संघर्ष आणि  दशकांपासून सुरू असलेल्या अशांततेतील न फुटलेल्या शस्त्रांना दोष दिला आणि हे भूसुरुंग कंबोडियन भूमीवर असल्याचे प्रतिपादन केले.

24 जुलै रोजी या संघर्षाने कळस गाठला, जेव्हा थायलंडने वादग्रस्त मंदिरांजवळील कंबोडियन लष्करी स्थळांवर हवाई हल्ले सुरू केले. कंबोडियाने थायलंडच्या सुरिन प्रांतातील नागरी भागात तोफांचा जोरदार मारा करून प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

परिणाम काय?

मानवी बळींची संख्या वाढत आहेत. थाई अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की सीमावर्ती गावांमधून 40 हजारांहून अधिक नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आता रहिवासी राहत आहेत, रुग्णालये पुढील हल्ल्यांच्या अपेक्षेने रुग्णांना स्थलांतरित करत आहेत.

राजनैतिकदृष्ट्या, परिणाम जलद झाला आहे. दोन्ही देशांनी त्यांचे संबंध कमी केले आहेत, राजदूतांना माघारी बोलावले आहे आणि व्यापारी संबंध तोडले आहेत. कंबोडियाने सांस्कृतिक आणि आर्थिक बंदी लादून, थाई माध्यमांची आयात, उत्पादन, इंधन आणि अगदी वीज पुरवठा करार थांबवून पुढील कारवाई केली आहे.

थायलंडमध्ये, संघर्षाने सरकारला हादरवून टाकले आहे. माजी कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी झालेल्या फोन कॉलनंतर – जो नंतर लीक करण्यात आला –  पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा यांना निलंबित करण्यात आले होते, ज्यामुळे लष्करी कारवायांसाठीच्या त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांच्या जागी, कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी  कमान सांभाळली असून आंतरराष्ट्रीय कायदा पाळण्याचे वचन दिले आहे परंतु वाढत्या राष्ट्रवादाच्या भावनांमुळे ते देखील दबावाखाली आहेत.

ही सीमा परिभाषित करणे इतके कठीण का आहे?

थायलंड-कंबोडिया सीमा 817 किलोमीटर लांबीची आहे, त्यातील बराचसा भाग फ्रेंच वसाहतकालीन सीमांवर आधारित आहे जो अनेक प्रदेशांमध्ये चुकीच्या पद्धतीने परिभाषित केला जातो. खडकाळ, जंगली भूभाग गस्त घालण्यास गुंतागुंतीचा बनवतो. याशिवाय स्पष्टपणे चिन्हांकित सीमा नसल्यामुळे वाद निर्माण होतात.

ज्यामुळे वाद निर्माण झाला ती  मंदिरे केवळ प्राचीन स्मारकेच नाहीत तर दोन्ही देशांसाठी राष्ट्रीय ओळखीचे शक्तिशाली प्रतीक देखील आहेत. त्यामुळे, त्यांच्या नियंत्रणासंदर्भातील कोणताही धोका त्वरीत देशांतर्गत अभिमानाचा आणि राजकीय अस्थिरतेचा विषय बनतो.

द्विपक्षीय सीमा आयोग आणि आसियान मध्यस्थीच्या अनेक प्रयत्नांनंतरही, अंतर्गत राजकारण आणि परस्पर अविश्वासामुळे यासंदर्भात  तोडगा काढण्याचे प्रयत्न वारंवार थांबतात.

यानंतर आणखी व्यापक संघर्ष निर्माण होऊ शकतो का?

तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की दोन्ही देशांना पूर्णपणे युद्ध सुरू करण्यात रस नसला तरी परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. लढाऊ विमाने, तोफखाना यंत्रणा आणि ड्रोनचा वापर, हे सर्व दाट लोकवस्तीच्या भागात तैनात केल्याने चुकीचा अंदाज लावण्याचा धोका जास्त आहे.

स्पष्ट संवाद माध्यमांचा अभाव आणि तणाव वाढण्याची गती यामुळे प्रादेशिक निरीक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कोणतीही चर्चा नियोजित नसल्यामुळे आणि दोन्ही सैन्य उच्च सतर्कतेवर असल्याने, स्थानिक चकमकी कायम राहू शकतात किंवा तीव्र होऊ शकतात.

पुढे काय होईल?

आंतरराष्ट्रीय मध्यस्थीसाठी – कदाचित आसियान किंवा संयुक्त राष्ट्रांद्वारे – मागणी वाढत आहे, परंतु थायलंड किंवा कंबोडियाने अधिकृतपणे बाहेरील हस्तक्षेपासाठी कोणतीही विनंती केलेली नाही.

तोपर्यंत, सीमावर्ती भागातील नागरिकांचा जीव धोक्यात आहे, व्यापार ठप्प आहे आणि राजनैतिक संबंध तुटलेले आहेत. जग पाहत असताना, आव्हान कायम आहे, दशकांपासून सुरू असलेला संघर्ष कसा कमी करायचा जो सध्या प्राणघातक हल्ल्यांमुळे आणखी पेटला आहे याकडेच सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleMDL आणि नेव्हल ग्रुप प्रोपल्शन सहकार्यामुळे भारताच्या पाणबुडी ताफ्यात वाढ
Next articleTSI Anniversary Marks Enhanced India-UK Technology and Security Collaboration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here