हमास नेता हनियेहच्या हत्येची जबाबदारी इस्रायलने स्वीकारली

0
नेता
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल काट्झ 7 नोव्हेंबर 2024 रोजी जेरुसलेममध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष पाहताना. (रॉयटर्स/रोनेन झ्वुलुन/फाईल फोटो)

 

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सोमवारी जाहीर केले की जुलैमध्ये इराणमध्ये हमासचा नेता इस्माईल हनियेह याच्या हत्येसाठी इस्रायल जबाबदार होता. या कबुलीमुळे गाझा युद्ध आणि लेबनॉन संघर्षामुळे निर्माण झालेल्या प्रादेशिक अशांततेमध्ये आता तेहरानबरोबरच्या तणावाची भर पडली आहे.

काट्झ म्हणाले, “हल्ली, जेव्हा हुथी दहशतवादी संघटना इस्रायलवर क्षेपणास्त्रे सोडत आहे, तेव्हा मला माझ्या वक्तव्याच्या सुरुवातीलाच त्यांना एक स्पष्ट संदेश द्यायचा आहेः आम्ही हमासचा पराभव केला आहे, आम्ही हिजबुल्लाहचा पराभव केला आहे, आम्ही इराणची संरक्षण प्रणाली खिळखिळी केली असून आणि उत्पादन प्रणालीचे नुकसान केले आहे, आम्ही सीरियातील असद राजवट उलथवून टाकली आहे, आम्ही दुष्टतेच्या अक्षाला मोठा धक्का दिला आहे आणि आम्ही येमेनमधील हुथी दहशतवादी संघटनेला देखील मोठा धक्का देऊ, जी शेवटच्या स्थानावर आहे.”

“इस्रायल “त्यांच्या (या सगळ्या देशांच्या) धोरणात्मक पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचवेल. तसेच आम्ही त्यांच्या नेत्यांचे शिरच्छेद करू-जसे आम्ही तेहरान, गाझा आणि लेबनॉनमध्ये हनियेह, सिनवर आणि नस्रल्ला यांचे केले- तसे आम्ही ते होदेइदा आणि सना येथेही करू,” असे काट्झ यांनी संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सांगितले.

गाझामधील इस्रायलबरोबर  वर्षभर सुरू असणाऱ्या युद्धात पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी येमेनमधील इराण समर्थित गट एका वर्षाहून अधिक काळापासून लाल समुद्रातील व्यावसायिक नौवहन जहाजांवर हल्ला करत आहे. इस्रायली नौदलची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न यामागे आहे.

जुलैच्या उत्तरार्धात, तेहरानमध्ये हमासचा नेता इस्माईल हनियेह याची हत्या करण्यात आली. इराणी अधिकाऱ्यांनी यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप केला होता. इस्रायलने मात्र सुरुवातीला हा आरोप नाकारला.

हमासच्या नेतृत्वाखाली 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यामुळे गाझामध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर सामान्यतः कतारमध्ये राहणारा हनियेह हा हमासच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा चेहरा होता. पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये युद्धबंदीवर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थीसाठी झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेत तो सहभागी होत असे.

काही महिन्यांनंतर, गाझामधील इस्रायली सैन्याने हनियेहचा उत्तराधिकारी आणि 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवार याला ठार मारले, त्यामुळे दशकांपूर्वीच्या इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षात ताज्या रक्तपाताला चालना मिळाली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


+ posts
Previous articleOver 3,000 North Koreans Killed, Kyiv Claims
Next articleनागरिकांना शिक्षा – पाकिस्तान लष्करी कोर्टावर US, UK आणि EUची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here