थायलंड: थाकसिन अचानक दुबईला रवाना, नव्या पंतप्रधानांची लवकरच निवड

0

गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या राजकीय अस्थिरतेनंतर, थायलंडची संसद शुक्रवारी नवीन पंतप्रधान निवडण्याची तयारी करत आहे. अर्थात राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती असणारे थाकसिन शिनावात्रा यांच्या अचानक आणि नाट्यमयरित्या देशाबाहेर पडण्याने मतदानावर त्याचा प्रभाव होईल अशी शक्यता निर्माण झाली होती.

 

थायलंडमधील सत्तेसाठी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या गोंधळातील मध्यवर्ती व्यक्ती, ध्रुवीकरण करणारे अब्जाधीश थाकसिन, गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या खाजगी विमानाने दुबईला रवाना झाले ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सत्ताधारी पक्ष फेऊ थाईमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

पुढच्या आठवड्यात दिल्या जाणाऱ्या न्यायालयीन निर्णयाच्या – ज्यात त्यांना तुरुंगावासाची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे – काही दिवस आधी थाक्सिन यांनी थायलंडमधून पलायन केले आहे.

नव्या नेत्याचा उदय

फेऊ थाईच्या पाठीमागील प्रेरक शक्ती असलेल्या थाकसिन यांचे प्रस्थान, न्यायालयाने त्यांची मुलगी पेटोंगटार्न शिनवात्राला नैतिक उल्लंघनासाठी पंतप्रधानपदावरून काढून टाकल्यानंतर सहा दिवसांनी झाले, ज्यामुळे सत्तेसाठी झटापट सुरू झाली असून बंडखोर पक्षाने स्वतःचे सरकार स्थापन करण्यासाठी धाडसी पवित्रा घेतला आहे.

गेल्या सहा निवडणुकांपैकी पाच निवडणुका जिंकणाऱ्या लोकप्रिय राजकीय आघाडीच्या फेऊ थाई यांनी, चार महिन्यांत नवीन निवडणुका घेण्याचे वचन देऊन संसदेतील सर्वात मोठ्या शक्तीचा पाठिंबा मिळवलेल्या माजी युतीतील भागीदार भूमजाइथाईचे आव्हान हाणून पाडण्यासाठी अथक संघर्ष केला आहे.

या गोंधळामुळे भूमजाइथाई नेते अनुतीन चार्नविराकुल शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी उभे राहिले आहेत, जिथे त्यांना पंतप्रधान होण्यासाठी खालच्या सभागृहातील निम्म्याहून अधिक सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

त्यांच्या आघाडीचे 146 खासदार आहेत आणि पीपल्स पार्टीने विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्यांना 143 मतांची हमी दिल्याने अनुतीन 247 मतांची आवश्यक मर्यादा सहज पार करू शकतात.

अंतिम शो

अनुतीन यांना अडवण्यासाठी सभागृह विसर्जित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर, फेऊ थाई यांनी गुरुवारी त्यांची युती कमकुवत करण्याचा आणखी एक शेवटचा प्रयत्न केला आणि 77 वर्षीय माजी महाधिवक्ता चैकासेम नितिसिरी यांना पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी नामांकित करण्याची घोषणा केली.

पण 76 वर्षीय सत्ता-दलाल थाकसिन त्यांच्या एकेकाळी वर्चस्व असलेल्या पक्षातील संकटादरम्यान अचानक निघून गेल्याने, राजकीयदृष्ट्या अद्याप फारशी ओळख नसलेल्या चैकासेम यांच्या यशाची शक्यता अधिकाधिक क्षीण होत चालली आहे.

एक्स वरील एका पोस्टमध्ये, थाकसिन यांनी सांगितले की ते दुबईमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आले आहेत –  जिथे त्यांनी सत्तेचा गैरवापर आणि हितसंबंधांच्या संघर्षासाठी तुरुंगवास टाळण्यासाठी 15 वर्षांपैकी बहुतेक वर्षे स्वतःहून हद्दपारी करून  घेतली.

आपण सोमवारी परतण्याची घोषणाही त्यांनी केली.

थाकसिन यांना  2023 मध्ये आठ वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी अटक करण्यात आली होती मात्र तुरुंगातील पहिल्याच रात्री, वैद्यकीय कारणास्तव त्यांना हॉस्पिटलमधील व्हीआयपी रूममध्ये हलवण्यात आले.

राजाने या उद्योगपतीच्या शिक्षेचा कालावधी एका वर्ष इतका खाली आणला आणि सहा महिन्यांच्या नजरकैदेनंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. मंगळवारी सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल की त्यांचा हॉस्पिटलमधील कार्यकाळ शिक्षेचा कालावधी  म्हणून मान्य करायचा की नाही. जर तसं झालं नाही तर मात्र त्यांना परत तुरुंगात पाठवण्यात येईल.

रंगसित विद्यापीठातील राज्यशास्त्राचे व्याख्याते वान्विचित बूनप्रोंग म्हणाले की, अनुतीन यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून थाकसिनच्या फेऊ थाईला मागे टाकले आहे.

“मला पूर्ण विश्वास आहे की अनुतीन पुढील पंतप्रधान म्हणून निवडले जातील”, असे ते म्हणाले.

“फेऊ थाईची युक्ती अंतिम प्रदर्शनासारखी आहे”, ते म्हणाले “फेऊ थाईने यासगळ्यावरच पडदा पाडला आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleव्हेनेझुएला विमाने-अमेरिकन नौदल आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात आमनेसामने
Next articleनिधी कपातीमुळे नायजेरियामध्ये उपासमारीचे प्रमाण वाढले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here