म्यानमारचा समावेश पुन्हा आसियानमध्ये व्हावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, थायलंडने सोमवारी जाहीर केले की यासंदर्भात दोन प्रादेशिक बैठकांचे नियोजन करण्यात आले असून यात त्या देशाच्या सत्ताधारी लष्करी जुंटाचे प्रतिनिधी उपस्थित असतील.
थायलंडने सांगितले की ते या आठवड्यात म्यानमार संदर्भात दोन प्रादेशिक बैठकांचे आयोजन करणार आहे ज्यामध्ये जुंटाचा किमान एक प्रतिनिधी असेल. मलेशियाच्या पंतप्रधानांनी सांगितले की म्यानमारला आसियनमध्ये पुन्हा समाविष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने या दोन बैठकांचे आयोजन केले जाणार आहे.
गुरुवारी होणाऱ्या बैठकीत म्यानमारचे प्रतिनिधी सहभागी होतील. थाई परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते निकोरनडेज बालनकुरा यांनी सांगितले की सीमा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीवर अनौपचारिक सल्लामसलत करण्यासाठी ही बैठक असेल.
म्यानमारच्या सीमा सामायिक करणाऱ्या चीन, भारत, बांगलादेश, लाओस आणि थायलंडचे प्रतिनिधीही यात सहभागी होतील.
शुक्रवारी, आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (ASEAN) “इच्छुक सदस्यांसाठी” म्यानमारवर परराष्ट्र मंत्री-स्तरीय बैठक होईल, ज्यात देशातील शांततेसाठी आसियानच्या “पंचसूत्री एकमत” योजनेवर चर्चा केली जाईल, असे निकोरनडेजने सांगितले.
शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत म्यानमारमधील जुंटा गटाचे कोणी प्रतिनिधी असतील का आणि तसे असल्यास ते कोणत्या स्तरावर असतील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सत्तापालट झाल्यापासून, आसियानने म्यानमारमधील बिगर-राजकीय प्रतिनिधींना नेते आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रादेशिक बैठकांमध्ये आमंत्रित करून लष्करी नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्यापासून रोखले आहे.
2025 मध्ये आसियनचे अध्यक्षपद भूषवणारे मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम म्हणाले की ते आसियान शांतता योजनेच्या अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहेत. म्यानमारमधील उठावानंतर लगेचच एप्रिल 2021 मध्ये ही योजना लागू केल्यापासून थोडीशी प्रगती दिसून आली आहे.
क्वालालंपूर येथे थायलंडचे पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अन्वर म्हणाले, “म्यानमारचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तसेच म्यानमारला आसियानमध्ये परत सहभागी करून घेण्यासाठी आम्ही विविध स्तरांवरील अनौपचारिक संवादाद्वारे उपाययोजना करत आहोत.
इंडोनेशियाने म्हटले आहे की त्यांचे परराष्ट्रमंत्री 20 डिसेंबरच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
2021 च्या लष्करी उठावानंतर देशव्यापी बंडखोरी आणि 55 दशलक्ष नागरिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या गृहयुद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजही म्यानमारमध्ये अराजकता पसरली आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या शिखर परिषदेत, आसियानने हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आणि ‘म्यानमारच्या नेतृत्वाखालील’ मानवतावादी सहाय्य आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय संवादासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)