ट्रम्प यांच्या सल्लागारांनी युद्ध संपवण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावानुसार नजीकच्या भविष्यात देशाचा मोठा भाग रशियाला प्रभावीपणे सोपवण्यात येईल.
पुतीन यांना हवी आहे भेट
“राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेट हवी आहे. त्यांनी असे म्हटले आहे की अगदी सार्वजनिकरित्या आपल्याला ते युद्ध संपवावे लागणार आहे. हा एक मोठाच गोंधळ आहे,” असे ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबद्दल सांगितले.ट्रम्प यांच्या राजवटीतील अनिश्चितता
मात्र, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मदत त्या गतीने सुरू राहील की नाही हे अनिश्चित आहे, कारण त्यांना हे युद्ध लवकर संपवायचे आहे आणि तसा सूतोवाच त्यांनी केला आहे.
दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी गुरुवारी सांगितले की, ट्रम्प यांच्याकडून साधल्या जाणाऱ्या संपर्काच्या इच्छेचे पुतीन स्वागत करतील, परंतु आतापर्यंत अमेरिकेकडून कोणतीही औपचारिक विनंती करण्यात आलेली नाही. पेस्कोव्ह म्हणाले की, सध्या ट्रम्प पदभार कधी स्वीकारतात, याची प्रतीक्षा करणे अधिक योग्य ठरेल.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाबरोबरच्या 34 महिन्यांच्या युद्धाच्या निकालात ट्रम्प यांचे मत निर्णायक ठरू शकते आणि पुतीन यांना रोखण्यासाठी ते मदत करू शकतात.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)