व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती तीन सूत्रांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षपद कार्यकाळातील ही पहिली एवढी मोठी गच्छंती असल्याचे मानले जात आहे.
व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांना का कमी केले गेले किंवा त्यांची हकालपट्टी कायमस्वरूपी आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून बघताना त्यात काही समस्या असल्याचे सांगण्यात आले होते.
सूत्रांपैकी एकाने सांगितले की माध्यमांमध्ये बातम्या लीक झाल्याबद्दलदेखील चिंता होतीच. इतर दोन स्रोतांच्या मते हकालपट्टीचे उद्दीष्ट व्यापकपणे अशा अधिका-यांवर होते ज्यांचे मत ट्रम्पच्या सहयोगींच्या पसंतीसाठी हस्तक्षेप करणारे म्हणून पाहिले गेले होते.
काढून टाकण्यात आलेल्या अनेक एनएससी अधिकाऱ्यांमध्ये तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेची देखरेख करणारे वरिष्ठ संचालक डेव्हिड फेथ, गुप्तचर बाबींवर देखरेख करणारे वरिष्ठ संचालक ब्रायन वॉल्श आणि कायदेविषयक बाबींवर देखरेख करणारे थॉमस बूड्री यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
ट्रम्प आणि right-wing conspiracy theorist लॉरा लूमेर यांच्यातील ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीच्या एका दिवसानंतर या हकालपट्टीची बातमी आली आहे. लूमेर यांनी एनएससीच्या काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी अध्यक्षांना खाजगीरित्या आवाहन केले होते.
न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या बैठकीचे वृत्त सर्वप्रथम दिले, तर एक्सियोसने गुरुवारी एनएससीमधील या घडामोडींची बातमी ब्रेक केली.
लूमेर यांच्या खाजगी सूचना आणि करण्यात आलेली गच्छंती यांच्यात काही संबंध आहे का ते त्वरित स्पष्ट झालेले नाही. याशिवाय दोन सूत्रांनी सांगितले की लूमेर यांनी ट्रम्प यांची भेट घेण्यापूर्वीच काहीजणांची हकालपट्टी करण्यात आली होती.
मात्र अनेक सूत्रांच्या मते, इस्लामोफोबिक कट रचण्याचे सिद्धांत मांडणाऱ्या लूमेर यांनी ट्रम्प यांना विश्वासघातकी वाटणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांची यादी दिली. गुरुवारी लूमेर यांनी समाजमाध्यमांवर या चर्चेला मोठ्या प्रमाणात दुजोरा दिला.
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणे आणि त्यांना माझे संशोधन निष्कर्ष सादर करणे हा एक सन्मान होता,” असे लूमेर यांनी एक्सवर लिहिले.
मार्चपासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेबद्दल मोठ्या प्रमाणात नकारात्मक हेडलाईन्स प्रसिद्ध होत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज यांनी अनवधानाने सिग्नल चॅटमध्ये एका संपदकाला सहभागी करून घेतले होते. या ग्रुपमध्ये ट्रम्प यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येमेनमधील आगामी बॉम्बस्फोट मोहिमेवर चर्चा करण्यात आली होती.
या संपूर्ण प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन स्रोतांनुसार, ट्रम्प यांनी खाजगीरित्या वारंवार आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की ते वॉल्टझवर नाराज आहेत आणि सल्लागार म्हणून लवकरच ते नोकरी गमावण्याची शक्यता आहे.
मात्र अलीकडेच एका सूत्राने सांगितले की वॉल्ट्ज सध्यातरी सुरक्षित असल्याचे दिसते.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत करण्यात आलेल्या या हकालपट्टीचे अचूक परराष्ट्र धोरण परिणाम, जर काही असतील तर ते अजून तरी अस्पष्ट आहेत आणि काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांचे पोर्टफोलिओ तुलनेने थोडे एकमेकांसारखे असल्याचे दिसून आले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)