ऑस्ट्रेलियाचा टॅरिफ कमी ठेवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय

0
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियासाठी किमान 10 टक्के टॅरिफ कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ऑस्ट्रेलियन वस्तूंना अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान मिळू शकते, ज्यामुळे व्यवसायिकांना निर्यात वाढविण्यास मदत होऊ शकते, असे व्यापार मंत्री डॉन फॅरेल यांनी शुक्रवारी सांगितले. हे पाऊल द्विपक्षीय व्यापार संबंधांच्या दृष्टीने सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जाते.

ट्रम्प यांनी 69 व्यापारी भागीदारांसाठी सात दिवसांत 10  ते 41 टक्के असे आयात शुल्क वाढवले आहे, ज्यामध्ये कॅनडातील अनेक वस्तूंवर 35 टक्के, ब्राझीलसाठी 50 टक्के आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पॅसिफिक शेजारी न्यूझीलंडसाठी 15 टक्के टॅरिफ समाविष्ट आहे.

“इतर देशांमधील इतर सर्व बदलांमुळे या निर्णयाचा अर्थ असा आहे की ऑस्ट्रेलियन उत्पादने आता अमेरिकन बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक आहेत,” फॅरेल यांनी ॲडलेडमध्ये पत्रकारांना सांगितले.

“आम्ही आमच्या सर्व निर्यातदारांना या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी आणि निर्यातीचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करू,” असेही ते म्हणाले.

न्यूझीलंड-अमेरिका चर्चा

न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले म्हणाले की आपली अमेरिकन व्यापार मंत्र्यांशी चर्चा होईल अशी आशा आहे.

“पहिले पाऊल म्हणजे त्यांच्याशी थेट बोलणे. आणि आम्ही बरेच काही केले आहे. खरं तर, खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला गेला आहे,” असे त्यांनी रेडिओ न्यूझीलंडला सांगितले.

व्यापार चर्चा

अमेरिकेच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटू न दिल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यावर टीका केल्यानंतर, ऑस्ट्रेलियासाठी सर्वात कमी टॅरिफ असलेल्या देशांमध्ये समाविष्ट करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय त्यांच्यासाठी दिलासादायक ठरेल.

परंतु फॅरेल म्हणाले की ऑस्ट्रेलियाच्या वाटाघाटींमुळे त्यांना बेसलाइन टॅरिफ दर राखण्यास मदत झाली.

अल्बानीज सरकारला समर्थन

“आम्ही अमेरिकेसोबत ज्या शांत आणि संयमी पद्धतीने राजनैतिक चर्चा केल्या आहेत, त्याचे सगळे श्रेय अल्बानीज सरकार आणि विशेषतः पंतप्रधानांनी दिलेल्या पाठिंब्याला आहे,” फॅरेल म्हणाले.

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने अमेरिकेतून गोमांस आयातीवरील निर्बंध कमी केले, ज्यामुळे ट्रम्पसोबतच्या व्यापार चर्चा सुरळीत होण्याची शक्यता आहे. अ‌र्थात अल्बानीज यांनी हे स्पष्ट केले की यावर बराच काळापासून विचार सुरू होता आणि कोणत्याही व्यापार वाटाघाटींशी तो संबंधित नव्हता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleVice Admiral Vatsayan Becomes Navy’s Vice Chief as Swaminathan Assumes Charge of Western Command
Next articleस्वामीनाथन वेस्टर्न फ्लीटचे प्रमुख तर वात्सायन नौदलाचे उप-प्रमुख झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here