ट्रम्प शपथविधी : Ford, GM देणार 10 लाख डॉलर्स, वाहनांचा ताफा

0
ट्रम्प
5 एप्रिल 2023 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन येथे न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय ऑटो शो दरम्यान फोर्डचा लोगो झळकत आहे. (रॉयटर्स/डेव्हिड 'डी' डेलगाडो/फाईल फोटो)

 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 जानेवारीच्या शपथविधी सोहोळ्याला पाठिंबा देण्यासाठी फोर्ड मोटर कंपनी आणि जनरल मोटर्स (जीएम) प्रत्येकी 10 लाख डॉलर्स दान करणार असून आपल्या वाहनांच्या ताफाही उपलब्ध करून आपले योगदान देतील. दोन्ही कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली.

येणाऱ्या प्रशासनाद्वारे विचारात घेतलेल्या दर आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांवरील धोरणांचा परिणाम डेट्रॉईट कार उत्पादकांवर होणार आहे.

या उत्पादकांमध्ये फोर्डचाही समावेश आहे, जी बॅटरीवर चालणाऱ्या मॉडेल्समध्ये वाढ आणि विक्री होण्यासाठी धडपडत आहे.

रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडामधून होणाऱ्या आयातीवर व्यापक शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला आहे, तसेच फोर्डला लाभ देणाऱ्या ई. व्ही. कर क्रेडिटला कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम फॅर्ली यांनी या महिन्यात प्रसारमाध्यमांना सांगितले की, या निर्णयांवर कंपनीचा दृष्टीकोन ऐकण्यासाठी ट्रम्प तयार असतील अशी त्यांना आशा आहे.

“(दिलेल्या) फोर्डच्या रोजगाराचे स्वरूप आणि अमेरिकी अर्थव्यवस्था तसेच उत्पादन क्षेत्रातील महत्त्व पाहता, तुम्ही कल्पना करू शकता की प्रशासनाला फोर्डच्या दृष्टिकोनात खूप रस असेल,” अशी आशा फार्ले यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे जनरल मोटर्सने सोमवारी असेही सांगितले की ते शपथविधी कार्यक्रमासाठी 10 लाख डॉलर्सची देणगी देत असून कार्यक्रमासाठी आवश्यक वाहनेही पुरवली जातील.

ॲमेझॉन आणि मेटा प्लॅटफॉर्मसह इतर मोठ्या कंपन्यांनीही शपथविधी सोहोळ्यासाठी देणगी दिली आहे.

याआधी ट्रम्प यांनी त्यांच्या 2017च्या शपथविधी समारंभासाठी विक्रमी 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमा केले होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या 2021च्या शपथविधीसाठी फायझर, एटी अँड टी आणि बोईंगसह इतर कंपन्यांच्या योगदानासह 61.8 लाख अमेरिकन डॉलर्स जमा केले.

मेक्सिको आणि कॅनडामधून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के कर लावण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे जीएम आणि इतर अमेरिकन वाहन निर्मात्यांच्या नफ्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, तर अमेरिकन ग्राहकांसाठी एसयूव्ही आणि पिकअप ट्रकच्या किंमती वाढतील.

मेक्सिकोहून उत्तर अमेरिकेत कार निर्यात करणाऱ्या वाहननिर्मात्यांमध्ये जीएम आघाडीवर आहे.

मेक्सिकन ऑटो ट्रेड असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकन कारखाने असलेल्या पहिल्या 10 कार उत्पादकांनी एकत्रितपणे या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 14 लाख वाहने तयार केली, ज्यापैकी 90 टक्के वाहने परदेशात असणाऱ्या अमेरिकी खरेदीदारांकडे गेली.

डेट्रॉईटमधील इतर उत्पादकांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहेः जीएमनंतर फोर्ड आणि स्टेलांटिस हे मेक्सिकोमधील यूएसचे सर्वोच्च उत्पादक आहेत.

व्यवसाय विश्लेषण संस्था ग्लोबलडेटाच्या म्हणण्यानुसार, जीएम या वर्षी कॅनडा किंवा मेक्सिकोमधून 7 लाख 50 हजारांहून अधिक वाहने आयात करण्याची अपेक्षा आहे, ज्यापैकी बहुतांश सीमेच्या दक्षिणेस उत्पादित केली जातील.

यामध्ये जीएमच्या काही सर्वात लोकप्रिय वाहनांचा समावेश आहे, ज्यात सुमारे 3 लाख 70 हजार चेवी सिल्वॅराडो किंवा जीएमसी सिएरा पूर्ण आकाराच्या पिकअप्स आणि सुमारे 3 लाख 90 हजार मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा समावेश आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)

+ posts
Previous article‘शेख हसीनांना परत पाठवा’ बांगलादेशची भारताला अधिकृत विनंती
Next articlePhilippines Defends U.S. Missile Deployment Despite China’s Objections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here