ट्रम्प यांची कॅनडासाठी 35 तर इतरांसाठी 15 ते 20 टक्के टॅरिफ आकारणी

0

अमेरिका पुढील महिन्यापासून कॅनडामधून होणाऱ्या आयातीवर 35 टक्के टॅरिफ लादणार असून बहुतेक इतर व्यापारी भागीदारांवर 15 ते 20 टक्क्यांसह सरसकट टॅरिफ लावण्याची योजना विचाराधीन असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले.

आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या पत्रात ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना सांगितले की नवीन टॅरिफ दर 1 ऑगस्टपासून लागू होतील आणि कॅनडाने प्रत्युत्तर दिल्यास ते आणखी वाढतील.

35 टक्के टॅरिफ हा ट्रम्प यांनी कॅनडाला दिलेल्या सध्याच्या 25 टक्क्यांपेक्षा बरीच जास्त आहे आणि वॉशिंग्टनशी व्यापार करार करू इच्छिणाऱ्या कार्नी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

ट्रम्प यांनी फेंटॅनिल कार्डचा वापर केला

व्यापारावरील युनायटेड स्टेट्स-मेक्सिको-कॅनडा कराराद्वारे (यूएसएमसीए) समाविष्ट असलेल्या वस्तूंसाठी वगळलेले नियम कायम राहतील अशी अपेक्षा होती. शिवाय ट्रम्प यांनी ऊर्जा आणि खतांच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतला नव्हता तरी 10 टक्के दरही बदलणार नव्हते असे प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

ट्रम्प यांनी आपल्या पत्रात कॅनडामधून येणाऱ्या फेंटॅनिलच्या प्रवाहाबद्दल तसेच अमेरिकेच्या दुग्ध उत्पादक शेतकरी तसेच इतरांना डोईजड होणाऱ्या देशाच्या टॅरिफ आणि नॉन टॅरिफ व्यापारातील अडथळ्यांबद्दल तक्रार केली. ते म्हणाले की, व्यापार तूट ही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.

कॅनडाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की फेंटॅनिल अतिशय कमी प्रमाणात कॅनडामधून येते परंतु त्यांनी सीमा बळकट करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

ट्रम्प यांनी तडजोडीबाबत खुलासा केला

“जर कॅनडा फेंटानिलचा प्रवाह थांबवण्यासाठी माझ्यासोबत काम करत असेल, तर आम्ही कदाचित यावर तडजोड करण्याचा विचार करू,” असे ट्रम्प यांनी लिहिले.

 

कार्नी यांच्या कार्यालयाने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला लगेच प्रतिसाद दिला नाही. पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की त्यांनी आणि ट्रम्प यांनी 30 दिवसांच्या आत एक नवीन आर्थिक आणि सुरक्षा करार पूर्ण करण्याचे मान्य केले आहे.

ट्रम्प यांनी अलिकडच्या काळात त्यांचे व्यापारविषयक धोरणाची व्याप्ती वाढवली ​​आहे, त्यांनी मित्र राष्ट्र जपान आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांवर नवीन टॅरिफ लावले आहे, तसेच तांब्यावर 50 टक्के टॅरिफ लावले आहे.

गुरुवारी प्रकाशित झालेल्या एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ज्या इतर व्यापारी भागीदारांना अद्याप अशी पत्रे मिळाली नाहीत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारला जाईल.

‘आम्ही फक्त आमचे टॅरिफ ठरवत आहोत’

“प्रत्येकाला पत्र मिळण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहेच. आम्ही फक्त आमचे टॅरिफ ठरवत आहोत,” असे ट्रम्प मुलाखतीत म्हणाले.

“आम्ही फक्त असे म्हणणार आहोत की उर्वरित सर्व देश 20 किंवा 15 टक्के कर भरतील. ते नक्की किती हे आम्ही आता ठरवू,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

कार्ने यांना धक्का

कॅनडा हा मेक्सिकोनंतर अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि अमेरिकेच्या निर्यातीचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. यूएस सेन्सस ब्युरोच्या आकडेवारीनुसार, त्यांनी गेल्या वर्षी 349.4 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू खरेदी केल्या तर 412.7 अब्ज डॉलर्सच्या वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या.

अमेरिकेसोबतच्या व्यापार आव्हानांना तोंड देण्याच्या प्रतिज्ञेसह या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या लिबरल पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देणारे कार्ने, 21 जुलैपर्यंत आपल्या प्रमुख व्यापारी भागीदारासोबत व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचे उद्दिष्ट ठेवत होते.

ट्रम्प यांनी त्यांच्या पत्रात व्यापार वाटाघाटी कशा पुढे जात आहेत हे स्पष्टपणे सांगितले नव्हते, परंतु ते म्हणाले की “तुमच्या देशाशी असलेल्या आमच्या संबंधांवर अवलंबून, टॅरिफमध्ये कमी जास्त बदल केले जाऊ शकतात.”

गेल्या महिन्यात, ट्रम्प यांनी अचानक व्यापार चर्चा रद्द केल्यानंतर कार्ने सरकारने अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करणारा नियोजित डिजिटल सेवा कर रद्द केला कारण कर आकारणी हा “स्पष्ट हल्ला” आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleखलीलची ट्रम्प प्रशासनाकडे 20 दशलक्ष डॉलर्स आणि माफीनाम्याची मागणी
Next articleGermany Plans Purchase Of Additional 15 F-35 Fighter Jets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here