ट्रम्प यांनी 2026 च्या G20 शिखर परिषदेसाठी, आलिशान रिसॉर्टची केली निवड

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषणा केली की, “यावर्षी ते दक्षिण आफ्रिकेतील बैठकीला गैरहजर राहिले असले तरी, ते 2026 मध्ये G20 शिखर परिषदेचे आयोजन करणार असून, त्याकरता त्यांनी मियामीजवळील त्यांच्या आलिशान डोराल (Doral) गोल्फ क्लबची निवड केली आहे.”

ओव्हल ऑफिसमधील एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, “मला वाटते की डोराल (Doral) क्लब हे G20 मधील नेत्यांच्या स्वागतासाठी सर्वोत्तम ठिकाण असेल.”

G20 परिषदेत, एकूण 19 सदस्य देश, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांचा समावेश आहे, जे या कार्यक्रमाचे आयोजन आळीपाळीने करत असतात. या कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

स्वार्थभावनेचा संघर्ष

आपल्या स्वतःच्या ‘ट्रम्प नॅशनल डोराल रिसॉर्टची’ निवड करून, ट्रम्प अमेरिकेच्या करदात्यांच्या पैशातून आयोजित करत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून लाखो डॉलर्सचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आपल्या राजकीय पदाचा वापर वैयक्तिक नफा मिळवण्यासाठी करत आहेत, असा आरोप पुन्हा एकदा त्यांच्यावर होऊ शकतो.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या कार्यक्रमातील सहभागींना पुरवलेल्या सेवांसाठी डोरालकडून ‘प्रॉफिट-मुक्त’ (at-cost) बिल आकारले जाईल.”

व्हाईट हाऊसने, स्वार्थभावनेच्या संघर्षाचे दावे फेटाळले आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे की, “राष्ट्राध्यक्षांची मालमत्ता एका तृतीय पक्षाद्वारे (third party) व्यवस्थापित केली जाते.”

ट्रम्प यांनी सांगितले की, “उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स (JD Vance) या वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जी20 शिखर परिषदेत सहभागी होतील.”

वैयक्तिक आणि राजकीय क्षेत्रांची सरमिसळ

आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी, 2020 च्या ग्रुप ऑफ 7 (G7) शिखर परिषदेचे आयोजन डोराल येथे करण्याचा आपला विचार मागे घेतला होता. त्यावेळी, काही डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन आणि नैतिकता विश्लेषकांनी (ethics analysts) अशी चिंता व्यक्त केली होती की, अशा प्रकारच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या संविधानाचे उल्लंघन होईल.

ट्रम्प, जे एक अब्जाधीश रिअल इस्टेट डेव्हलपर आणि गुंतवणूकदार आहेत, ते वैयक्तिक आणि राजकीय गोष्टींची नियमितपणे सरमिसळ करतात.

जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यापासून, त्यांनी त्यांचे व्यवसाय आणि धोरणात्मक निर्णयांचे परस्परसंबंध आणि श्रीमंत देणगीदार, गुंतवणूकदार आणि परदेशी देशांच्या प्रभावाबाबतच्या नैतिक चिंतांकडे दुर्लक्ष केले आहे.

ट्रम्प यांच्या व्यावसायिक हितसंबंधांमध्ये मीम कॉइन्स आणि क्रिप्टो टोकन्स, तसेच ट्रम्प-ब्रँडेड बायबल, घड्याळे आणि स्नीकर्ससारखे परवाना करार (licensing deals) यांचा समावेश आहे. अशा उद्योगांनी काही महिन्यांतच राष्ट्राध्यक्षांना कागदोपत्री कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती मिळवून दिली आहे.

त्यांनी अमेरिकेतील आणि परदेशातील त्यांच्या प्रॉपर्टीजवर वेळोवेळी, परदेशी नेते आणि कॉर्पोरेट अधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे, ज्यात फ्लोरिडातील पाम बीच येथील त्यांचा मार-ए-लागो क्लब, वॉशिंग्टन परिसरातील, न्यू जर्सीतील बेडमिन्स्टर आणि स्कॉटलंडमधील गोल्फ क्लब यांचा समावेश आहे.

अधिकृत वेबसाइटनुसार, गोल्फ कोर्स व्यतिरिक्त, डोराल मालमत्तेमध्ये एक क्लबहाऊस, जलतरण तलाव, रेस्टॉरंट्स, स्पा आणि सुमारे 100,000 चौरस फूट (9,300 चौरस मीटर) कार्यक्रमांसाठी जागा आहे, ज्यात डोनाल्ड जे. ट्रम्प ग्रँड बॉलरूमचा (Donald J. Trump Grand Ballroom) समावेश आहे.

सहभागींची यादी अजूनही अस्पष्ट

ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी, जानेवारीमध्ये परराष्ट्र विभागाने G20 कार्यक्रमाचे आयोजन करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकन शहरांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यावेळी, बैठका 2026 च्या ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत होतील, असा अंदाज होता. डोराल किंवा शेजारच्या मियामीने प्रस्ताव सादर करणाऱ्या शहरांमध्ये सहभाग घेतला होता की नाही हे लगेच स्पष्ट झाले नाही.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेत आपण सहभागी होणार नाही, असे ट्रम्प यांनी जुलैमध्ये सांगितले होते, कारण यजमान देश दक्षिण आफ्रिकेच्या जमीन आणि इस्रायलवरील धोरणांमुळे त्यांच्यात मतभेद आहेत.

ट्रम्प यांच्या जी20 मध्ये कोणते नेते सहभागी होतील हे स्पष्ट नाही. या गटामध्ये चीन आणि रशियाचा समावेश आहे, ज्यांचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडून (International Criminal Court) युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीनुसार)

+ posts
Previous articleGeopolitics in Camouflage: Moscow Hosts India, Pakistan, China in Military Drill
Next articleहमासने ओलिसांचे फुटेजचे प्रसारण केल्यानंतर गाझा शहरावर जोरदार हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here