ट्रम्प यांनी Sriram Krishnan यांची, AI सल्लागार म्हणून केली निवड

0
ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीराम कृष्णन यांची, वरिष्ठ AI सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सौजन्यः श्रीराम कृष्णन X page

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष- डोनाल्ड ट्रम्प, यांनी भारतीय वंशाचे उद्योजक श्रीराम कृष्णन यांची, व्हाईट हाऊस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी’ कार्यालयात AI तंत्रज्ञानाचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून निवड केली आहे. श्रीराम कृष्णन यांनी 2022 मध्ये, टेक उद्योजक एलॉन मस्क यांच्यासोबत ट्विटरची (X) पुनर्चना करण्यात मदत केली आहे. कृष्णन यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

रविवारी Truth Social प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, ट्रम्प यांनी अधिकृतपणे घोषणा केली की, “श्रीराम कृष्णन हे व्हाईट हाऊसच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पॉलिसी ऑफिसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सीनियर पॉलिसी अ‍ॅडव्हायझर म्हणून काम करतील.”

‘डेव्हिड सॅक्स’ सोबत जवळून काम करत, श्रीराम यांनी अमेरिकेची AI प्रणाली विकासीत करण्यावर सातत्याने भर दिला. विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अध्यक्षांच्या सल्लागार परिषदेसोबत काम करण्यापासून, AI विकास प्रणालीची पॉलिसी तयार करण्यापर्यंत संपूर्ण धोरणाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. श्रीराम यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये Windows Azure चे संस्थापक सदस्य म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

चेन्नई येथे जन्मलेले श्रीराम कृष्णन हे भारतीय-अमेरिकन वंशाचे नागरिक असून, इंटरनेट उद्योजक, व्हेंचर कॅपिटलिस्ट, पॉडकास्टर आणि लेखक अशा विविध पातळ्यांवर कार्यरत आहेत.

त्यांनी यापूर्वी Microsoft, X (ट्विटर), Yahoo, Facebook आणि Snapchat येथे उत्पादन संघांचे नेतृत्व केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये त्यांनी टेक उद्योजक एलन मस्कसोबत ट्विटर (जे आता X म्हणून ओळखले जाते), त्याच्या पुर्ननिर्माणसाठी काम केले होते. त्यावेळी टेस्लाने नुकतीच X प्लॅटफॉर्मची अधिकृत खरेदी केले होती.

श्रीराम कृष्णन त्यांची पत्नी आरती राममूर्तीसह ‘द आरती आणि श्रीराम शो पॉडकास्ट’ या शोद्वारे घराघरांत प्रसिद्धी झाले.

दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या या खास नियुक्तीसाठी त्यांचे आभार मानत, श्रीराम कृष्णन यांनी X वर लिहिले: “आमच्या देशाची सेवा करण्याची आणि @DavidSacks सोबत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली. AI तंत्रज्ञानाचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती होणं मी माझा सन्मान समजतो.”

अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या नेत्यांनी तसेच भारतीय नागरिकांनी कृष्णन यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

इंडियास्पोराचे कार्यकारी संचालक- संजीव जोशीपुरा, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही श्रीराम कृष्णन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ट्रम्प यांनी त्यांची व्हाईट हाऊस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी कार्यालयात, AI चे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे.”

“अनेक वर्षांपासून, श्रीराम AI टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील, एक अंतर्ज्ञानी विचारवंत आणि प्रभावशाली भाष्यकार म्हणून कार्यरत आहेत. सार्वजनिक धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ असलेले त्यांचे कार्य, अमेरिकेच्या उत्कर्षसाठी फायदेशीर ठरेल. इंडियास्पोरा युनायटेड स्टेट्स आणि परदेशात AI वरील संयोजन आणि वैचारिक नेतृत्व राखून आहेत. आम्ही श्रीराम यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहोत,” असे जोशीपुरा यांनी सांगितले

(IBNS)


Spread the love
Previous articleयूएस नौदलाने अनवधानाने स्वतःचेच F/A-18 विमान पाडले
Next articleNorth Korea To Send More Troops To Russia Says Seoul

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here