अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे संयुक्त उपक्रमांना मिळाली चालना

0

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे सध्या, त्यांच्या अधिकृत अमेरिका दौऱ्यावर आहेत. 12 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात, त्यांनी द्विपक्षीय नौदल सहकार्य बळकट करण्याच्या आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सामायिक धोरणात्मक अजेंडा पुढे नेण्याच्या उद्देशाने अनेक उच्च-स्तरीय बैठका घेतल्या आहेत.

या महत्वपूर्ण दौऱ्यादरम्यान, ॲडमिरल त्रिपाठी यांनी अनेक उच्च-पदस्थ अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट घेत, त्यांच्याशी औपचारिक चर्चा केली, ज्यात यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे (INDOPACOM) कमांडर ॲडमिरल सॅम्युअल जे. पपारो, यूएस पॅसिफिक फ्लीटचे कमांडर ॲडमिरल स्टीफन टी., मरीन फोर्सेस पॅसिफिकचे कमांडर लेफ्टनंट जनरल जेम्स एफ. ग्लिन यांचा समावेश होता.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व चर्चांदरम्यान भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण सहकार्याच्या प्रमुख आधारस्तंभांचा आढावा घेण्यात आला. ज्यामध्ये सागरी सुरक्षा, परस्पर समन्वयासह कार्य करण्याची क्षमता आणि संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कार्यात्मक सहभागाचा विस्तार करणे या मुद्द्यांचा समावेश होता.

या चर्चांमध्ये परस्पर सागरी हिताच्या अनेक प्राधान्य क्षेत्रांचा समावेश होता, जसे की:

  • इंडो-पॅसिफिक मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस उपक्रम (IPMDA) आणि माहिती संलयन केंद्र, हिंदी महासागर क्षेत्र (IFC-IOR) यांसारख्या यंत्रणांशी संबंध जोडून, माहितीची देवाणघेवाण अधिक सखोल करणे आणि सागरी क्षेत्रातील जागरूकता (मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस) वाढवणे.
  • प्रदेशातील वाढत्या धोरणात्मक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, समुद्रातील वाहतूक मार्गांचे आणि महत्त्वपूर्ण जलक्षेत्राखालील पायाभूत सुविधांचे संरक्षण.
  • मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, शोध आणि बचाव कार्य, चाचेगिरीविरोधी मोहीमा आणि इतर अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना समन्वयित प्रतिसाद देणे.
  • द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सरावांची जटिलता आणि सातत्य वाढवणे- यामध्ये मालाबार, पॅसेक्स, आणि CMF/मिलन सारख्या चौकटीअंतर्गत उपक्रमांचा समावेश करणे, जेणेकरून संयुक्त युद्धकारवाई आणि तांत्रिक सहाय्य क्षमता वाढवणे शक्य होईल.
  • मानवरहित प्रणाली, गुप्तचर, पाळत आणि टेहळणी (ISR), सायबर आणि अंतराळ-सक्षम सागरी कार्यवाही यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्याद्वारे, कार्यात्मक सज्जता आणि लवचिकता वाढवणे.

भारतीय नौदलाने सांगितले की, या महत्वपूर्ण संवादांमुळे दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये दृढ होत असलेली भागीदारी आणि मरीन/संयुक्त दलांमध्ये वाढत असलेला समन्वय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. नौदलाने असेही नमूद केले की, सहभागाची ही पायाभरणी भारत–अमेरिकेतील परस्पर विश्वास, सामायिक लोकशाही मूल्ये तसेच मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी असलेल्या समान वचनबद्धतेवर आधारित आहे.

ॲडमिरल त्रिपाठी यांचा हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा दोन्ही प्रादेशिक सुरक्षा परिदृश्यातील बदलत्या परिस्थितीच्या दृष्टीने, विशेषतः सागरी क्षेत्रात आपले संरक्षण सहकार्य अधिकाधिक व्यापक आणि सखोल करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहेत.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleविलंब, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांची जबाबदारी संरक्षण कंपन्यांनी घ्यावी – CDS
Next articleसौदी अरेबिया: मदीना जवळील बस दुर्घटनेत 42 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here