कारगिल विजयाचे गमक : नाम, नमक और निशान!

0
Image Courtesy: India Today

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात फेब्रुवारी 1999मध्ये लाहोर करार झाला. उभय देशांमध्ये शांततापूर्ण आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यावर या करारात भर देण्यात आला होता. परंतु अवघ्या अडीच-तीन महिन्यांतच या कराराच्या विपरित भूमिका पाकिस्तानने घेतली आणि कारगिल युद्धाला तोंड फुटले.

पाकिस्तानचा माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ ब्रिगेडियर असताना 1986-88 या काळात भारताकडे असलेले सियाचीन आपल्या ताब्यात घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी होऊ शकले नाहीत. 1999मध्ये सियाचीनला रसद पुरवणारा मार्गच बंद करण्याची योजना मुशर्रफने आखली. तेव्हा तो लष्करप्रमुख होता. म्हणजे एकीकडे शांततेच्या गोष्टी करत असताना, दुसरीकडे पाकिस्तान युद्धाची तयारी करत होता. हाच गाफिलपणा आपल्याला नडला.

हिवाळ्यात कारगिलमध्ये भरपूर बर्फ पडत असल्याने कारगिललगतच्या सीमावर्ती भागातील पर्वतीय चौक्या भारत आणि पाकिस्तानकडून रिकाम्या केल्या जातात. पण 1999मध्ये पाकिस्तानने या चौक्या सोडल्या नाहीत. बर्फ वितळला तेव्हा ते भारतीय हद्दीत घुसून अगदी सात-आठ किलोमीटर आतमध्ये येऊन बसले. पर्वतरांगांवरील ठाणी त्यांनी ताब्यात घेतल्याने उंचावरून त्यांना हल्ला करणे सोपे झाले. म्हणून पहिले काही दिवस आपल्याला कठीण गेले. जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मेपासून सलग तीन महिने युद्ध झाले. पाकिस्तानी सैन्याला पिटाळून तो भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन विजय’ची सुरुवात केली.

कारगिल भूभाग ताब्यात घेतल्यावर सियाचीनवर ताबा मिळविणे पाकिस्तानला सोपे ठरणार होते. त्यामुळेच त्यांनी ही व्यूहरचना आखली होती आणि त्यात ते जवळपास यशस्वी होण्याची शक्यता होती. पण आपल्या वीर जवानांनी आपल्या बहादुरीने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळविले. कारगिल परिसरात झाडेझुडपे किंवा लपण्यासाठी अन्य जागा नसताना आणि डोंगरावरून गोळीबार होत असताना 10 हजार फुटांपेक्षा जास्त उंचावर चढून भारतीय जवानांनी अतुलनीय कामगिरी बजावली. भारतीय हवाई दलाची देखील त्यांना मोलाची साथ मिळाल्याने कारगिल युद्ध आपण जिंकलो. 26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन तिथे विजयी तिरंगा फडकावला. या युद्धात आपण 527 जवान गमावले. मात्र त्यांच्या या बलिदानामुळे सियाचीन, लेह-लडाख आणि कारगिल सुरक्षित आहे.

कारगिल युद्ध होण्यामागे गुप्तचर यंत्रणाचे अपयश आहे का? भारतीय जवान लढतात ते ‘नाम, नमक आणि निशान’ यासाठीच. ही त्रिसूत्री नेमकी काय आहे? पाकिस्तान सैन्य आणि भारतीय लष्कर यांच्यात काय फरक आहे? या युद्धापासून भारतीयांनी काय धडा घेतला?

या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलवर पाहा –


Spread the love
Previous articleAll Ears: PLA Recruits Hindi-speaking Tibetans, Nepalis For Interpretation, Intel-gathering Jobs Along LAC
Next articlePercentage Of Capital Expenditure On Import By Armed Forces On Decline In Last 3 Yrs: Govt Data

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here